पती-पत्नीच्या नात्यात भांडणं तर होतातच. याचा मुलांवर काय परिणाम होईल, आपलं नातं अजून "कम्फर्ट झोन'मध्ये आलं नाही, असा विचार करून मूल होऊ न देणं हे चुकीचंच असतं. अपत्यजन्मानंतर नवरा-बायकोच्या भूमिका बदलतात. त्यांच्या नात्यांचे कंगोरे उलगडत जाऊन, ते नातं अधिक दृढ व्हायला मदत होते.
सुख अनुभवायला हवं
-स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक)
सहजीवनाची सुरवात करताना प्रत्येक नवपरिणीत जोडप्यांसारखं मीही स्वप्न पाहिलं होतं... एकमेकांच्या साथीनं संसार करायचा, आयुष्य फुलवायचं. प्रत्येक क्षण एकमेकांसोबत आनंदानं घालवायचा. मोठ्या उमदीनं संसार थाटला; पण माझी जोडीदार असा विचार करणारी नाही. ती अतिशय स्वार्थी आहे. स्वतःमध्ये रमणारी, फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करणारी. स्वतःपुढे कोणाचीच किंमत नाही... दुसऱ्याच्या विचारांचा आदर नाही. स्वतःचा अहंकार जपण्याव्यतिरिक्त तिनं आतापर्यंत काहीच केलं नाही. माझी आता घुसमट होते आहे. मला हे नातं नकोच आहे. मोकळं व्हायचंय मला या बंधनातून. मला लवकरात लवकर कसा घटस्फोट मिळेल ते सांगा.''
"अनुराग... अरे,, लगेच अशी घटस्फोटाची भाषा का करतोस? तुमचा प्रेमविवाह आहे. घरच्यांची संमती नसतानाही तुम्ही दोघांनी जीवनभर एकमेकांना अखंड सोबत करण्याची वचनं देऊन एकमेकांसोबत लग्न केलंत आणि तुम्हाला हवंहवंसं वाटणारं नातं आता शिळं का झालं? तिच्यासाठी काहीही करायला तयार असणारा तू आता नातं संपवण्याची भाषा करतोस? तुझ्या आई-वडिलांनी या लग्नापूर्वीच तुला माझ्याकडे मार्गदर्शन घेण्यास पाठवलं होतं. लग्नापूर्वी पूर्ण विचार कर, हे मीच तुला सांगितलं होतं. तेव्हा तर तू तिच्या प्रेमात स्वतःला झोकून दिलं होतंस... मग आता ही वेळ का आली?''
"मॅडम... तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. रमणी मला अतिशय आवडली होती आणि आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळेच घरच्यांचा विरोध असूनही आम्ही लग्न केलं.''
"मग आता ते प्रेम कुठं गेलं? काय रे तुम्ही मुलं!... तुम्हाला लग्न करण्याचीही घाई आणि जमलं नाही तर मोडण्याची घाईच. सगळं इतकं सहज सोपं वाटतं का तुम्हाला? थोडंसं मनाविरुद्ध झालं, की चालवून घेता येत नाही. तुम्हाला लग्नामध्ये "तडजोड' अपेक्षित असतेच.''
"मॅडम... तडजोड करायलाही काही मर्यादा असतातच ना. रमणीसाठी मी माझ्या आई-वडिलांचा वाईटपणा घेतला... स्वतंत्र संसार मांडला. तिचं शिक्षण, तिचं करिअर याला नेहमीच साथ देत आलो. तिला तिच्या आई-वडिलांना आर्थिक मदत करायची असल्यानं तिच्या उत्पन्नातील एकही पैसा घरात घेतला नाही. तिच्या वागण्या-बोलण्याचे कटू घोट तर मी नेहमीच गिळत आलो आहे. तडजोड ही एकाच बाजूनं झाली तर त्याचा उपयोग काय? मी स्वतःला पार संपवून प्रत्येक वेळी तिचंच ऐकत आलो; पण किमान काही गोष्टी तरी तिनं माझ्यासाठी करायला हव्यात.''
"अनुराग... अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या बाबतीत तू तडजोड करू शकत नाहीस? आणि तिच्याकडून तुझ्या अपेक्षा तरी काय आहेत?''
"मॅडम... मी एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला. कष्टांतून वर आलेला. कुटुंबातील अनेक चढउतार पाहिलेला मुलगा आहे. लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीकडून अगदी सर्वसाधारण अपेक्षा ठेवलेल्या आहेत. मागील तीन वर्षं माझ्या अपेक्षा रमणीकडून पूर्ण व्हाव्यात, याचा मी प्रयत्न करतो आहे. इतर पती-पत्नी जगतात तसं छान आयुष्य जगावं, संसार फुलवावा आणि किमान एक तरी मूल असावं, असं मला वाटतं. लग्न झाल्यानंतर पत्नीकडून ही अपेक्षा ठेवणं काहीच चुकीचं नाही, अशी माझी धारणा आहे. आम्ही दोघांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, करिअरमध्ये सक्षम झाल्यानंतर लग्न केलं. माझं वय आता 35 वर्षं आणि रमणीचं 33 वर्षं. आता मूल होण्यासाठी अजून वाट बघायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे.''
"अरे बरोबर आहे तुझं म्हणणं. काही गोष्टी वेळेतच होणं अपेक्षित असतं. लेट मॅरेजमुळे तसा आता उशीरच झाला आहे, या गोष्टींचा दोघांनी मिळून विचार करा. त्यात भांडण्यासारखं आणि घटस्फोटापर्यंत येण्यासारखं काय आहे?
"अरे बरोबर आहे तुझं म्हणणं. काही गोष्टी वेळेतच होणं अपेक्षित असतं. लेट मॅरेजमुळे तसा आता उशीरच झाला आहे, या गोष्टींचा दोघांनी मिळून विचार करा. त्यात भांडण्यासारखं आणि घटस्फोटापर्यंत येण्यासारखं काय आहे?
"माझं हे म्हणणं तिला मान्य नाही. मुळात "तिला मूल होऊ देणं' हेच मान्य नाही. मी तिला पुष्कळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार होत नाही. मी इतर कोणत्याही गोष्टीत तडजोड करायला तयार आहे; पण मला मूल हवंय. तिची मी तीन वर्षं वाट पाहिली. सुरवातीला मी ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. तिच्या विचारात बदल होईल असं वाटलं; पण आता ती ठामपणे स्वतःचे विचार मांडते आणि "मूल' या विषयावर बोलायचंच नाही असं म्हणते. मी आता वैतागलो आहे. म्हणूनच मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.''
"अनुराग, मी एकदा रमणीशी बोलते. तिच्या काय अडचणी आहेत आणि त्या बाबतीत काय विचार आहे, हे समजावून घेते आणि त्यानंतरच तुझ्याशी बोलेन.''
"ठीक आहे मॅडम... पण तुम्ही लवकरात लवकर रमणीला तुमच्याकडे बोलावून घ्या.''
अनुरागला मी तात्पुरतं शांत करून पाठवलं; पण रमणीचे काय विचार आहेत, हे समजावून घेण्याची माझी उत्सुकता होती. रमणीला मी बोलावून घेतलं.
"रमणी, अगं हे काय ऐकते आहे मी? तुमच्यातील वाद एवढ्या टोकाला कसे गेले?''
"मॅडम, अनुराग एवढा शिकलेला असला तरीही तो सुशिक्षित नाही, कारण त्याचे विचार मागासलेलेच आहेत. जग कुठं चाललंय...? आपण त्याच डबक्यात राहून चालणार आहे का? मी मूल होऊ देण्यास नकार देते म्हणून हा घटस्फोट घ्यायला निघाला आहे. तुम्हीच सांगा, या कारणामुळे घटस्फोट मिळतो का?''
"अगं, पण मूल होऊ देण्यास तुझा का नकार आहे? तुला कसली भीती वाटते का?''
"मॅडम... तसं नाही. या बाबतीत माझे विचार वेगळे आहेत. आमच्या दोघांमध्ये पूर्ण सामंजस्य असेल, दोघांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास आणि खात्री वाटली, एकमेकांबाबतचा "कम्फर्ट झोन' तयार झाला तरच मुलाचा विचार करावा, अशा मताची मी आहे.
"रमणी, तुमचा प्रेमविवाह. लग्नाअगोदर दोन वर्षं तुम्ही एकमेकांना ओळखत होतात... लग्न होऊन आता तीन वर्षं झाली. अजूनही तुमच्या दोघांमध्ये "कम्फर्ट झोन' नाही?''
"अजूनही आमच्यात वादविवाद होत असतात. खटके उडत असतातच. लग्नाअगोदरची ओळख वेगळी असते, तेव्हा दोघं एकत्र राहत नसतो. लग्न झाल्यानंतर इतर नात्यांशीही आम्हाला बरंच स्ट्रगल करावं लागलं. एकमेकांना समजावून घेणं अजूनही अपूर्णच आहे, असं वाटतं. मूल जन्माला घातल्यानंतर त्याच्यासमोर वाद करणं... अगदीच दोघांचं जमलं नाही तर कोर्टासारख्या नको त्या ठिकाणी मुलांना घेऊन येणं... त्याच्याही मनात द्विधा अवस्था निर्माण करणं योग्य होणार नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळेच एकमेकांना आपण कधीच सोडू शकणार नाही, एकमेकांचे कधीही वाद होणार नाहीत, याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच मुलाचा विचार व्हावा असं माझं म्हणणं होतं.''
"रमणी, कोणत्याही पती-पत्नीला आमच्यात वाद होणारच नाहीत, ही खात्री कधीच देता येत नाही. दोन भिन्न व्यक्तिमत्त्वं लग्न या संस्थेत एकत्र येत असतात. त्यांचे विचार, जीवनशैली यांच्यात फरक असतोच, त्यामुळे वादविवाद होणं हे साहजिक आहे आणि ते नैसर्गिक आहे; पण त्याची भीती बाळगून मूलच होऊ द्यायचं नाही हा विचार योग्य नाही. किती दिवस वाट बघणार तुम्ही? तुमच्या वयाचाही विचार करायला हवा. याच वयात मूल होणं नैसर्गिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे. तुम्ही निवृत्त होण्यापूर्वी मुलानं आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं असतं.''
"मॅडम, मूल कशासाठी होऊ द्यायचं? उतारवयात आपल्याला कोणाचा तरी आधार असावा म्हणूनच ना? मुलं उतारवयात खरंच आधार देतात? आता माझाच भाऊ बघा... परदेशात शिक्षणासाठी म्हणून गेला. तिथंच नोकरी लागली. लग्न तिथंच केलं. आता आई-वडिलांना भेटायला यायलाही त्याला वेळ नाही. त्यांच्या गरजेपुरते पैसेसुद्धा तो पाठवत नाही. वडिलांनी स्वतःची सगळी कमाई त्याच्या शिक्षणासाठी खर्च केली; पण याची जाणीवसुद्धा त्यानं ठेवली नाही. म्हणूनच हे सगळे अनुभव लक्षात घेता वय जास्त झालं, मुलाचा विचार करता येणार नाही, असं वाटलं तर सरळ मूल दत्तक घेऊ. एखाद्या अनाथ मुलाला वाढवण्याचं पुण्य तरी मिळेल, असं मी अनुरागला म्हटलं आहे; पण त्याचं आपलं एकच, "आपल्याला स्वतःचंच मूल हवं.' शेवटी मी आता "मूल होऊच देणार नाही,' असाच निर्णय घेतला. रोज उठून "केव्हा विचार करायचा?' ही चर्चाच नको.''
"रमणी, तुझ्या भावाचे तुझ्या आई-वडिलांना आलेले अनुभव कटू असले तरीही तू त्यांना किती आधार देतेस! एक मुलगा करणार नाही एवढी जबाबदारी तू घेतली आहेस. आज तू आहेस म्हणून त्यांना केवढा आधार आहे! सगळी मुलं तशीच वागतात असं नाही. आणि फक्त उतारवयात आधार हवा म्हणूनच मुलांचा विचार करतात असं नाही गं. मानवाच्या जीवनात प्रत्येक आश्रमातील काही कर्तव्यं एक नियम म्हणून ठरवली गेली आहेत. प्रजोत्पादन करणं हे मानवी जीवनातील एक कर्तव्यच आहे. या सगळ्यांचाही तू विचार करू नकोस; पण एका स्त्रीची नैसर्गिक ऊर्मी म्हणून तुला आई व्हावंसं वाटत नाही? बाळंतपणाच्या कितीही वेदना सोसाव्या लागल्या तरी आईला मुलाचा जन्म हवा असतो. त्यातून मिळणारा आनंद वेगळा असतो. स्वतःच्या शरीरातील बदल अनुभवण्यातही मजा असते. बाळाच्या जन्मानंतर त्याच्याशी खेळणं, त्याचं बालपण अनुभवणं, त्याला वाढताना पाहणं यातलं सुख अवर्णनीय आहे. आपल्यातलेच गुण आपल्या मुलात आहेत, हे अनुभवताना मनात येणाऱ्या हळुवार भावना, आपलं बालपण पुन्हा एकदा अनुभवताना, त्याच्याशी बोबड्या बोलात बोलताना मिळणारं सौख्य याची तुलना कशाशीच करता येणार नाही. या सुखापासून वंचित राहण्याचा विचार तू का करतेस?
मूल दत्तक घेण्याबाबतीतले तुझे विचार योग्य असले तरीही ज्या कारणासाठी तू स्वतःचं मूल नको असं म्हणतेस ते दत्तक मुलाच्या बाबतीतही लागू होणार नाही का? उलट त्या बाबतीत अधिक जबाबदाऱ्या असतात. मूल दत्तक घेऊन त्याला वाढवणं वाटतं तितकं सोपं नाही. संस्थेकडून मूल दत्तक घेतल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता, मुलाची वाढ योग्य रीतीनं होते आहे की नाही या बाबतीत संस्थेला वेळोवेळी अहवाल सादर करणं इत्यादी बाबतीत स्वतःच्या मुलापेक्षा अधिक जागरूकपणे लक्ष घालावं लागतं.
मूल दत्तक घेण्याबाबतीतले तुझे विचार योग्य असले तरीही ज्या कारणासाठी तू स्वतःचं मूल नको असं म्हणतेस ते दत्तक मुलाच्या बाबतीतही लागू होणार नाही का? उलट त्या बाबतीत अधिक जबाबदाऱ्या असतात. मूल दत्तक घेऊन त्याला वाढवणं वाटतं तितकं सोपं नाही. संस्थेकडून मूल दत्तक घेतल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता, मुलाची वाढ योग्य रीतीनं होते आहे की नाही या बाबतीत संस्थेला वेळोवेळी अहवाल सादर करणं इत्यादी बाबतीत स्वतःच्या मुलापेक्षा अधिक जागरूकपणे लक्ष घालावं लागतं.
"रमणी,, अनुराग हा मागासलेल्या विचारांचा आहे, बदलत्या जीवनशैलीप्रमाणे तो बदलत नाही, असं तुझं म्हणणं आहे. आता नवीन येऊ घातलेल्या डिन्क (Double income no kids) संस्कृतीचा तो निश्चितच नाही. तो एक टिपीकल गृहस्थाश्रमी पुरुष आहे आणि "स्वतःचं मूल असावं' असा त्याचा सर्वसामान्य विचार आहे; परंतु स्वतःचा विचार करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहेच ना? "त्याचे विचार मागासलेलेच आहेत' असं सारखं हिणवण्यापेक्षा कधीतरी त्याच्याही विचारांचा आदर कर. दोघांचीही प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय मुलाचा जन्म होऊ देऊ नये, हे तुझं म्हणणं खरं असलं तरीही त्याला टाकून बोलण्यापेक्षा तुझे असे विचार का आहेत, हे त्याला पटवून देणं, त्याच्याशी शेअर करणं अधिक महत्त्वाचं आहे.
""रमणी, तू फार पुढचा आणि नकारात्मक विचार करतेस. पती-पत्नीच्या नात्यात भांडणं, रुसवेफुगवे, अबोले हे होत राहणारच आहेत. ते कधीच संपत नाहीत. पण याचा विचार करून "मुलावर परिणाम होऊ नये म्हणून मूलच नको,' हा विचार अतिटोकाचा आहे. पती-पत्नीच्या नात्यात हे होत असलं तरीही ते पुन्हा नव्या उमेदीनं एकत्र येतात... यातून नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते. मूल झाल्यानंतर ते फक्त पती-पत्नी राहत नाहीत, तर त्यांच्या भूमिकाही बदलतात, मुलाचे ते आई-बाबा होतात. त्यामुळेही दोघांना एकमेकांची वेगळी ओळख होते. दोघं या नात्यानंही अधिक जवळ येतात. एकमेकांना अधिक सांभाळून घेतात. आपोआपच जबाबदारीची जाणीव होते... शहाणपण येतं. जगण्यासाठी, पुढं जाण्यासाठी काहीतरी उद्दिष्ट मिळतं. आपल्यावर पूर्ण विश्वास टाकून आपल्या कुशीत झोपणारं, लटके हट्ट करणारं, गळ्यात मिठी घालणारं आणि "आई' म्हणून हाक मारणारं मूल तुझ्या कल्पनेत आणून बघ... सगळ्याचा विसर पडेल तुला. आणि या सुखापासून तू वंचित राहू नयेस असं मला वाटतं. अर्थात मी फक्त सांगण्याचं काम करणार आहे. ते आचरणात आणायचं की नाही हा निर्णय संपूर्णपणे तुझाच असणार आहे.''
""रमणी, तू फार पुढचा आणि नकारात्मक विचार करतेस. पती-पत्नीच्या नात्यात भांडणं, रुसवेफुगवे, अबोले हे होत राहणारच आहेत. ते कधीच संपत नाहीत. पण याचा विचार करून "मुलावर परिणाम होऊ नये म्हणून मूलच नको,' हा विचार अतिटोकाचा आहे. पती-पत्नीच्या नात्यात हे होत असलं तरीही ते पुन्हा नव्या उमेदीनं एकत्र येतात... यातून नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते. मूल झाल्यानंतर ते फक्त पती-पत्नी राहत नाहीत, तर त्यांच्या भूमिकाही बदलतात, मुलाचे ते आई-बाबा होतात. त्यामुळेही दोघांना एकमेकांची वेगळी ओळख होते. दोघं या नात्यानंही अधिक जवळ येतात. एकमेकांना अधिक सांभाळून घेतात. आपोआपच जबाबदारीची जाणीव होते... शहाणपण येतं. जगण्यासाठी, पुढं जाण्यासाठी काहीतरी उद्दिष्ट मिळतं. आपल्यावर पूर्ण विश्वास टाकून आपल्या कुशीत झोपणारं, लटके हट्ट करणारं, गळ्यात मिठी घालणारं आणि "आई' म्हणून हाक मारणारं मूल तुझ्या कल्पनेत आणून बघ... सगळ्याचा विसर पडेल तुला. आणि या सुखापासून तू वंचित राहू नयेस असं मला वाटतं. अर्थात मी फक्त सांगण्याचं काम करणार आहे. ते आचरणात आणायचं की नाही हा निर्णय संपूर्णपणे तुझाच असणार आहे.''
"मॅडम, तुम्ही सांगताय ते पटतंय मला. ही सगळी स्वप्नं अनुरागनं पाहिली आहेत; पण त्याच्या मनाचा विचार न करता मी माझेच विचार त्याच्यावर लादत राहिले. तो किती दुखावला जात असेल, याचा विचार मी केला नाही. उलट तो घटस्फोटाची भाषा करायला लागला म्हणून मला त्याचा भयंकर राग आला होता. त्याने माझ्यासाठी खूप समर्पण केलं आहे, हेही मी विसरून गेले होते. त्यालाच दोष देत राहिले. पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा मी नक्की विचार करेन. अनुरागचे विचारही समजून घेईन. आई होण्यातला आनंद मलाही अनुभवायचा आहे. पण मी चुकीच्या दिशेनं विचार करीत होते. काही कटू अनुभव, जवळच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यावर आलेले प्रसंग इत्यादीचा संबंध माझ्याही आयुष्याशी लावून मी नकारात्मक विचार करीत होते; पण तुम्ही मला योग्य मार्गदर्शन केलंत, मला माझा संसार वाचवायचा आहे. अनुरागसोबत अखेरच्या श्वासापर्यंत साथ निभवायची आहे. त्यामुळे त्याच्या स्वप्नांचा आणि त्याच्या विचारांचा मी नक्कीच विचार करेन.''
"रमणी, ईश्वर तुला सुबुद्धी देवो हीच प्रार्थना. आता पुढच्या वेळी गोड बातमी घेऊन भेट.''
"यस मॅम. आय विल मीट यू अगेन विथ अ गुड न्यूज.''
No comments:
Post a Comment