थोडं माझ्या विषयी

Tuesday 3 March 2015

माझी ऑनलाइन मैत्रीण

कविता पोस्ट करता करता
अशीच एकीशी ओळख झाली...
तिच्या कवितेला रिप्लाय देता देता
ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...



माझी ऑनलाइन मैत्रीण...!

कविता पोस्ट करता करता
अशीच एकीशी ओळख झाली...

तिच्या कवितेला रिप्लाय देता देता
ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...

फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली
जी-टॉक वर आमची एक-मेकाशी बोलायला सुरुवात झाली,

एकमेकांची ओळख पटताच
मन आमची एकमेकांना ओळखु लागली ....

बोलणे आमचे दरोज होत होते,
मन आमचे तेवढेच जवळ येत होते...

एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे,
त्याहूनही अधिक एका अनोळखी व्यक्ती ने आपल्यावर प्रेम करावे....

तिच्या विचारातच रात्र घालवावी....
सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..

ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी
तिच्याशीच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..

ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी
पण तिला तिचा नंबर मागायची हिंम्मत न व्हावी..

दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी
पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..

तिच्याशी बोलताच साऱ्या दुःखाचा विसर पडावा
नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..

फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी
देव आहे दुनियेमध्ये पाठवले तिला माझ्यासाठी...

असे जणू का होते
एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे सारे जीवन पालटून जाते...

आमचे हे नाते असेच राहू दे
तिच्या मैत्रीची साथ मला अशीच आयुष्यभर मिळत राहू दे...

अंतरावर असुनही जवळ असल्यासारखी वाटावी
अशी एक मैत्रीण आयुष्यात प्रत्येकाला मिळावी..
प्रत्येकाला मिळावी....!

अनामिक

No comments:

Post a Comment