मे महिन्याच्या सुट्टीत पर्यटक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकसाठी जातात. असंच एक ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. ठाण्याचे `महाबळेश्वर’ सबोंधले जाणारे उंच हवेचे ठिकाण म्हणजे `जव्हार, पर्यटकांना खुणवत आहे.
'जव्हार' खुणावतेय पर्यंटकांना !
मे महिन्याच्या सुट्टीत पर्यटक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकसाठी जातात. असंच एक ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. ठाण्याचे `महाबळेश्वर’ सबोंधले जाणारे उंच हवेचे ठिकाण म्हणजे `जव्हार, पर्यटकांना खुणवत आहे. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ ‘, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉईंट’ आणि येथील वारली आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. तसेच या ठिकाणाला ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
सह्याद्रीलाच संलग्न असलेल्या लहानमोठ्या डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोरयांनी जव्हारचा परिसर व्यापलेला असून जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहानमोठ्या धबधब्यांनी ओलाचिंब असतो.
जव्हारच्या परिसरात खूप काही पाहण्यासारखे आहे. उदा. पूर्वीच्या राजाचा राजवाडा-जयविलास पॅलेस, दादर-कोप्रा फॉल, हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, भूपतगड, शिर्पा माळ ही ठिकाणं इतिहास प्रसिद्ध असून याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी सुरतेवरील स्वारीच्या वेळी तळ ठोकला होता. वारली लोकांची हस्तकला आणि चित्रकला यासाठी जव्हारचा परिसर प्रसिद्ध आहे.
आजच्या जव्हारला ६३२ वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जव्हार शहरातील नगरपरिषद, संस्थानचा राजवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिरपामाळ शिवरायांच्या सुरतेवरील स्वारीच्या आठवणी इतिहासप्रेमींच्या मनामध्ये जागवतोय. मुकणे गावातील `जयबाराज’ हे कोळी समाजाचे राजे होते. जयबा जमीनदार होते. त्यांचे उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि बुद्धीचातुर्यता आणि पराक्रमामुळे त्यांनी २१ लहान किल्ले जिकंले. त्याचबरोबर `भूपतगड’ किल्लाही जिंकला. अल्लाउद्दीन खिल्जी, मुहंमद तुघलक या मोघलांच्या स्वारींनी देवगिरीच्या हिंदवी साम्राज्याची वाताहत झाली. इ.स. १३१६ मध्ये `जव्हार` सस्थांनाला आकार येत होता. जयबा राजांना `धुळबा’ आणि `होळकरराव’ ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणार्या या प्रदेशाला आपल्या नामाचा `जय’ आणि शिवशंकराचे `हर’ असे मिळून `जयहर नम’ असे नामकरण केले. पुढे या जयहराचा `जव्हार’ असे नाव रूढ झाले. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया, १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहा राजे यांना भेटावयास आले.
विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला `शिरपामाळ ‘ असे संबोंधण्यात येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोघलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. सुरतेच्या स्वारीच्या दरम्यान शिवराय वाडा तालुक्यातील `कोहज ` गडावर मुक्कामी होते. विक्रम शहाराजे यांच्या पश्चात जव्हार संस्थानच्या गादीवर बसायचे कोणी? या कारणावरून वारसदारांमध्ये वादंग निर्माण झाले होते. या वादात इंग्रजांनी हस्तक्षेप करून राणी सगुणाबाई यांचा अज्ञान मुलगा पतंग शहा यांना बसविण्यात आले मुलाच्या अधिपत्याखाली राणी सगुणाबाई याच राज्यकारभार चालवत असत. पुढे धुळबा राजाचा नातू देवबा याचे मुस्लीम धर्मातर आणि राजघराण्यातील गादीचा वाद या कारणातून दानेशे वर्षापूर्वी जुना राजवाडा १८२० साली आगीने जळाला. यात राजवाडयातील ऐतिहासिक कागदपत्रे जळून खाक झाली. हा राजवाडा कृष्णराजाने बांधला होता. जुन्या राजवाडयाचा परिसर २१ हजार चौरस मीटर होता. इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत जव्हार सस्थांन अस्तित्वात होते. इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हार राजाकडे दमण नदी आणि सह्याद्रीपर्यंत प्रदेश आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापंर्यत महसूल गोळा व्हायचा.
१ सप्टेंबर १९१८ ला राजे `मार्तण्ड’ यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषदेची मुहूर्तमेढ रोवली. ही सर्व माहिती जव्हारसंस्थानच्या माहिती पुस्तकेतून मिळते. आजघडीला जुना राजवाडा भग्नावस्थेत पहावयाला मिळतो. राजवाडयाची इमारत दुमजली असून या इमारतीत सध्या नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. जुन्या राजवाडय़ाच्या आतील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावा, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले- मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसैंदर्याचा अस्वाद घेण्यासाठी येत असतात.
कसे जाल?
नजीकचे रेल्वे स्टेशन : इगतपुरी किंवा नाशिक (म.रे.), डहाणू (प.रे.)
इगतपुरी-जव्हार : ६१ कि.मी.
नाशिक-जव्हार : ८० कि.मी.,
डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.
मुंबई-जव्हार (कसारा मार्गे) : १८० कि.मी.
इगतपुरी-जव्हार : ६१ कि.मी.
नाशिक-जव्हार : ८० कि.मी.,
डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.
मुंबई-जव्हार (कसारा मार्गे) : १८० कि.मी.
No comments:
Post a Comment