थोडं माझ्या विषयी

Saturday 20 February 2016

नाती - गोती आणि आपण

सगळ्या नात्यातून माणुसकी जपली गेली पाहिजे. जरुरी नाही कि रोजच बोलले पाहिजे, भेटले पाहिजे, हृदयात त्या त्या नात्याचा आदर प्रेम असावयास हवा साधी आठवण जरी काढली तरी नाते सार्थ होते आणि प्रसंगानुरूप वेळोवेळी खुशाली जाणून घेतली पाहिजे, वेळ प्रसंगी सुख दुःखात साथ केली पाहिजे हे माणुसकीचे प्रथम कर्तव्य आहे मग ती नाती रक्ताची असोत किव्हा मानलेली, बिनशर्त निभावली पाहिजेत. ह्यात कुठलाही स्वार्थ नसावा. स्वार्थ आला कि नाती तुटतात, दुरावतात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे तोडली जातात. नाती गोती आणि माणुसकी जपत जगले पाहिजे एव्हढेच नव्हे तर मी म्हणेन कि मूक पशु, पक्षी प्राणी ह्यांच्यावर हि भूतदयेने प्रामाणिकतेने राहिले पाहिजे. 



नाती - गोती आणि आपण

माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो परंतु माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे म्हणूनच जन्माला आल्यावर त्यावर विविध संस्कार होतात आणि आपण ज्या कुटुंबात जन्मास आलो त्याची लहानपणापासून ओळख करून दिली जाते. अगदी बोलायला आल्यापासून कुटुंबातील विविध नात्यांनी हाक मारावयास बाळाला शिकवले जाते मग आपण त्या विश्वात रमत लहानाचे मोठे होतो आणि आपल्या भोवती एक नात्यांचे वलय तयार होते आपण निर्भीडपणे जगण्यास शिकतो खेळताना सुद्धा आपण आईला नाव सांगीन, बाबाला, दादाला सांगीन म्हणून दम भरतो मग जसजसे आयुष्य सरते तसतशी नाती वाढत जातात कॉलेज मध्ये कार्यालयात आणि समाजात अनेक कर्तव्य, पदे भूषवत असताना आपले स्नेही मित्र मैत्रिणी होतात ही नातीही आपणास खूप आधार देतात जगताना बहुतेकांशी आपले ऋणानुबंध होतात.

ह्या सगळ्या नात्यातून माणुसकी जपली गेली पाहिजे. जरुरी नाही कि रोजच बोलले पाहिजे, भेटले पाहिजे, हृदयात त्या त्या नात्याचा आदर प्रेम असावयास हवा साधी आठवण जरी काढली तरी नाते सार्थ होते आणि प्रसंगानुरूप वेळोवेळी खुशाली जाणून घेतली पाहिजे, वेळ प्रसंगी सुख दुःखात साथ केली पाहिजे हे माणुसकीचे प्रथम कर्तव्य आहे मग ती नाती रक्ताची असोत किव्हा मानलेली, बिनशर्त निभावली पाहिजेत. ह्यात कुठलाही स्वार्थ नसावा. स्वार्थ आला कि नाती तुटतात, दुरावतात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे तोडली जातात. नाती गोती आणि माणुसकी जपत जगले पाहिजे एव्हढेच नव्हे तर मी म्हणेन कि मूक पशु, पक्षी प्राणी ह्यांच्यावर हि भूतदयेने प्रामाणिकतेने राहिले पाहिजे. कारण आत्मा सर्वांचा एकच आहे रूप, रंग आकार जीवन जरी भिन्न असले..माणसाचा जन्म सुंदर आहे परंतु मरण भयंकर आहे ते आपल्या कर्मावर निश्चित होते, हे ज्याला कळेल तोच खरा माणूस.

ह्या नात्यांविषयी परस्परातील संबंधाविषयी आज खरच विचार करण्याची वेळ आली आहे जो तो फक्त आपल्याच चाकोरीत अडकत आहे आणि ह्या वृत्तीचे अनुकरण झपाट्याने पसरत आहे. स्वार्थासाठी जो तो झटत आहे त्यामुळे नवनवीन आजारही पसरत आहेत. अमुक एक गर्विष्ठ आहे मग मी का बोलू, तमुक एक मानी आहे मग मी का मान देऊ, असे चालते पण जरा विचार करा तुम्ही स्वतः प्रेमाने विचारपूस केली तर ती व्यक्ती बोलणार नाही का? आपण उगीचच गैरसमज करून घेतो पण असे नाही माणूस हा प्रेमाचा जिव्हाळ्याचा भुकेला आहे हो पण एखादा अपवाद असू शकतो त्याला माणूसघाणे म्हणू शकतो पण हा स्वभाव कायमचा राहत नाही. शेवटी तो हि तुमच्या आमच्याहून काही वेगळा नाही. काही जण तर इतकी प्रेमळ असतात कि निसर्गाशी, वृक्ष वल्लींशी वार्‍याशीही संवाद करतात. सामान्य माणूस ह्याला वेडेपण म्हणेल पण खरे पाहता अशांना निसर्गाच्या भावना समजतात आणि निसर्गाला त्यांच्या.

अलीकडे घराघरात आणि आजूबाजूला नाते, शेजारधर्म, मैत्री टिकवण्याचे ढोंग केले जात आहे. दिसतं तसं नसतं, नको त्याला स्वार्थासाठी, दबावामुळे, मालमत्ता बळकावण्यासाठी अवास्तव मान पान दिला जातो आणि रक्ताच्या नात्यांना तोडले जाते पुढे जाऊन ह्यातून वैमनस्य निर्माण होते आणि स्वभावात विकृतीही. मुठभर स्वार्थ साधून कोणी श्रीमंत होत नाही आणि प्रगतीही होत नाही चांगुलपणाचा खोटा आव आणून असे लोक स्वतःचा बोंगळपणा आणि हीनता लपवतात. अकारण स्वार्थासाठी कोणाचे मन दुखवून त्या वेळी सशक्त असल्यासारखे वाटते परंतु पुढचे परिणाम भयंकर असू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असा ….
म्हणूनच नाती जपा, जोपासा, माणसासारखे जगा …..कलियुगात थोडे तरी पुण्य वाढवा !

@ सुरेखा मालवणकर

No comments:

Post a Comment