थोडं माझ्या विषयी

Monday 1 February 2016

आई...!!

पहिला शब्द जो मी उच्चारला, पहिला घास जिने मला भरविला,
हाताचे बोट धरून जिने मला चालविले, आजारी असतान जिने रात्रं-दिवस काढले,
आठवतंय मला....


आई...!!

पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जिने मला भरविला,
हाताचे बोट धरून जिने मला चालविले,
आजारी असतान जिने रात्रं-दिवस काढले,
आठवतंय मला....

चुकल्यावर धपाटा घातलेला 
भूक लागली आहे सांगताच 
खाऊचा डब्बा पुढे केलेला 
अनेकदा तिने जेवणासाठी थांबायचे 
आणि मी मात्र न सांगताच 

बाहेरून खाऊन यायचे 
कधी कधी रागाच्या भरात 
उलटही बोललोय 
आणि मग चूक समजल्यावर 
ढसा ढसा रडलोय,
तिने सुद्धा माझे बोलणे 
कधीच मनावर नाही घेतले 
मागाहून घालवलेले माझे अश्रू 
पदराने पुसून टाकले

माझी स्तुती करताना 
ती कधीच थांबत नाही 
अन माझा मोठेपणा सांगताना 
तिच्या आनंदाचा पारावार उरत नाही 
माझा विचार करणे तिने कधीच सोडले नाही 
माझ्यावर प्रेम करण्याला कधीच अंत नाही

मी सुद्धा ठरवले आहे 
तिला नेहमी खुश ठेवायचे 
कितीही काहीही झाले तरी 
तिला नाही दुखवायचे 
आईची महानता सांगायला 
शब्द कधीच पुरणार नाही

तिचे उपकार फेडायला 
७ जन्म सुद्धा शक्य नाही 
देवाकडे एकच मागणे आहे 
भरपूर आयुष्य लाभो तिला 
आणि माझ्या प्रत्येक जन्मी
तिच्याच गर्भात जागा दे मला.

-अनामिक

No comments:

Post a Comment