नात्यांमध्ये येणाऱ्या या कडवटपण्याला जवाबदार कोण हा विचार करत बसलो तर आपण त्यात गुंतून जातो. आणि हे नात कधी कधी इतक गुंतू लागतं की आपल्याला त्या नात्याचाच विसर पडून जातो किंव्हा ते कायमच तुटू ही शकतं.
नाते आणि नातेसंबंध
नात्याची सुरुवात कशी करावी हे समजत नाहीये. नातं म्हणजे काय हे सर्वांनाच माहित आहे. नाती ही जन्माला आल्यापासून ते अगदी मरेपर्यंत आपल्या समोर कोणत्या ना कोणत्या रूपात भेटत असतात. जन्मापासून किंवा त्याही आधीपासून आपलं नातं आईच्या नाळेशी जोडलं असतं. जन्माला आल्यानंतर अनेक नाती आपल्याला सोबत करत असतात. कधी मुलाचं, कधी भाच्याचं, कधी पुतण्याचं, तर कधी भावंडाचं.
ही सर्व नाती आपल्यातील गुणसुत्रांमुळे जोडली जातात. प्रत्येकाला एक नाव असतं आणि त्याला साजेश्या काही अपेक्षा सुद्धा असतात. एखाद्या आखीव चौकटीमध्ये ज्याप्रमाणे चार गोष्टी जुळून याव्या लागतात तसाच नात्याची चौकट पूर्ण करायला आवश्यक असतात अपेक्षा, प्रेम, जवाबदारी आणि कर्तव्य. नातं कधीच एका बाजूनी नसतं, ते दोनही बाजूनी एकमेकास धरून असतात. जस आई-बाबा आणि मुलं, मामा आणि भाचा, काका आणि पुतण्या हे कसे एकाच वेळेला एकमेकांशी जोडलेली असतात. खरंतर जेव्हा ही नात्याची घडी बसत असते त्याचं वेळी ती प्रेम, अपेक्षा, जवाबदारी आणि कर्तव्य यांना जोडणारी एक अस्पष्ट चौकटही आखली जाते. बरं इथपर्यंत सर्व ठीक असते.
आता नात्यांचा विषय निघालाच आहे तर मला श्री. विमल लिमये यांनी लिहिलेली कविता आठवली.....
आता नात्यांचा विषय निघालाच आहे तर मला श्री. विमल लिमये यांनी लिहिलेली कविता आठवली.....
घर.....!
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती...
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती...
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी...
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी...
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती वाणी...
अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी...
या घरट्यातून पिलू उडावे दिव्या घेउनी शक्ती....
आकांशाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती.....
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती...
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी...
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी...
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती वाणी...
अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी...
या घरट्यातून पिलू उडावे दिव्या घेउनी शक्ती....
आकांशाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती.....
जिथे चौकट असते तिथे घुसमट ही होतेच. आता तुम्ही विचार करून पहा.... समजा माझं आणि माझ्या मामाच किंव्हा काकाच नातं. या गुणसूत्रांनी बांधलेल्या नात्यात समोरच्याकडून माझ्या काही अपेक्षा असतात, त्याप्रती काही कर्तव्य असतात, त्यांचाकडून प्रेम हवं असतं, आणि त्यांचा प्रती काही जबाबदार्या देखील असतात. आपण आपली अपेक्षा, कर्तव्य, प्रेम आणि जवाबदारी सर्व योग्य मार्गाने पार पाडत असतो. पण मग वाटतं राहतं आपण जर नातं जोडायला १००% समोरच्याला देतो तर मग त्याने आपले १००% का देऊ नये ? आणि मग हा विचार करताना नात्यात थोडा फार कडवटपणा यायला सुरुवात होते. बर मग आपण म्हणायला मोकळे .... “मी तर सारं काही केलं जर समोरचा कमी पडला तर यात माझा काय दोष. तो जर का नीट वागला असता तर नात्यात अशी कटुता आलीच नसती.”
तुम्ही थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येइल नात्यात कटुता येण्यामध्ये कोणाचाही दोष नसतो.. ना तुमचा ना समोरच्याचा. आता मला सांगा ज्याप्रमाणे तुम्ही नात्याची चौकट आखली तशीच त्यानेही ती आखली असेलच ना. ज्याप्रमाणे तुम्हाला त्याचाकडून काही अपेक्षा असतात तशाच त्याचाही आपल्याकडून काही अपेक्षा असतीलच ना. आणि कदाचित आपण त्या पूर्ण करू न शकल्याने त्यालाही हेच वाटत असेल... त्यांनी १००% आपल्याकडून दिलं पण आपण त्याला १००% देऊ शकललो नाही. ....... आता सांगा नात्यांमध्ये कडवटपणा नक्की कोणामुळे येतो? आहे काही उत्तर ??? नाहीना....
जेव्हा गुणसुत्रांनी जोडलेली नाती एकमेकांशी बांधली जातात, प्रत्येक जणाकडून नात्याची चौकट ही तेव्हाच आखली जाते. मग दोघेही आपापल्या चौकटीत आपापल्या मनाप्रमाणे अपेक्षा, कर्तव्य, प्रेम आणि जवाबदारी यांची सीमा आखून घेतात. कधीकधी ‘मी समोरच्याचा किती विचार करतो’ या नावाखाली आपापल्या सोयीनुसार त्यात बदलही करतात. पण तुम्ही कधी विचार केला आपण सामोरचाच्या भावना नीट ओळखू शकतो का ??? आपल्याकडून समोरचाच्या अपेक्षा काय आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे ???
कसला विचार करताय......हे सार तुमच्याही बाबतीत असं घडतंय ना ??
नात्यांमध्ये येणाऱ्या या कडवटपण्याला जवाबदार कोण हा विचार करत बसलो तर आपण त्यात गुंतून जातो. आणि हे नात कधी कधी इतक गुंतू लागतं की आपल्याला त्या नात्याचाच विसर पडून जातो किंव्हा ते कायमच तुटू ही शकतं.
नातं ही आपल्याला मिळालेली परमेश्वरी देणगी आहे. आता पहा प्राण्यांनासुद्धा रक्ताची नाती असतात ना. पण ती नाती काही कायम टिकणारी नसतात. आता हेच पहा, एखाद्या प्राण्याने किंव्हा पक्षाने पिलांना जन्म दिला त्यांना जगायला शिकवलं की त्यांची जवाबदारी संपते आणि तिथेच त्यांचातील नातंही संपत. उद्या ते पिल्लू मोठ झाल्यावर आपल्या आईला शोधायला निघालं तर ते आपल्या आईला शोधू शकेल का ? सर्वांचे चेहरे एकसारखे. सर्वांची एकाच बोली. आता तुम्ही सांगा त्याला आपल्या आईला शेधता येइल का; मुळात शोध घेण्याचा विचार तरी त्यांच्या मनात येइल का नाही ते देव जाणे.
नातं टिकवण्याचा एक साधा आणि सोप्पा उपाय सांगते, तुमच्या अपेक्षा इतक्याही असू नये की समोरच्याला त्या पूर्ण करता येणार नाही, जवाबदारी म्हणजे नक्की काय हे तुमच्या नजरेतून नाही तर सामोराचाच्या नजरेतून पहा. तुम्ही किती प्रेम करताय त्यापेक्षा सामोरच्याला किती प्रेम हवं आहे हे पहा. कर्तव्याची जाणिव ही तुम्हाला असतेच पण कर्तव्य म्हणजे नेमकं काय हे सामोरच्याकडून जाणून घ्या. वर सांगीतलेल्या साऱ्या गोष्टींचा संगम ही तुमची नाती आणि नातेसंबंध जोडायची गुरुकिल्ली आहे. आणि ही गुरुकिल्ली जर तुम्हाला सापडली तर तुमच्या आयुष्यात नात्यांचा कडवटपणा तर जाईलच सोबत त्यांच्याबरोबरचा नातेसंबंध ही चांगला होईल.
बरं............ही सारी झाली गुणसूत्रांनी जोडलेली नाती. पण मग मैत्रीचं नातं??? हे नातं जरी गुणसूत्रांनी जोडलं नसलं तरी त्या नात्याला देखील तितकच महत्व आपल्या आयुष्यात असतं. हे नातं तर गुणसूत्रांनी जोडलं नसतं मग त्यात दुरावा का म्हणून यावा??? मुळात मैत्रीचं नातं हे कोणी आपल्याला जोडून देत नसतं तर ते आपणच एकमेकांशी जोडून घेत असतो. ना त्यांच्या कुठल्या अवास्तव अपेक्षा असतात, ना कर्तव्याच ओझ, ना कसली प्रेमाची सीमा, ना जवबादारीचीची बोजा. कोणत्याही प्रकारच्या चौकटीत नं बांधले जाता हे नातं आपण जोडत असतो.
मैत्री ही फक्त मैत्रीचं असते. पण आपल्याला जेव्हा आपल्या मित्राचं मन जाणता येऊ लागतं त्यालाही आपल्या भावना समजू लागतात तेव्हा नकळत आपल्यासाठी ती मैत्री फक्त मैत्री न राहता त्याचं रुपांतर नात्यामध्ये मध्ये होते. कदाचित त्याचं वेळी आपण नात्याची चौकट बांधत असतो. आता म्हणाल की चौकट आली की घुसमट ही होणारच; खरं आहे. पण एक गोष्टं मात्र आहे, मैत्रीच्या नात्याची चौकट आणि गुणसूत्रांनी जोडलेल्या नात्यांची चौकट यांच्यात खूप फरक असतो, यांची एकमेकांशी तुलना नाही होऊ शकतं. गुणसूत्रांनी असलेल्या नात्याची चौकट ही प्रत्येकजण आपापल्या मर्जीने आखत असतो पण मैत्रीच्या नात्याची चौकट ही दोघांच्या संगनमताने आखली जाते. दोघांचे विचार, आवडी-निवडी, दृष्टीकोन एकमेकांना माहित असतात त्यामुळे सहसा दुरावा येण्याच काहीच कारण नसतं.
माणसाला सर्व अवयावांसोबत ‘मन’ नावाचा एक अवयव देखील असतो. मन म्हणजे काय हे कोणीच सांगू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती.... प्रत्येकाचं मन वेगवेगळ असतं. काही वेळा आपलं मन कलाटणी खात आणि त्याला मैत्रीचा चौकटीत काही बदल करावेसे वाटतात. अचानक बदलेल्या चौकटीत adjust होण्यासाठी वेळेची गरज लागतेच. कारण अशा वेळी मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. पण हा दुरावा जास्त काळ टिकून मात्र राहत आही बरं का !!! नाही कारण बदल जरी एकानेच केले असले तरीही त्यात compromise करायची तयारीही आपली असते.
असो..... तर प्रश्न असा आहे की नाती टिकवायची कशी. मग ते नातं गुनासुत्रानी जोडलेलं असलं काय किंव्हा मैत्रीने जुळल असलं काय... दोघांसाठी उपाय मात्र एकाच ... Transparency is best way & Adjustment is the best solution. जर हे तुम्हाला जमलं तर तुमच्यापेक्षा पुण्यवान दुसरं कोणीही नाही.
So keep it up.
-सुमेधा
No comments:
Post a Comment