पैसा हा प्रत्येक मानवाच्या विकासातील एक महत्वाचा घटक आहे. पैसा मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने मेहनत करीत असतो. प्रत्येकाच्या मेहनतीचे स्वरू प वेगळे असले तरी त्यातून पैसा मिळवून भौतिक सुख सुविधा प्राप्त करणे हेच एकमात्र उद्दिष्ट आहे. आपण पैसे कमवितो. परंतू त्याची गुंतवणूक कशी करायची याबाबत मात्र कधी बारीक विचार करीत नाही.
शेअर मार्केट - गुंतवणूक पर्याय
पैसा हा प्रत्येक मानवाच्या विकासातील एक महत्वाचा घटक आहे. पैसा मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने मेहनत करीत असतो. प्रत्येकाच्या मेहनतीचे स्वरू प वेगळे असले तरी त्यातून पैसा मिळवून भौतिक सुख सुविधा प्राप्त करणे हेच एकमात्र उद्दिष्ट आहे. आपण पैसे कमवितो. परंतू त्याची गुंतवणूक कशी करायची याबाबत मात्र कधी बारीक विचार करीत नाही.
समाजात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. जादा पैशाची हाव बाळगण्यापेक्षा सुरक्षित पैसा महत्वाचा आहे. त्यामुळे आमच्याकडे पैसे गुंतवा आम्ही तुम्हाला चांगला परतावा अशा तोंडी हमी देणार्या अनेक गुंतवणूक कंपन्या बाजारात लाखाच्या घरात आहेत. परंतु गुंतवणूकदारांनीही विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी गुंतवणूकीचे काही पर्याय खाली दिले आहेत.
कंपनीच्या शेअर (समभाग भांडवला) मध्ये गुंतवणूक करणे :
‘शेअर’ किंवा ‘शेअर्स’ हे शब्द शेतकर्यांना नवीन नाहीत. बहुतेक शेतकरी सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था-सोसायटीचे शेअर होल्डर म्हणजे सभासद असतात म्हणजेच आपण अशा संस्थेच्या भांडवलात भागीदार, म्हणजे त्या प्रमाणात मालक असतो. आपण एकदा असे सभासद-सहभागीदार झाल्यानंतर जोपर्यंत असा भाग विकत नाही किंवा दुसर्यांच्या नावावर वर्ग करीत नाही तोपर्यंत आपल्याकडे तो मालकी हक्क असतो. अशी संस्था नङ्गा मिळवत असेल, तर आपल्या भांडवलाचे व्याज म्हणून जो नफ्यातील भाग परतावा म्हणून मिळतो, त्याला डिव्हीडंड असे म्हणतो (प्रत्यक्षात ते व्याज नाही), पण अशी संस्था नुकसानीत असेल तर डिव्हीडंड मिळत नाहीच उलट आपले भांडवलसुद्धा परत मिळत नाही अशा परिस्थितीत भांडवल परत मागण्याचा आपल्याला अधिकारही नसतो, कारण आपण मालक असतो. संस्थेचे नुकसान झाले तर प्रथम बाहेरची देणी द्यावी लागतात, त्यातून काही उरलेच तर मालकाचा नंबर लागतो. अगदी हेच व्यावसायिक कंपन्यांच्या शेअरबाबत असते. आपण आपल्याकडे असणारा पैसा, अशा व्यावसायिक कंपन्यांचे शेअर घेऊन गुंतवणूक करू शकतो. अशी गुंतवणूक दोन प्रकारे करता येते-
१) प्रायमरी इश्यू / पब्लिक इश्यू :
एखादी कंपनी जेव्हा पहिल्यांदा (काही वेळा एका पेक्षा जास्त वेळा) समाजातील गुंतवणूकदारांकडून उदा. - नागरिक, संस्था इ. भांडवल म्हणून पैसा गोळा करते, त्याला प्रायमरी इश्यू/ पब्लिक इश्यू असे म्हणतात. कंपनीच्या प्रवर्तकांना नवीन कंपनी उभारून उत्पादन करायचे असते किंवा सध्याच्या कंपनीचे एक्सपैंशन (उत्पादनक्षमता वाढवणे) करण्यासाठी भांडवल उभे करायचे असते. त्यासाठी प्रवर्तक प्रथम भांडवल किती उभे करायचे ते ठरवतो. उदा., रु. शंभर कोटी. हे शंभर कोटी गुंतवणूकदारांकडून मिळवण्यासाठी शेअर निर्माण करतो. अशा शेअरची ङ्गेस व्हॅल्यू (दर्शनी किंमत) ठरवतो.
उदा. : प्रति शेअर रु. १०० नंतर काही शेअरचा एक लॉट (ठराविक शेअरचे एक प्रमाणपत्र) रु. १०० प्रति शेअर या दराने एकूण किंमत रु. १०,०००/- होते. गुंतवणूकदारास कमीत कमी १०० शेअर घेण्यासाठी रु. १०,००० गुंतवावे लागतात. बर्याच वेळा प्रवर्तक ङ्गैस व्हॅल्यू (दर्शनी किंमत) पेक्षा आपल्या शेअरची बाजारातील किंमत वाढवतो त्याला प्रीमियम (अधिमूल्य - वाढीव किंमत) असे म्हणतात. गुंतवणूकदाराला असा शेअर कंपनीने ठरवलेल्या वाढीव किंमतीत घ्यावा लागतो. वरील उदाहरणात समजा प्रवर्तकांनी अशी वाढीव किंमत रु. ५० ठेवली असेल, तर तो प्रत्येक शेअर गुंतवणूकदाराला रु. १५० ला म्हणजे १०० शेअरचा लॉट रु. १०,००० ऐवजी रु. १५,००० ला पडतो.
एक वेळ शेअरची किंमत निश्चित झाल्यावर, कंपनी अर्ज छापून समाजातील गुंतवणूकदारांना वाटते. सदर अर्ज भरून गुंतवणूकदारांनी त्या रकमेचा ड्राफ्ट अथवा कंपनीने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पैसे भरावे लागतात. पैसे भरल्यानंतर एक-दोन महिन्यात शेअर मिळतो. पण बर्याच वेळा, कंपनी चांगली असेल तर, कंपनीच्या मागणीपेक्षा जादा अर्ज व जादा रक्कम जमा होते. अशावेळी कंपनी काही विशिष्ट पद्धतीने (नियमाप्रमाणे) छाननी करून गुंतवणूकदारांना शेअर देते. बर्याच वेळा काही गुंतवणूकदारांना शेअर वाट्यास येत नाहीत. अशा वेळी भरलेले पैसे, काही दिवसांनी परत मिळतात. ज्यांना शेअर दिला आहे त्यांना शेअर प्रमाणपत्र मिळतात. काही वेळा शंभर शेअरसाठी अर्ज असेल, तर ५० शेअर देऊन (ठरवलेल्या प्रमाणात) बाकी पैसे परत मिळतात. अशा रीतीने प्रायमरी इश्यू/ पब्लिक इश्यू मधून गुंतवणूक करता येते.
एक वेळ शेअरची किंमत निश्चित झाल्यावर, कंपनी अर्ज छापून समाजातील गुंतवणूकदारांना वाटते. सदर अर्ज भरून गुंतवणूकदारांनी त्या रकमेचा ड्राफ्ट अथवा कंपनीने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पैसे भरावे लागतात. पैसे भरल्यानंतर एक-दोन महिन्यात शेअर मिळतो. पण बर्याच वेळा, कंपनी चांगली असेल तर, कंपनीच्या मागणीपेक्षा जादा अर्ज व जादा रक्कम जमा होते. अशावेळी कंपनी काही विशिष्ट पद्धतीने (नियमाप्रमाणे) छाननी करून गुंतवणूकदारांना शेअर देते. बर्याच वेळा काही गुंतवणूकदारांना शेअर वाट्यास येत नाहीत. अशा वेळी भरलेले पैसे, काही दिवसांनी परत मिळतात. ज्यांना शेअर दिला आहे त्यांना शेअर प्रमाणपत्र मिळतात. काही वेळा शंभर शेअरसाठी अर्ज असेल, तर ५० शेअर देऊन (ठरवलेल्या प्रमाणात) बाकी पैसे परत मिळतात. अशा रीतीने प्रायमरी इश्यू/ पब्लिक इश्यू मधून गुंतवणूक करता येते.
२) सेकंडरी मार्केटमधून खरेदी :
शेअर मार्केट हे कंपन्यांच्या शेअरची व इतर काही गुंतवणूक प्रकाराची, खरेदी-विक्री होणारे भारतातील प्रचंड मोठे मार्केट आहे. सदर मार्केटमध्ये रोज लाखो-करोडो रुपयांची खरेदी-विक्री होत असते. कंपनीच्या शेअरची किंमत दिवसातून अनेक वेळा कमी-जास्त होत असते. अशा मार्केटमधून आपण कोणत्याही कंपनीचे कितीही शेअर, (अगदी एक-दोन शेअरसुद्धा) खरेदी व विक्री करू शकतो. असे शेअर कमी किंमत असताना घेऊन किंमत वाढल्यानंतर कधीही विकू शकतो.
आज घेतलेल्या शेअरची किंमत उद्याही वाढू शकते, त्याचप्रमाणे कमीही होऊ शकते. उदा. : आज आपण रु. १०,००० चे शेअर घेतले तर त्याची किंमत उद्या ११,००० सुद्धा होऊ शकते व ९००० सुद्धा होऊ शकते.
जोखीम (रिस्क) -
शेअर मार्केटवर शासनाचे बर्याच अंशी नियंत्रण असते. सेबी (सिक्युनरिटी व एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) ही स्वतंत्र संस्था या मार्केटवर नियंत्रण ठेवत असते. असे असले तरी शेअरचे भाव, अनेक गोष्टींवर अवलंबून असतात, ते गुंतवणूकदारांच्या हातात ङ्गारच कमी असते. या व्यापारात माणूस लाखो रुपये कमावू शकतो, तसेच घालवू पण शकतो. या व्यवहारात सुदृढ आर्थिक क्षमतेबरोबर जोखीम घ्यायची तयारी हवी. घेतलेल्या शेअरची किंमत वाढणे किंवा कमी होणे हे त्या-त्या कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर, प्रवर्तकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असले तरी देशातील एकंदरित आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक स्थिती, आंतरराष्ट्रीय घडामोडीचाही परिणाम होत असतो. त्यामुळे या व्यवसायात व्यवहार करणारे एका रात्रीत लक्षाधीश पण होतात, तसेच कर्जबाजारी होऊन रसातळालाही जातात. काहींनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. या व्यवहारात शेअर मार्केटचे चांगले ज्ञान असेल, रोजच्या घडामोडींचा अभ्यास असेल, तर माणूस चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावू शकतो.
मर्यादा -
शेतकर्यांना रोजच्या कामातून अशा व्यवसायात लक्ष देणे व रोज बाजाराचा अभ्यास करणे कठीण आहे. शिवाय याचे सर्व व्यवहार इंग्रजीतून होतात. टीव्हीवर यासाठी सतत माहिती देणारे स्वतंत्र चॅनेल आहे. या चॅनेलवर सर्व प्रकारची माहिती मिळते. ती हिंदी किंवा इंग्रजीत असते. प्रत्येक प्रमुख कंपन्यांच्या शेअरच्या दरांचे चढ-उतार सदर चॅनेलवर खाली पट्टीच्या स्वरूपात (हिरव्या रंगात व लाल रंगात) दाखवले जातात. या व्यवहारासाठी स्वतंत्र डी-मॅट खाते उघडावे लागते. ही सोय प्रत्येक बँकेत नसते. पूर्वीप्रमाणे शेअरचे व्यवहार कागद स्वरूपात नसून, इलेक्ट्रॉॅनिक स्वरूपात आपल्या डी-मॅट खात्यावर परस्पर करता येतात. त्यासाठी आपल्या घरी कॉम्प्युटर व इंटरनेट असेल तर घरात बसून लाखो रुपयांचे खरेदी-विक्री व्यवहार करता येतात. यासाठी कोणत्याही बाजारात जायची गरज नाही. सदर डी-मॅट खाते आपल्या बचत खात्याशी जोडलेले असते. शेअर खरेदी केले तर आपल्या बचत खात्यातून पैसे आपोआप खरेदीसाठी वर्ग होतात, तसेच शेअरविक्रीचे पैसे पण आपोआप बचत खात्यात जमा होतात.
जर आपल्या घरी कॉम्प्युटर व इंटरनेटची सोय नसेल तर या धंद्यात असणार्या ब्रोकर मार्फत आपण हे व्यवहार करू शकतो, पण तो विश्वासू हवा. या व्यवसायातील गुंतवणुकीतून नफा कमवायचा असेल तर त्यात आपल्याला पुरेसे ज्ञान हवे. मार्केटचा रोजचा अभ्यास हवा. शेतकर्यांना हे अवघड आहे, पण देशात उपलब्ध असणारा गुंतवणुकीचा, नफा कमावण्याचा एक चांगला मार्ग असल्याने कमीत कमी जुजबी ज्ञान तरी आपल्याला व्हावे या उद्देशाने सदर माहिती दिली आहे.
-आर. व्ही. माळी
(लेखक देना बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून चेन्नई येथे कार्यरत आहेत.)
No comments:
Post a Comment