थोडं माझ्या विषयी

Saturday 20 February 2016

नाती - गोती आणि आपण

सगळ्या नात्यातून माणुसकी जपली गेली पाहिजे. जरुरी नाही कि रोजच बोलले पाहिजे, भेटले पाहिजे, हृदयात त्या त्या नात्याचा आदर प्रेम असावयास हवा साधी आठवण जरी काढली तरी नाते सार्थ होते आणि प्रसंगानुरूप वेळोवेळी खुशाली जाणून घेतली पाहिजे, वेळ प्रसंगी सुख दुःखात साथ केली पाहिजे हे माणुसकीचे प्रथम कर्तव्य आहे मग ती नाती रक्ताची असोत किव्हा मानलेली, बिनशर्त निभावली पाहिजेत. ह्यात कुठलाही स्वार्थ नसावा. स्वार्थ आला कि नाती तुटतात, दुरावतात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे तोडली जातात. नाती गोती आणि माणुसकी जपत जगले पाहिजे एव्हढेच नव्हे तर मी म्हणेन कि मूक पशु, पक्षी प्राणी ह्यांच्यावर हि भूतदयेने प्रामाणिकतेने राहिले पाहिजे. 



नाती - गोती आणि आपण

माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो परंतु माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे म्हणूनच जन्माला आल्यावर त्यावर विविध संस्कार होतात आणि आपण ज्या कुटुंबात जन्मास आलो त्याची लहानपणापासून ओळख करून दिली जाते. अगदी बोलायला आल्यापासून कुटुंबातील विविध नात्यांनी हाक मारावयास बाळाला शिकवले जाते मग आपण त्या विश्वात रमत लहानाचे मोठे होतो आणि आपल्या भोवती एक नात्यांचे वलय तयार होते आपण निर्भीडपणे जगण्यास शिकतो खेळताना सुद्धा आपण आईला नाव सांगीन, बाबाला, दादाला सांगीन म्हणून दम भरतो मग जसजसे आयुष्य सरते तसतशी नाती वाढत जातात कॉलेज मध्ये कार्यालयात आणि समाजात अनेक कर्तव्य, पदे भूषवत असताना आपले स्नेही मित्र मैत्रिणी होतात ही नातीही आपणास खूप आधार देतात जगताना बहुतेकांशी आपले ऋणानुबंध होतात.

ह्या सगळ्या नात्यातून माणुसकी जपली गेली पाहिजे. जरुरी नाही कि रोजच बोलले पाहिजे, भेटले पाहिजे, हृदयात त्या त्या नात्याचा आदर प्रेम असावयास हवा साधी आठवण जरी काढली तरी नाते सार्थ होते आणि प्रसंगानुरूप वेळोवेळी खुशाली जाणून घेतली पाहिजे, वेळ प्रसंगी सुख दुःखात साथ केली पाहिजे हे माणुसकीचे प्रथम कर्तव्य आहे मग ती नाती रक्ताची असोत किव्हा मानलेली, बिनशर्त निभावली पाहिजेत. ह्यात कुठलाही स्वार्थ नसावा. स्वार्थ आला कि नाती तुटतात, दुरावतात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे तोडली जातात. नाती गोती आणि माणुसकी जपत जगले पाहिजे एव्हढेच नव्हे तर मी म्हणेन कि मूक पशु, पक्षी प्राणी ह्यांच्यावर हि भूतदयेने प्रामाणिकतेने राहिले पाहिजे. कारण आत्मा सर्वांचा एकच आहे रूप, रंग आकार जीवन जरी भिन्न असले..माणसाचा जन्म सुंदर आहे परंतु मरण भयंकर आहे ते आपल्या कर्मावर निश्चित होते, हे ज्याला कळेल तोच खरा माणूस.

ह्या नात्यांविषयी परस्परातील संबंधाविषयी आज खरच विचार करण्याची वेळ आली आहे जो तो फक्त आपल्याच चाकोरीत अडकत आहे आणि ह्या वृत्तीचे अनुकरण झपाट्याने पसरत आहे. स्वार्थासाठी जो तो झटत आहे त्यामुळे नवनवीन आजारही पसरत आहेत. अमुक एक गर्विष्ठ आहे मग मी का बोलू, तमुक एक मानी आहे मग मी का मान देऊ, असे चालते पण जरा विचार करा तुम्ही स्वतः प्रेमाने विचारपूस केली तर ती व्यक्ती बोलणार नाही का? आपण उगीचच गैरसमज करून घेतो पण असे नाही माणूस हा प्रेमाचा जिव्हाळ्याचा भुकेला आहे हो पण एखादा अपवाद असू शकतो त्याला माणूसघाणे म्हणू शकतो पण हा स्वभाव कायमचा राहत नाही. शेवटी तो हि तुमच्या आमच्याहून काही वेगळा नाही. काही जण तर इतकी प्रेमळ असतात कि निसर्गाशी, वृक्ष वल्लींशी वार्‍याशीही संवाद करतात. सामान्य माणूस ह्याला वेडेपण म्हणेल पण खरे पाहता अशांना निसर्गाच्या भावना समजतात आणि निसर्गाला त्यांच्या.

अलीकडे घराघरात आणि आजूबाजूला नाते, शेजारधर्म, मैत्री टिकवण्याचे ढोंग केले जात आहे. दिसतं तसं नसतं, नको त्याला स्वार्थासाठी, दबावामुळे, मालमत्ता बळकावण्यासाठी अवास्तव मान पान दिला जातो आणि रक्ताच्या नात्यांना तोडले जाते पुढे जाऊन ह्यातून वैमनस्य निर्माण होते आणि स्वभावात विकृतीही. मुठभर स्वार्थ साधून कोणी श्रीमंत होत नाही आणि प्रगतीही होत नाही चांगुलपणाचा खोटा आव आणून असे लोक स्वतःचा बोंगळपणा आणि हीनता लपवतात. अकारण स्वार्थासाठी कोणाचे मन दुखवून त्या वेळी सशक्त असल्यासारखे वाटते परंतु पुढचे परिणाम भयंकर असू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असा ….
म्हणूनच नाती जपा, जोपासा, माणसासारखे जगा …..कलियुगात थोडे तरी पुण्य वाढवा !

@ सुरेखा मालवणकर

Wednesday 10 February 2016

प्रिय आईस, पत्ता :- देवाचे घर.

तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच. 
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं, 
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं. 



प्रिय आईस, 
पत्ता :- देवाचे घर. 

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर, 
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर. 
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच, 

तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच. 
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं, 
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं. 

वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही, 
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही. 
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ, 
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ. 

तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर, 
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर. 
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी, 
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
 
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही, 
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही. 
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो, 
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो. 

बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे, 
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे. 
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला, 
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला. 
आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी, 

जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी. 
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून, 
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून. 
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच, 
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच. 

- - - - - - - - - -- - - - - - - - - -तुझाच लाडका मुलगा


माणुसकी

दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो.



माणुसकी

माणसाने मनाने जगावे, चांगल्या मनाने. ते प्रत्येकाचे वेगळे असते मन. पण, त्यामध्ये असावा माणुसकीच्या प्रेमाचा प्रेमळ व्रण, छानशा काळजात प्रेम ठेवावे, सदैव घरटे करून माणसाच्या हृदयात स्थान मिळवावे.

दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते.

प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-रूंदी आणि त्याची विस्तृतता कळते. त्यापैकी असाच एक जो आपल्या सर्वांना परिचित असलेला पण त्याची फारशी खोल ओळख नसणारा शब्द म्हणजे ‘माणुसकी’. ओळख नसणारा शब्द यासाठी की आजचा माणूस माणसाची ओळख विसरत चालला आहे, ‘माणुसकी’ हा केवळ शब्दच नव्हे तर पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यातून खुद्द माणूसकीच गहाळ होत चालली आहे असे चित्र आहे. ऎकायला आणि बोलायला अगदीच सहज आणि सोपा वाटणारा हा शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय..

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी.

पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टीकोण, आपली नाती आणि त्यापेक्षा त्या नात्यांमधील प्रेम यावर ठरते कोण आपला मित्र कोण आपला शत्रू आहे ते. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते. तुमच्या विचारातूनच तुमचं व्यक्तिमत्व झळकत असतं, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते, तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात, म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घडवा.

Tuesday 9 February 2016

ज्येष्ठ नागरिक – प्रत्येक कुटुंबातील अनमोल ठेवा!

आजच्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, तुम्ही तुमच्या आई–वडिलांशी कसे वागता, त्या पध्दतीनेच तुमची मुलेदेखील पुढे तुमच्या उतारवयात वागतील. प्रत्येकाला काळानुरूप वृध्दापकाळास सामोरे जावयाचे आहे, हे लक्षात ठेवूनच आपल्या आई–वडिलांशी वागणे गरजेचं आहे.




ज्येष्ठ नागरिक – प्रत्येक कुटुंबातील अनमोल ठेवा!

भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकाचं स्थान नेहमीच मानाचं राहिलं आहे. कारण ज्येष्ठ नागरिक हा प्रत्येक परिवाराचा अनमोल ठेवा असतेा. तो खर्‍या अर्थाने कुटूंबाचा आधारवड असतो. त्यांच्या छत्रछायेत लहानचे मोठे झालेल्या तरूण पिढीने त्यांना सन्मानाची आदराची वागणूक देणं हे आद्य कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवावी.

आजच्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, तुम्ही तुमच्या आई–वडिलांशी कसे वागता, त्या पध्दतीनेच तुमची मुलेदेखील पुढे तुमच्या उतारवयात वागतील. प्रत्येकाला काळानुरूप वृध्दापकाळास सामोरे जावयाचे आहे, हे लक्षात ठेवूनच आपल्या आई–वडिलांशी वागणे गरजेचं आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आधार बनून सुखदु:खात वाटेकरी व्हावे, कारण अशा वागण्यातच जीवनाची सार्थकता आहे, हे विसरायला नको ज्येष्ठांनी देखील कुटूंबातील प्रत्येक सदस्य मग तो लहान असो वा मोठा, त्यांच्याशी प्रेमाने–स्नेहाने वागावे. आपल्या वयाचा दबाव टाकून कोणाशी बोलू नये. सर्वांना विश्वासात घेऊन वागल्याने घरातील एकुण वातावरण खेळीमेळीचे व आनंदमय राहते. तसेच कुटूंबियांशी संवाद साधतांना ‘मी’ पणा त्यागावा. ‘मी सांगतो तेच खरे’ ही अहंमभावाची प्रवृत्ती टाळावी. अशा स्वभावामुळे घरातील वातावरण बिघडते, सदस्यांत दुरावा निर्माण होऊन मतभेदांना तोंड फुटते. यासाठी सर्वांच्या मतांचा सन्मान करावा. मी, माझे, मला या तीन शब्दांचा प्रयोग करणे ज्येष्ठांनी टाळावे. दैनंदिन जीवनात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आहे त्या परिस्थितीत समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा. इतरांशी तुलना करू नये, समाधानी राहिल्याने सकारात्मक दृष्टीकोन बनून मन आनंदी व प्रसन्न राहते. संत तुकाराम म्हणतात ‘जगी सर्व सूखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाहे!’ खरं तर, भावी पिढीवर उत्तम संस्कार करण्यासाठी आजी–आजोबांनी प्रयत्नशील रहावे. तुम्ही ‘आधार’ आहात, असं इतरांना वाटलं पाहिजे. उत्तम मार्गदर्शक व्हा. मुलांना–नातवंडांना आपलेसं करा. ज्येष्ठांनी आवश्यक तेवढेच बोलावे, वायफळ वा अतिरंजित गप्पा कधी–कधी अंगाशी येतात आणि त्यातून नसते वाद निर्माण होतात. विषय कळत नसेल तर मौन पाळणे योग्य असते. ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ ही भूमिका असावी. नव्या–जुन्या पिढीतले अंतर (जनरेशन गॅप) जाणून सल्ला मागिल्यावर तो देणे सर्वथा उचित असते.

आपल्या जवळील प्रत्येक क्षण आनंदाने जगा, उद्याची चिंता सोडून द्या. वाढत्या वयामुळे वार्धक्यात काही शारीरिक–मानसिक व्याधी जडत असतात. यावर रामबाण उपाय म्हणून सिमित आहार, नियमित व्यायाम व पुरेशी विश्रांती घेतल्याने प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर चहा घेण्याआधी योगा–प्राणायाम करणं आरोग्याला लाभदायक ठरते. रात्रीचे भोजन केल्यावर शतपावली करणे आवश्यक आहे त्याने शरीर चपळ राहते. प्रतिदिन वर्तमानपत्रे, कांदबऱ्या व धार्मिक ग्रंथ वाचावेत, त्यामुळे बुध्दीला चालना मिळून विचारसरणी प्रगल्भ होते. जीवनाचा उत्तरार्ध सुखा–समाधानाचा व आनंदी जाण्यासाठी परमेश्वराचे नित्यनेमाने नामस्मरण करणे हा उत्तम मार्ग आहे. त्यातून आत्मबल वाढते. त्याबरोबरच चित्त शुध्द होऊन मन शांत राहते. म्हणून शुध्द आचरण, निर्मळ अंत:करण आणि भगवंताचे नामस्मरण केल्याने जीवन ख या अर्थाने सफल होते, हे ज्येष्ठांनी ध्यानी ठेवावे.

“मातृ देवो भव:, पितृ देवो भव:, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे शब्द आता लोप पावू लागले आहेत. जे आई–वडील हाडाचा बोरू व रक्ताची शाई करून मुलांचे भविष्य लिहित असतात, त्याच मुलांना आपल्या वैवाहिक जीवनादरम्यान आईवडिल–आजी आजोबा डोईजड होऊ लागतात, ही संकुचित प्रवृत्ती घृणास्पद आहे. ही मंडळी त्यांना अडगळ वाटू लागते. ज्येष्ठांना प्रेमाचं सांगणं आहे की, आजची पिढी व्यावसायिक (प्रोफेशनल) आहे. त्याचप्रमाणे नोकरी करणार्‍या सूना ‘करियर माइंडेड’ असतात. वृध्दांच्या भावनांची, आशा–अपेक्षा व स्वास्थ्याची त्यांना काळजी नसते, तर काळजी–चिंता असते ती बँक बॅलन्स, स्टेटस्, पाटर्या, पिकनिक व फॅशनेबल वेशभुषा करण्याची बस! वडिलाधारीमंडळी एखादा चांगला सल्ला देतात, तो सुध्दा त्यांना इगो प्रॉब्लेममुळे सहन होत नाही. वृध्दांच्या दैनंदिन गरजा, त्यांचे आरोग्य व गोळया–औषधे याकडे लक्ष देण्यास त्यांना फुरसत नसते. आईवडिलांचे पेन्शन, बँकेतील जमा रक्कम, स्थायी–जंगम मालमत्ता हे सर्व आपल्या पदरी केव्हा पडेल, याचा ध्यास त्यांना सदैव असतो. काही ‘नवीन कपल’ तर वृध्दांना वृध्दाश्रमात ठेऊन, मी, माझी बायको व मुलं या त्रिकोणी कुटूंब व्यवस्थेत जीवन व्यतीत करण्याचा कुटील डाव रचत असतात, हे सर्व अशोभनीय आहे, याचा आम्ही फेस्कॉमच्या माध्यमातून जाहीर धिक्कार करतो. यावर रामबाण उपाय म्हणून मुलांवर अंकुश ठेवण्यासाठी अनं आपले महत्व–प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीने आपली मालमत्ता मुलांच्या हाती देण्याची वृध्दांनी घाई करू नये. ही संपत्ती–मालमत्ता तुमचे संरक्षक कवच आहे, याचे भान ठेवावे. आई–वडिलांना वाऱ्यावर सोडणा या कृतघ्न मुलांना ३ महिन्याची कैद वा रूपये ५,०००/– दंंडाची कायद्यात तरतूद केली आहे. इसलिए हम गुजारिश करते हैं की, आप बुजूर्ग लोग दिले से नही तो, दिमाग से सोचे। नटसम्राट नाटकातील एक वाक्य ज्येष्ठांसाठी खुपच उपयुक्त आहे. ते म्हणजे ‘माणसाने (ज्येष्ठाने) वेळ आली तर आपलं समोरचं ताटं द्यावं, पण बसायला (मुलांना) आपलं पाट कदापि देऊ नये’ राज्य व केंद सरकारने निराश्रय ज्येष्ठ स्त्री–पुरूषांसाठी अत्यल्प दरात प्रतिमहा ३० किलो धान्य (गहु, तांदूळ) अन्नपुर्णा व अंत्योंदय योजनेअंतर्गत पुरविण्यात यावे. पोलीस खात्याने तालुका व जिल्हा स्तरावर ज्येष्ठांसाठी समुपदेशन केंद्रांची स्थापना करावी.

वृध्दांनी परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आपल्या दैनंदिन गरजा मर्यादित करून आपली छोटी–मोठी कामे स्वत:च करून घ्यावीत. आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन अपचन, पित्ताचा त्रास, बध्दकोष्ठता होऊ नये, यादृष्टीने भोजनाचे (लंच/डिनर) व नाश्त्याचे टाईमटेबल निश्चित असावे. वेळेवर गोळया–औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत. बाहेरचे फास्टफुड खाण्याचा मोह टाळावा. जेवणात पालेभाज्या, कडधान्याची उसळ, ताक, फलहार नित्यनेमाने घ्यावा. तळलेले मसालेदार पदार्थ वर्ज्य आहेत. रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली आवश्यक आहे. डायबेटीस वा लो बी. पी. असणाऱ्यांनी नाश्ता करूनच सकाळी घरातून बाहेर पडावे. जेवणानंतर कोमट–गरम पाणी प्यावे. त्याने अन्नपचन होण्यास मदत होते. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) ब्रिदवाक्य “जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका, हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा” याप्रमाणे वृध्दांनी जीवनाची मार्गक्रमणा करावी, ही अपेक्षा आहे. शासन यंत्रणा पोलीस विभाग यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, एकाकी जीवन जगणा या वृध्द स्त्री–पुरूषांचे जीवन असुरक्षित झाले आहे. तरी त्या–त्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नित्यनेमाने अशा निराधार वृध्दांच्या घरी जाऊन त्यांच्या अडी–अडचणी विचारात घ्याव्यात. पोलीस खात्याने शासकीय जी. आर. नुसार ज्येष्ठ नागरिक संघांसमवेत फेस्कॉमच्या पदाधिका यांशी बैठका घेऊन ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसंदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात, जेणेकरून त्यांना सुरक्षित, सुखी–समाधानी जीवन जगणे सूकर होईल. एखाद्या ज्येष्ठावर मुलांकडून छळवणूक होत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा व त्या ज्येष्ठांना न्याय मिळावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांनी तसेच वेळप्रसंगी फेस्कॉमने सर्वतोपरी मदत करावी. वृध्दांची छळवणूक करून त्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांनी कमाल १० हजार रूपये “पोटगी” रूपात अदा करावेत, अशी कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. राज्याच्या एकुण लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के असलेल्या ज्येष्ठांचे ज्वलंत प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीकोनातून ज्येष्ठांच्या संघांनी फेस्कॉमच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार विचारविमर्श करून आपल्या मागण्या पदरी पाडून घ्याव्यात. रेल्वे विभागाने ज्येष्ठांसाठी मेल–लोकल गाडयांमध्ये त्यांच्या एकूण संख्येनुसार ज्यादा डब्यांची व्यवस्था करावी. त्यांच्या डब्यात इतर प्रवासी चढणार नाहीत, यासाठी पोलीस सुरक्षा उपलब्ध करून घ्यावी. एस. टी. बस. प्रवासभाडे सवलतीची वयाची अट ६५ ऐवजी ६० वर्षे असावी. सिटी बस तसेच ए. सी. बसमध्ये देखील ६० वर्षे पुर्ण केलेल्या ज्येष्ठांना प्रवास सवलत असावी.

महापालिकांनी ज्येष्ठांसाठी प्रत्येक वार्डात ठरावित अंतरांवर स्वच्छतागृहे उभारावीत. ज्येष्ठांच्या संघांनी महापालिकेकडून विरंगुळा केंद्र, वाचनालय, बैठका कार्यक्रमांसाठी सभागृहे बांधून घ्यावीत. नगरसेवकांनी आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठ स्त्री–पुरूषांसाठी विरंगुळा, हवा पलट होण्याच्या उद्देशाने सहली आयोजित कराव्यात. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरे आयोजित करून ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. बँकांनी ज्येष्ठांच्या मुदत ठेवींवर इतरांपेक्षा कमाल २ टक्के ज्यादा व्याजदर द्यावा. ज्येष्ठांसाठी आयकर मर्यादा ६ ते ७ लाखादरम्यान असावी. ज्येष्ठांना सहजपणे आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळेल, यासाठी शासकीय यंत्रणा वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी तजवीज करावी. राज्य सरकारने ‘आईवडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणार्थ–२०१०’ चे तातडीने अंंमलबजावणी करावी. ज्येष्ठांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी (मेजर ऑपरेशन) शासनाकडून भरीव आर्थिक सवलत असावी. औषध खरेदीत २० टक्के सवलत द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात निर्धन–निराधार वृध्दांसाठी वृध्दाश्रम असावे. राज्य व केंद्राच्या अर्थसंकल्पात दरवर्षी ज्येष्ठांसाठी पुरेशी आर्थिक तरतुद असावी. राष्ट्रीय वार्धक्य निवृत्ती वेतनात वाढ करावी. इंदिरा गांधी राष्ट्रीेय पेन्शन योजना काटेकोरपणे राबवावी. शासनातर्फे ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा योजना कार्यान्वित करण्यात यावी.

तात्पर्य, ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व सुरक्षित व्हावे हाच मानस आहे.

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे”

प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; 
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.




प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच...

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे, गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.

सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच...

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते.

मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात.
खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे, गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे !

तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता.
शब्दाला शब्द वाढतात. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.

त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते.

प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो. यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे?
वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.

शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,
''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,,
''लोक तर देवाला पण नाव ठेवतात!"

नाती !

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हणनारी, 
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....



नाती !

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......


काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......


काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......


काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....


काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हणनारी, 
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....


काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......


काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......


जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना..
" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं "

-अनामिक


Monday 8 February 2016

आयुष्य फार सुंदर आहे!

आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?




आयुष्य फार सुंदर आहे!

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... 

असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...

अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते. दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.

मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.

आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की...
आपल्याला मनाजोगी सुट्टी मिळाली की ...
निवृत्त झालो की ...

आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.

खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?

जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं. पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.

या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.

शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.

आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू-

१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.

२ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?

३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?

४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?

हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का?

टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो . पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.
आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू-

१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.

२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?

३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?

४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.

क्षणभर विचार करा. आयुष्य अगदी छोटं आहे. तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय ?

मी सांगतो. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....

आता एक गोष्ट.... 

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊस्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होते.  धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.

त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण...
" डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?''
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.

ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.

आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते. शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...

मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का ?

जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त करा.

बघ, वाच, तुच ठरव! (एका वडिलांचं मुलाला पत्र)

माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.



बघ, वाच, तुच ठरव!
(एका वडिलांचं मुलाला पत्र)
    
माझ्या लाडक्या मुला,

मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन.

1) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अतर्क्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बर्‍या.

2) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.

3) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जीवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.

वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर!

* माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.

* तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

* जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

* आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

* प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

* अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!

*  माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.

* आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.

- युवर डॅड

Wednesday 3 February 2016

नाते आणि नातेसंबंध

नात्यांमध्ये येणाऱ्या या कडवटपण्याला जवाबदार कोण हा विचार करत बसलो तर आपण त्यात गुंतून जातो. आणि हे नात कधी कधी इतक गुंतू लागतं की आपल्याला त्या नात्याचाच विसर पडून जातो किंव्हा ते कायमच तुटू ही शकतं.



नाते आणि नातेसंबंध

      नात्याची सुरुवात कशी करावी हे समजत नाहीये. नातं म्हणजे काय हे सर्वांनाच माहित आहे. नाती ही जन्माला आल्यापासून ते अगदी मरेपर्यंत आपल्या समोर कोणत्या ना कोणत्या रूपात भेटत असतात. जन्मापासून किंवा त्याही आधीपासून आपलं नातं आईच्या नाळेशी जोडलं असतं. जन्माला आल्यानंतर अनेक नाती आपल्याला सोबत करत असतात. कधी मुलाचं, कधी भाच्याचं, कधी पुतण्याचं, तर कधी भावंडाचं.

      ही सर्व नाती आपल्यातील गुणसुत्रांमुळे जोडली जातात. प्रत्येकाला एक नाव असतं आणि त्याला साजेश्या काही अपेक्षा सुद्धा असतात. एखाद्या आखीव चौकटीमध्ये ज्याप्रमाणे चार गोष्टी जुळून याव्या लागतात तसाच नात्याची चौकट पूर्ण करायला आवश्यक असतात अपेक्षा, प्रेम, जवाबदारी आणि कर्तव्य. नातं कधीच एका बाजूनी नसतं, ते दोनही बाजूनी एकमेकास धरून असतात. जस आई-बाबा आणि मुलं, मामा आणि भाचा, काका आणि पुतण्या हे कसे एकाच वेळेला एकमेकांशी जोडलेली असतात. खरंतर जेव्हा ही नात्याची घडी बसत असते त्याचं वेळी ती प्रेम, अपेक्षा, जवाबदारी आणि कर्तव्य यांना जोडणारी एक अस्पष्ट चौकटही आखली जाते. बरं इथपर्यंत सर्व ठीक असते.
 
आता नात्यांचा विषय निघालाच आहे तर मला श्री. विमल लिमये यांनी लिहिलेली कविता आठवली.....

घर.....!

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती...
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती...
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी...
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी...
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती वाणी...
अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी...
या घरट्यातून पिलू उडावे दिव्या घेउनी शक्ती....
आकांशाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती.....

      जिथे चौकट असते तिथे घुसमट ही होतेच. आता तुम्ही विचार करून पहा.... समजा माझं आणि माझ्या मामाच किंव्हा काकाच नातं. या गुणसूत्रांनी बांधलेल्या नात्यात समोरच्याकडून माझ्या काही अपेक्षा असतात, त्याप्रती काही कर्तव्य असतात, त्यांचाकडून प्रेम हवं असतं, आणि त्यांचा प्रती काही जबाबदार्‍या देखील असतात. आपण आपली अपेक्षा, कर्तव्य, प्रेम आणि जवाबदारी सर्व योग्य मार्गाने पार पाडत असतो. पण मग वाटतं राहतं आपण जर नातं जोडायला १००% समोरच्याला देतो तर मग त्याने आपले १००% का देऊ नये ? आणि मग हा विचार करताना नात्यात थोडा फार कडवटपणा यायला सुरुवात होते. बर मग आपण म्हणायला मोकळे .... “मी तर सारं काही केलं जर समोरचा कमी पडला तर यात माझा काय दोष. तो जर का नीट वागला असता तर नात्यात अशी कटुता आलीच नसती.”

      तुम्ही थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येइल नात्यात कटुता येण्यामध्ये कोणाचाही दोष नसतो.. ना तुमचा ना समोरच्याचा. आता मला सांगा ज्याप्रमाणे तुम्ही नात्याची चौकट आखली तशीच त्यानेही ती आखली असेलच ना. ज्याप्रमाणे तुम्हाला त्याचाकडून काही अपेक्षा असतात तशाच त्याचाही आपल्याकडून काही अपेक्षा असतीलच ना. आणि कदाचित आपण त्या पूर्ण करू न शकल्याने त्यालाही हेच वाटत असेल... त्यांनी १००% आपल्याकडून दिलं पण आपण त्याला १००% देऊ शकललो नाही. ....... आता सांगा नात्यांमध्ये कडवटपणा नक्की कोणामुळे येतो? आहे काही उत्तर ??? नाहीना....

      जेव्हा गुणसुत्रांनी जोडलेली नाती एकमेकांशी बांधली जातात, प्रत्येक जणाकडून नात्याची चौकट ही तेव्हाच आखली जाते. मग दोघेही आपापल्या चौकटीत आपापल्या मनाप्रमाणे अपेक्षा, कर्तव्य, प्रेम आणि जवाबदारी यांची सीमा आखून घेतात. कधीकधी ‘मी समोरच्याचा किती विचार करतो’ या नावाखाली आपापल्या सोयीनुसार त्यात बदलही करतात. पण तुम्ही कधी विचार केला आपण सामोरचाच्या भावना नीट ओळखू शकतो का ??? आपल्याकडून समोरचाच्या अपेक्षा काय आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे ???

      कसला विचार करताय......हे सार तुमच्याही बाबतीत असं घडतंय ना ??
      नात्यांमध्ये येणाऱ्या या कडवटपण्याला जवाबदार कोण हा विचार करत बसलो तर आपण त्यात गुंतून जातो. आणि हे नात कधी कधी इतक गुंतू लागतं की आपल्याला त्या नात्याचाच विसर पडून जातो किंव्हा ते कायमच तुटू ही शकतं.

      नातं ही आपल्याला मिळालेली परमेश्वरी देणगी आहे. आता पहा प्राण्यांनासुद्धा रक्ताची नाती असतात ना. पण ती नाती काही कायम टिकणारी नसतात. आता हेच पहा, एखाद्या प्राण्याने किंव्हा पक्षाने पिलांना जन्म दिला त्यांना जगायला शिकवलं की त्यांची जवाबदारी संपते आणि तिथेच त्यांचातील नातंही संपत. उद्या ते पिल्लू मोठ झाल्यावर आपल्या आईला शोधायला निघालं तर ते आपल्या आईला शोधू शकेल का ? सर्वांचे चेहरे एकसारखे. सर्वांची एकाच बोली. आता तुम्ही सांगा त्याला आपल्या आईला शेधता येइल का; मुळात शोध घेण्याचा विचार तरी त्यांच्या मनात येइल का नाही ते देव जाणे.

      नातं टिकवण्याचा एक साधा आणि सोप्पा उपाय सांगते, तुमच्या अपेक्षा इतक्याही असू नये की समोरच्याला त्या पूर्ण करता येणार नाही, जवाबदारी म्हणजे नक्की काय हे तुमच्या नजरेतून नाही तर सामोराचाच्या नजरेतून पहा. तुम्ही किती प्रेम करताय त्यापेक्षा सामोरच्याला किती प्रेम हवं आहे हे पहा. कर्तव्याची जाणिव ही तुम्हाला असतेच पण कर्तव्य म्हणजे नेमकं काय हे सामोरच्याकडून जाणून घ्या. वर सांगीतलेल्या साऱ्या गोष्टींचा संगम ही तुमची नाती आणि नातेसंबंध जोडायची गुरुकिल्ली आहे. आणि ही गुरुकिल्ली जर तुम्हाला सापडली तर तुमच्या आयुष्यात नात्यांचा कडवटपणा तर जाईलच सोबत त्यांच्याबरोबरचा नातेसंबंध ही चांगला होईल.

      बरं............ही सारी झाली गुणसूत्रांनी जोडलेली नाती. पण मग मैत्रीचं नातं??? हे नातं जरी गुणसूत्रांनी जोडलं नसलं तरी त्या नात्याला देखील तितकच महत्व आपल्या आयुष्यात असतं. हे नातं तर गुणसूत्रांनी जोडलं नसतं मग त्यात दुरावा का म्हणून यावा??? मुळात मैत्रीचं नातं हे कोणी आपल्याला जोडून देत नसतं तर ते आपणच एकमेकांशी जोडून घेत असतो. ना त्यांच्या कुठल्या अवास्तव अपेक्षा असतात, ना कर्तव्याच ओझ, ना कसली प्रेमाची सीमा, ना जवबादारीचीची बोजा. कोणत्याही प्रकारच्या चौकटीत नं बांधले जाता हे नातं आपण जोडत असतो.

      मैत्री ही फक्त मैत्रीचं असते. पण आपल्याला जेव्हा आपल्या मित्राचं मन जाणता येऊ लागतं त्यालाही आपल्या भावना समजू लागतात तेव्हा नकळत आपल्यासाठी ती मैत्री फक्त मैत्री न राहता त्याचं रुपांतर नात्यामध्ये मध्ये होते. कदाचित त्याचं वेळी आपण नात्याची चौकट बांधत असतो. आता म्हणाल की चौकट आली की घुसमट ही होणारच; खरं आहे. पण एक गोष्टं मात्र आहे, मैत्रीच्या नात्याची चौकट आणि गुणसूत्रांनी जोडलेल्या नात्यांची चौकट यांच्यात खूप फरक असतो, यांची एकमेकांशी तुलना नाही होऊ शकतं. गुणसूत्रांनी असलेल्या नात्याची चौकट ही प्रत्येकजण आपापल्या मर्जीने आखत असतो पण  मैत्रीच्या नात्याची चौकट ही दोघांच्या संगनमताने आखली जाते. दोघांचे विचार, आवडी-निवडी, दृष्टीकोन एकमेकांना माहित असतात त्यामुळे सहसा दुरावा येण्याच काहीच कारण नसतं.

      माणसाला सर्व अवयावांसोबत ‘मन’ नावाचा एक अवयव देखील असतो. मन म्हणजे काय हे कोणीच सांगू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती.... प्रत्येकाचं मन वेगवेगळ असतं. काही वेळा आपलं मन कलाटणी खात आणि त्याला मैत्रीचा चौकटीत काही बदल करावेसे वाटतात. अचानक बदलेल्या चौकटीत adjust होण्यासाठी वेळेची गरज लागतेच. कारण अशा वेळी मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. पण हा दुरावा जास्त काळ टिकून मात्र राहत आही बरं का !!! नाही कारण बदल जरी एकानेच केले असले तरीही त्यात compromise करायची तयारीही आपली असते.

असो..... तर प्रश्न असा आहे की नाती टिकवायची कशी. मग ते नातं गुनासुत्रानी जोडलेलं असलं काय किंव्हा मैत्रीने जुळल असलं काय... दोघांसाठी उपाय मात्र एकाच ... Transparency is best way  & Adjustment is the best solution. जर हे तुम्हाला जमलं तर तुमच्यापेक्षा पुण्यवान दुसरं कोणीही नाही.

So keep it up.

-सुमेधा

वास्तव्याशी तडजोड हवी

आपण लक्षात घेत नाही की आपण दोघे तेच असलो तरी आपल्या Perception आणि Priorities बदललेल्या आहेत.. दोघांच्याही.. तेव्हा वास्तवाचं स्वागत करायला हवं.. अवखळ मनाला समजावयास हवं .. ज्यांना हे जमत नाही त्यांच्या ओंजळीत जखमाळलेले काटे कायम खुपत रहाणार.. सगळी नाती ही आपल्यासाठी नि आपल्या सोबत्यासाठी वर्तमानाचा आनंद असायला हवीत.. भविष्यासाठी ठेवा.. चोरकप्प्यातला दोघांच्याही.





वास्तव्याशी तडजोड हवी

आपल्या सर्वांच्या तोंडी बऱ्याच वेळा हे वाक्य येते ..तू आता पूर्वीसारखा नाही राहिलास ..राहिलीस.. या वाक्यावर जरा गौर केलं की आढळून येते की या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचारात दोन वेगळ्या काळातील दोन वेगळ्या व्यक्तीमधील व्यवहाराची तुलना करून आपला अभिप्राय दिला आहे. या “ तू ” शी आपले कधी काळी मित्रत्वाचे नाते जुडले असते.

आयुष्यातील गाण्यातील आठवणीने आठवाव्याश्या वाटणाऱ्या गोड गोड ओळीचे शब्द दोघानी हातात हात घालून लिहलेले असतात.. त्या शब्दांना दिलेली सुरावट केवळ  दोघांच्या हातूनच घडावी असं काहीसं विधात्याच्या मर्जीत असावं जणू.. हे सारं सारं त्या वेळच्या वर्तमानाला सुसंगत असतं.. त्या क्षणांना  चिरंजीवत्व मिळालंय अश्या बेहोशीत आपल वागणं असतं .. जगणं असतं .. अन यात अनैसर्गिक काहीच नाही बरं.. काळाचे काटे चालत राहिलेत .. चालत रहातात.. आणि  चालत राहणार ... हे त्रिवार सत्य आपल्याला हुलकावणी द्यायला लागते.. आपल्या भावना नि तिचे साद.. पडसाद नि त्यानंतरचा नाद.. रेंगाळणारा निनाद थांबायचं नावच घेत नाही..या संमोहित अवस्थेत आपण त्या सगळ्या दिशांना “Statue” करण्याची इच्छा बाळगतो.

त्या नात्याच्या हिंदोळ्यावर झोकावणारा वारा ..कातरवेळ साधून आपणाला हाका मारीत असतो ..आपण त्या हाकांना हात हलवून प्रतिसाद देण्यासाठी हात उचलू पाहतो ...परंतु त्या हातावर काळाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दिवसांचे ओझे पडलेले असते ..त्या मुळे हात उचलत नाही ..आपल्याला राग तर येतोच ..मी आहे  तोच आहे ...तो ही तोच आहे.. मग आज त्या नात्याला आजच्या वर्तमानात पहिल्या ..दुसऱ्या
..अगदी शेवटच्या तरी पानावर अंमळ विसावायला होकार का मिळत नाही ..आपल्याला दुर्लक्षित करून (The best way to kill the enemy is to neglect him..) थेट दोस्ताच्या यादीतून दुष्मनाच्या प्रांतात तडीपार का केले गेले असं वाटू लागणं साहजिक असलं तरी ते विवेकाच्या कसोटीवर गैरलागू आहे...कारण काळाच्या पडद्यावर कितीही सुंदर रंगाचं इंद्रधनुष्य रेखाटलं तरी मावळणारा प्रत्येक दिवस त्याचा रंग फिकट फिकट करून मावळत असतो.

प्रत्येक जण एक स्वतंत्र आयुष्य घेऊन जन्माला आलाय ..आणि प्रत्येकाचे जगण्याचे हेतू वेगळे असतात..इशारे आगळे असतात..प्रत्येकजण त्याच्या आयुष्याला सामोरं जाताना घडणाऱ्या घटनांचे ..नात्यातील व्यवहाराचे त्याच्या चष्म्यातून अवलोकन करून त्याच्या सोयीचे अर्थ निघण्याच्या दिशेने पृथ:करण करीत असतो ..नि घाईघाईने निष्कर्ष काढून मोकळा होतो ..आपण लक्षात घेत नाही की आपण दोघे तेच असलो तरी आपल्या Perception आणि Priorities बदललेल्या आहेत.. दोघांच्याही.. तेव्हा वास्तवाचं स्वागत करायला हवं.. अवखळ मनाला समजावयास हवं .. ज्यांना हे जमत नाही त्यांच्या ओंजळीत जखमाळलेले काटे कायम खुपत रहाणार.. सगळी नाती ही आपल्यासाठी नि आपल्या सोबत्यासाठी वर्तमानाचा आनंद असायला हवीत.. भविष्यासाठी ठेवा.. चोरकप्प्यातला दोघांच्याही.

ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं!

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...



ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...
शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...
सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्या गाजत असतात...
परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...
नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...
नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...
रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...
कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...
डोक्यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...
बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन् शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...
पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...
सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन् सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...
कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...
करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...
केला खरा आज प्रयास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...
सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

-अनामिक