थोडं माझ्या विषयी

Saturday 20 February 2016

नाती - गोती आणि आपण

सगळ्या नात्यातून माणुसकी जपली गेली पाहिजे. जरुरी नाही कि रोजच बोलले पाहिजे, भेटले पाहिजे, हृदयात त्या त्या नात्याचा आदर प्रेम असावयास हवा साधी आठवण जरी काढली तरी नाते सार्थ होते आणि प्रसंगानुरूप वेळोवेळी खुशाली जाणून घेतली पाहिजे, वेळ प्रसंगी सुख दुःखात साथ केली पाहिजे हे माणुसकीचे प्रथम कर्तव्य आहे मग ती नाती रक्ताची असोत किव्हा मानलेली, बिनशर्त निभावली पाहिजेत. ह्यात कुठलाही स्वार्थ नसावा. स्वार्थ आला कि नाती तुटतात, दुरावतात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे तोडली जातात. नाती गोती आणि माणुसकी जपत जगले पाहिजे एव्हढेच नव्हे तर मी म्हणेन कि मूक पशु, पक्षी प्राणी ह्यांच्यावर हि भूतदयेने प्रामाणिकतेने राहिले पाहिजे. 



नाती - गोती आणि आपण

माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो परंतु माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे म्हणूनच जन्माला आल्यावर त्यावर विविध संस्कार होतात आणि आपण ज्या कुटुंबात जन्मास आलो त्याची लहानपणापासून ओळख करून दिली जाते. अगदी बोलायला आल्यापासून कुटुंबातील विविध नात्यांनी हाक मारावयास बाळाला शिकवले जाते मग आपण त्या विश्वात रमत लहानाचे मोठे होतो आणि आपल्या भोवती एक नात्यांचे वलय तयार होते आपण निर्भीडपणे जगण्यास शिकतो खेळताना सुद्धा आपण आईला नाव सांगीन, बाबाला, दादाला सांगीन म्हणून दम भरतो मग जसजसे आयुष्य सरते तसतशी नाती वाढत जातात कॉलेज मध्ये कार्यालयात आणि समाजात अनेक कर्तव्य, पदे भूषवत असताना आपले स्नेही मित्र मैत्रिणी होतात ही नातीही आपणास खूप आधार देतात जगताना बहुतेकांशी आपले ऋणानुबंध होतात.

ह्या सगळ्या नात्यातून माणुसकी जपली गेली पाहिजे. जरुरी नाही कि रोजच बोलले पाहिजे, भेटले पाहिजे, हृदयात त्या त्या नात्याचा आदर प्रेम असावयास हवा साधी आठवण जरी काढली तरी नाते सार्थ होते आणि प्रसंगानुरूप वेळोवेळी खुशाली जाणून घेतली पाहिजे, वेळ प्रसंगी सुख दुःखात साथ केली पाहिजे हे माणुसकीचे प्रथम कर्तव्य आहे मग ती नाती रक्ताची असोत किव्हा मानलेली, बिनशर्त निभावली पाहिजेत. ह्यात कुठलाही स्वार्थ नसावा. स्वार्थ आला कि नाती तुटतात, दुरावतात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे तोडली जातात. नाती गोती आणि माणुसकी जपत जगले पाहिजे एव्हढेच नव्हे तर मी म्हणेन कि मूक पशु, पक्षी प्राणी ह्यांच्यावर हि भूतदयेने प्रामाणिकतेने राहिले पाहिजे. कारण आत्मा सर्वांचा एकच आहे रूप, रंग आकार जीवन जरी भिन्न असले..माणसाचा जन्म सुंदर आहे परंतु मरण भयंकर आहे ते आपल्या कर्मावर निश्चित होते, हे ज्याला कळेल तोच खरा माणूस.

ह्या नात्यांविषयी परस्परातील संबंधाविषयी आज खरच विचार करण्याची वेळ आली आहे जो तो फक्त आपल्याच चाकोरीत अडकत आहे आणि ह्या वृत्तीचे अनुकरण झपाट्याने पसरत आहे. स्वार्थासाठी जो तो झटत आहे त्यामुळे नवनवीन आजारही पसरत आहेत. अमुक एक गर्विष्ठ आहे मग मी का बोलू, तमुक एक मानी आहे मग मी का मान देऊ, असे चालते पण जरा विचार करा तुम्ही स्वतः प्रेमाने विचारपूस केली तर ती व्यक्ती बोलणार नाही का? आपण उगीचच गैरसमज करून घेतो पण असे नाही माणूस हा प्रेमाचा जिव्हाळ्याचा भुकेला आहे हो पण एखादा अपवाद असू शकतो त्याला माणूसघाणे म्हणू शकतो पण हा स्वभाव कायमचा राहत नाही. शेवटी तो हि तुमच्या आमच्याहून काही वेगळा नाही. काही जण तर इतकी प्रेमळ असतात कि निसर्गाशी, वृक्ष वल्लींशी वार्‍याशीही संवाद करतात. सामान्य माणूस ह्याला वेडेपण म्हणेल पण खरे पाहता अशांना निसर्गाच्या भावना समजतात आणि निसर्गाला त्यांच्या.

अलीकडे घराघरात आणि आजूबाजूला नाते, शेजारधर्म, मैत्री टिकवण्याचे ढोंग केले जात आहे. दिसतं तसं नसतं, नको त्याला स्वार्थासाठी, दबावामुळे, मालमत्ता बळकावण्यासाठी अवास्तव मान पान दिला जातो आणि रक्ताच्या नात्यांना तोडले जाते पुढे जाऊन ह्यातून वैमनस्य निर्माण होते आणि स्वभावात विकृतीही. मुठभर स्वार्थ साधून कोणी श्रीमंत होत नाही आणि प्रगतीही होत नाही चांगुलपणाचा खोटा आव आणून असे लोक स्वतःचा बोंगळपणा आणि हीनता लपवतात. अकारण स्वार्थासाठी कोणाचे मन दुखवून त्या वेळी सशक्त असल्यासारखे वाटते परंतु पुढचे परिणाम भयंकर असू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असा ….
म्हणूनच नाती जपा, जोपासा, माणसासारखे जगा …..कलियुगात थोडे तरी पुण्य वाढवा !

@ सुरेखा मालवणकर

Wednesday 10 February 2016

प्रिय आईस, पत्ता :- देवाचे घर.

तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच. 
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं, 
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं. 



प्रिय आईस, 
पत्ता :- देवाचे घर. 

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर, 
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर. 
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच, 

तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच. 
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं, 
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं. 

वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही, 
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही. 
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ, 
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ. 

तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर, 
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर. 
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी, 
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
 
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही, 
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही. 
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो, 
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो. 

बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे, 
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे. 
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला, 
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला. 
आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी, 

जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी. 
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून, 
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून. 
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच, 
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच. 

- - - - - - - - - -- - - - - - - - - -तुझाच लाडका मुलगा


माणुसकी

दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो.



माणुसकी

माणसाने मनाने जगावे, चांगल्या मनाने. ते प्रत्येकाचे वेगळे असते मन. पण, त्यामध्ये असावा माणुसकीच्या प्रेमाचा प्रेमळ व्रण, छानशा काळजात प्रेम ठेवावे, सदैव घरटे करून माणसाच्या हृदयात स्थान मिळवावे.

दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते.

प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचित असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे ‘माणुसकी’. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहे, ‘माणुसकी’ हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे असे चित्र आहे. ऎकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय..

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी.

पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते, तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.

Tuesday 9 February 2016

ज्येष्ठ नागरिक – प्रत्येक कुटुंबातील अनमोल ठेवा!

आजच्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, तुम्ही तुमच्या आई–वडिलांशी कसे वागता, त्या पध्दतीनेच तुमची मुलेदेखील पुढे तुमच्या उतारवयात वागतील. प्रत्येकाला काळानुरूप वृध्दापकाळास सामोरे जावयाचे आहे, हे लक्षात ठेवूनच आपल्या आई–वडिलांशी वागणे गरजेचं आहे.




ज्येष्ठ नागरिक – प्रत्येक कुटुंबातील अनमोल ठेवा!

भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकाचं स्थान नेहमीच मानाचं राहिलं आहे. कारण ज्येष्ठ नागरिक हा प्रत्येक परिवाराचा अनमोल ठेवा असतेा. तो खर्‍या अर्थाने कुटूंबाचा आधारवड असतो. त्यांच्या छत्रछायेत लहानचे मोठे झालेल्या तरूण पिढीने त्यांना सन्मानाची आदराची वागणूक देणं हे आद्य कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवावी.

आजच्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, तुम्ही तुमच्या आई–वडिलांशी कसे वागता, त्या पध्दतीनेच तुमची मुलेदेखील पुढे तुमच्या उतारवयात वागतील. प्रत्येकाला काळानुरूप वृध्दापकाळास सामोरे जावयाचे आहे, हे लक्षात ठेवूनच आपल्या आई–वडिलांशी वागणे गरजेचं आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आधार बनून सुखदु:खात वाटेकरी व्हावे, कारण अशा वागण्यातच जीवनाची सार्थकता आहे, हे विसरायला नको ज्येष्ठांनी देखील कुटूंबातील प्रत्येक सदस्य मग तो लहान असो वा मोठा, त्यांच्याशी प्रेमाने–स्नेहाने वागावे. आपल्या वयाचा दबाव टाकून कोणाशी बोलू नये. सर्वांना विश्वासात घेऊन वागल्याने घरातील एकुण वातावरण खेळीमेळीचे व आनंदमय राहते. तसेच कुटूंबियांशी संवाद साधतांना ‘मी’ पणा त्यागावा. ‘मी सांगतो तेच खरे’ ही अहंमभावाची प्रवृत्ती टाळावी. अशा स्वभावामुळे घरातील वातावरण बिघडते, सदस्यांत दुरावा निर्माण होऊन मतभेदांना तोंड फुटते. यासाठी सर्वांच्या मतांचा सन्मान करावा. मी, माझे, मला या तीन शब्दांचा प्रयोग करणे ज्येष्ठांनी टाळावे. दैनंदिन जीवनात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आहे त्या परिस्थितीत समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा. इतरांशी तुलना करू नये, समाधानी राहिल्याने सकारात्मक दृष्टीकोन बनून मन आनंदी व प्रसन्न राहते. संत तुकाराम म्हणतात ‘जगी सर्व सूखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाहे!’ खरं तर, भावी पिढीवर उत्तम संस्कार करण्यासाठी आजी–आजोबांनी प्रयत्नशील रहावे. तुम्ही ‘आधार’ आहात, असं इतरांना वाटलं पाहिजे. उत्तम मार्गदर्शक व्हा. मुलांना–नातवंडांना आपलेसं करा. ज्येष्ठांनी आवश्यक तेवढेच बोलावे, वायफळ वा अतिरंजित गप्पा कधी–कधी अंगाशी येतात आणि त्यातून नसते वाद निर्माण होतात. विषय कळत नसेल तर मौन पाळणे योग्य असते. ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ ही भूमिका असावी. नव्या–जुन्या पिढीतले अंतर (जनरेशन गॅप) जाणून सल्ला मागिल्यावर तो देणे सर्वथा उचित असते.

आपल्या जवळील प्रत्येक क्षण आनंदाने जगा, उद्याची चिंता सोडून द्या. वाढत्या वयामुळे वार्धक्यात काही शारीरिक–मानसिक व्याधी जडत असतात. यावर रामबाण उपाय म्हणून सिमित आहार, नियमित व्यायाम व पुरेशी विश्रांती घेतल्याने प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर चहा घेण्याआधी योगा–प्राणायाम करणं आरोग्याला लाभदायक ठरते. रात्रीचे भोजन केल्यावर शतपावली करणे आवश्यक आहे त्याने शरीर चपळ राहते. प्रतिदिन वर्तमानपत्रे, कांदबऱ्या व धार्मिक ग्रंथ वाचावेत, त्यामुळे बुध्दीला चालना मिळून विचारसरणी प्रगल्भ होते. जीवनाचा उत्तरार्ध सुखा–समाधानाचा व आनंदी जाण्यासाठी परमेश्वराचे नित्यनेमाने नामस्मरण करणे हा उत्तम मार्ग आहे. त्यातून आत्मबल वाढते. त्याबरोबरच चित्त शुध्द होऊन मन शांत राहते. म्हणून शुध्द आचरण, निर्मळ अंत:करण आणि भगवंताचे नामस्मरण केल्याने जीवन ख या अर्थाने सफल होते, हे ज्येष्ठांनी ध्यानी ठेवावे.

“मातृ देवो भव:, पितृ देवो भव:, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे शब्द आता लोप पावू लागले आहेत. जे आई–वडील हाडाचा बोरू व रक्ताची शाई करून मुलांचे भविष्य लिहित असतात, त्याच मुलांना आपल्या वैवाहिक जीवनादरम्यान आईवडिल–आजी आजोबा डोईजड होऊ लागतात, ही संकुचित प्रवृत्ती घृणास्पद आहे. ही मंडळी त्यांना अडगळ वाटू लागते. ज्येष्ठांना प्रेमाचं सांगणं आहे की, आजची पिढी व्यावसायिक (प्रोफेशनल) आहे. त्याचप्रमाणे नोकरी करणार्‍या सूना ‘करियर माइंडेड’ असतात. वृध्दांच्या भावनांची, आशा–अपेक्षा व स्वास्थ्याची त्यांना काळजी नसते, तर काळजी–चिंता असते ती बँक बॅलन्स, स्टेटस्, पाटर्या, पिकनिक व फॅशनेबल वेशभुषा करण्याची बस! वडिलाधारीमंडळी एखादा चांगला सल्ला देतात, तो सुध्दा त्यांना इगो प्रॉब्लेममुळे सहन होत नाही. वृध्दांच्या दैनंदिन गरजा, त्यांचे आरोग्य व गोळया–औषधे याकडे लक्ष देण्यास त्यांना फुरसत नसते. आईवडिलांचे पेन्शन, बँकेतील जमा रक्कम, स्थायी–जंगम मालमत्ता हे सर्व आपल्या पदरी केव्हा पडेल, याचा ध्यास त्यांना सदैव असतो. काही ‘नवीन कपल’ तर वृध्दांना वृध्दाश्रमात ठेऊन, मी, माझी बायको व मुलं या त्रिकोणी कुटूंब व्यवस्थेत जीवन व्यतीत करण्याचा कुटील डाव रचत असतात, हे सर्व अशोभनीय आहे, याचा आम्ही फेस्कॉमच्या माध्यमातून जाहीर धिक्कार करतो. यावर रामबाण उपाय म्हणून मुलांवर अंकुश ठेवण्यासाठी अनं आपले महत्व–प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीने आपली मालमत्ता मुलांच्या हाती देण्याची वृध्दांनी घाई करू नये. ही संपत्ती–मालमत्ता तुमचे संरक्षक कवच आहे, याचे भान ठेवावे. आई–वडिलांना वाऱ्यावर सोडणा या कृतघ्न मुलांना ३ महिन्याची कैद वा रूपये ५,०००/– दंंडाची कायद्यात तरतूद केली आहे. इसलिए हम गुजारिश करते हैं की, आप बुजूर्ग लोग दिले से नही तो, दिमाग से सोचे। नटसम्राट नाटकातील एक वाक्य ज्येष्ठांसाठी खुपच उपयुक्त आहे. ते म्हणजे ‘माणसाने (ज्येष्ठाने) वेळ आली तर आपलं समोरचं ताटं द्यावं, पण बसायला (मुलांना) आपलं पाट कदापि देऊ नये’ राज्य व केंद सरकारने निराश्रय ज्येष्ठ स्त्री–पुरूषांसाठी अत्यल्प दरात प्रतिमहा ३० किलो धान्य (गहु, तांदूळ) अन्नपुर्णा व अंत्योंदय योजनेअंतर्गत पुरविण्यात यावे. पोलीस खात्याने तालुका व जिल्हा स्तरावर ज्येष्ठांसाठी समुपदेशन केंद्रांची स्थापना करावी.

वृध्दांनी परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आपल्या दैनंदिन गरजा मर्यादित करून आपली छोटी–मोठी कामे स्वत:च करून घ्यावीत. आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन अपचन, पित्ताचा त्रास, बध्दकोष्ठता होऊ नये, यादृष्टीने भोजनाचे (लंच/डिनर) व नाश्त्याचे टाईमटेबल निश्चित असावे. वेळेवर गोळया–औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत. बाहेरचे फास्टफुड खाण्याचा मोह टाळावा. जेवणात पालेभाज्या, कडधान्याची उसळ, ताक, फलहार नित्यनेमाने घ्यावा. तळलेले मसालेदार पदार्थ वर्ज्य आहेत. रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली आवश्यक आहे. डायबेटीस वा लो बी. पी. असणाऱ्यांनी नाश्ता करूनच सकाळी घरातून बाहेर पडावे. जेवणानंतर कोमट–गरम पाणी प्यावे. त्याने अन्नपचन होण्यास मदत होते. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) ब्रिदवाक्य “जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका, हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा” याप्रमाणे वृध्दांनी जीवनाची मार्गक्रमणा करावी, ही अपेक्षा आहे. शासन यंत्रणा पोलीस विभाग यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, एकाकी जीवन जगणा या वृध्द स्त्री–पुरूषांचे जीवन असुरक्षित झाले आहे. तरी त्या–त्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नित्यनेमाने अशा निराधार वृध्दांच्या घरी जाऊन त्यांच्या अडी–अडचणी विचारात घ्याव्यात. पोलीस खात्याने शासकीय जी. आर. नुसार ज्येष्ठ नागरिक संघांसमवेत फेस्कॉमच्या पदाधिका यांशी बैठका घेऊन ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसंदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात, जेणेकरून त्यांना सुरक्षित, सुखी–समाधानी जीवन जगणे सूकर होईल. एखाद्या ज्येष्ठावर मुलांकडून छळवणूक होत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा व त्या ज्येष्ठांना न्याय मिळावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांनी तसेच वेळप्रसंगी फेस्कॉमने सर्वतोपरी मदत करावी. वृध्दांची छळवणूक करून त्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांनी कमाल १० हजार रूपये “पोटगी” रूपात अदा करावेत, अशी कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. राज्याच्या एकुण लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के असलेल्या ज्येष्ठांचे ज्वलंत प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीकोनातून ज्येष्ठांच्या संघांनी फेस्कॉमच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार विचारविमर्श करून आपल्या मागण्या पदरी पाडून घ्याव्यात. रेल्वे विभागाने ज्येष्ठांसाठी मेल–लोकल गाडयांमध्ये त्यांच्या एकूण संख्येनुसार ज्यादा डब्यांची व्यवस्था करावी. त्यांच्या डब्यात इतर प्रवासी चढणार नाहीत, यासाठी पोलीस सुरक्षा उपलब्ध करून घ्यावी. एस. टी. बस. प्रवासभाडे सवलतीची वयाची अट ६५ ऐवजी ६० वर्षे असावी. सिटी बस तसेच ए. सी. बसमध्ये देखील ६० वर्षे पुर्ण केलेल्या ज्येष्ठांना प्रवास सवलत असावी.

महापालिकांनी ज्येष्ठांसाठी प्रत्येक वार्डात ठरावित अंतरांवर स्वच्छतागृहे उभारावीत. ज्येष्ठांच्या संघांनी महापालिकेकडून विरंगुळा केंद्र, वाचनालय, बैठका कार्यक्रमांसाठी सभागृहे बांधून घ्यावीत. नगरसेवकांनी आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठ स्त्री–पुरूषांसाठी विरंगुळा, हवा पलट होण्याच्या उद्देशाने सहली आयोजित कराव्यात. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरे आयोजित करून ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. बँकांनी ज्येष्ठांच्या मुदत ठेवींवर इतरांपेक्षा कमाल २ टक्के ज्यादा व्याजदर द्यावा. ज्येष्ठांसाठी आयकर मर्यादा ६ ते ७ लाखादरम्यान असावी. ज्येष्ठांना सहजपणे आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळेल, यासाठी शासकीय यंत्रणा वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी तजवीज करावी. राज्य सरकारने ‘आईवडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणार्थ–२०१०’ चे तातडीने अंंमलबजावणी करावी. ज्येष्ठांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी (मेजर ऑपरेशन) शासनाकडून भरीव आर्थिक सवलत असावी. औषध खरेदीत २० टक्के सवलत द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात निर्धन–निराधार वृध्दांसाठी वृध्दाश्रम असावे. राज्य व केंद्राच्या अर्थसंकल्पात दरवर्षी ज्येष्ठांसाठी पुरेशी आर्थिक तरतुद असावी. राष्ट्रीय वार्धक्य निवृत्ती वेतनात वाढ करावी. इंदिरा गांधी राष्ट्रीेय पेन्शन योजना काटेकोरपणे राबवावी. शासनातर्फे ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा योजना कार्यान्वित करण्यात यावी.

तात्पर्य, ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व सुरक्षित व्हावे हाच मानस आहे.

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे”

प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; 
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.




प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच...

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे, गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.

सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच...

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.

मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.
खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे, गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !

तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.
शब्दाला शब्द वाढतात. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.

त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते.

प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो. यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे?
वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.

शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,
''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,,
''लोक तर देवाला पण नाव ठेवतात!"