"लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा मरता कामा नये", ह्या ऐतिहासिक वाक्याची साक्ष देणारा आणि शिवा काशीद यांनी दिलेले बलिदान अमर ठेवणारा किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळगड.
किल्ले पन्हाळा
"लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा मरता कामा नये", ह्या ऐतिहासिक वाक्याची साक्ष देणारा आणि शिवा काशीद यांनी दिलेले बलिदान अमर ठेवणारा किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळगड.
पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण किल्ला. महाराजांनी इ. स. १६५९ रोजी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज मोजक्या सहकार्यांबरोबर बाहेर पडून पन्हाळ्याहून विशाळगडावर पोहोचले. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार – पन्हाळा! पन्हाळ्याची उंची साधारणत: ८५० मी. आहे व घेर ८-९ कि. मी. आहे. वाघ दरवाजा, तीन दरवाजा, चार दरवाजा असे दरवाजे गडावर आहेत. गडावर मोठमोठी धान्याची कोठारे आहेत. त्यात गंगा व सज्जा कोठी ही महत्त्वाची धान्याची कोठारे आहेत.

कोल्हापूर शहरापासून २० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने चांगले विकसित झाले आहे. बाजूलाच जोतिबाचे मंदिर (जोतिबाचा डोंगर) आहे. निसर्गसंपन्नतेने नटलेल्या या किल्ल्यावर अगदी शेवटच्या टोकापर्यंत गाडी जाते. किल्ल्यावर राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. अनेक हॉटेल्स, लॉजेस गडावर आहेत. गडावर जणू एक गावच वसलेले आहे. विशेष बाब म्हणून शासनाने येथे गिरीस्थान नगरपरिषद स्थापन केलेली आहे.
कविवर्य मोरोपंताचे जन्मस्थान, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा तसेच शिवा काशीद यांचाही पुतळा इत्यादी महत्त्वाची ठिकाणे गडावर आहेत. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेवापूर येथे शिवा काशीद यांची समाधी आहे. छत्रपतींना सिद्धीच्या वेढ्यातून सोडवताना शिवा काशीद यांनी दिलेले बलिदान तसेच महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी केलेली पराक्रमाची शर्थ हा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहेच. महाराणी ताराबाई यांनी काही काळ कोल्हापूर गादीची राजधानी म्हणून पन्हाळा येथून कारभार पाहिला.
पन्हाळा गडावर पावसाळयात जोराचा पाऊस, धुके असले तरी, ऑक्टोबर ते जून पर्यंत अतिशय प्रसन्न वातावरण असते. असा पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याची मर्मबंधातील ठेव आहे. कोल्हापूरच्या वायव्येस सुमारे २१ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी हसरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. येथे पोहचण्यासाठी चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .
No comments:
Post a Comment