थोडं माझ्या विषयी

Monday 30 March 2015

इतिहासाचा अमुल्य ठेवा 'अजिंठा'

प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून सार्‍या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं.


इतिहासाचा अमुल्य ठेवा 'अजिंठा'

प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून सार्‍या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत १९८२ मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून १०७ किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे ७६ मीटर उंचावरील घोड्याच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठ्याच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठ्यापर्यंतच्या दोन-अडीच तासांचा कालावधी लागतो.१९ व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन या परिसरात आला असताना त्याला इथल्या १० व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौद्ध लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन ५०० ते ६०० अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं खरंच कौतुक करावायास हवें.

बौद्ध भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण आहें. अंधार्‍या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.या तीस लेण्यांपैकी ९, १०, १९, २६ व २९ या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाच्या काळात झाली. यामध्ये ९, १० या चैत्यगृहांसह १२, १३ व १५ व्या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुद्धप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर ११ क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुद्धप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुद्धप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणी केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.

बुद्धाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास २६ व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.पहिल्या गुहेतील भगवान बुद्धाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहर्‍यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहर्‍यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहर्‍यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच. याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. 

सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं.पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहेत. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वार्‍याच्या झुळुकीसरशी फडफडणार्‍या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृद्ध व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते.

बौद्ध लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुद्धांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील २४ फुटी बुद्ध मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत.अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठ्या आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते.

साद सागराची...अलिबाग-मुरुड-जंजिरा

अलिबाग-मुरुड परिसरात अनेक चांगली पर्यटनस्थळे विकसित झालेली आहेत. मांडवा, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, नांदगाव, मुरुड या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो. जवळ जवळ वर्षभर येथे पर्यटकांचा राबता असतो. दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्टीत यात मोठ्या प्रमाणावर भर पडते. त्यामुळे याच वेळेस पर्यटन महोत्सव आयोजित केले जातात.


साद सागराची...अलिबाग-मुरुड-जंजिरा

अलिबाग-मुरुड परिसरात अनेक चांगली पर्यटनस्थळे विकसित झालेली आहेत. मांडवा, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, नांदगाव, मुरुड या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो. जवळ जवळ वर्षभर येथे पर्यटकांचा राबता असतो. दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्टीत यात मोठ्या प्रमाणावर भर पडते. त्यामुळे याच वेळेस पर्यटन महोत्सव आयोजित केले जातात. 

अलिबाग बीच -

अलिबाग एस.टी. स्थानकापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर पश्चमेस साधारण ४-५ किमी. लांबीचा वालुकामय किनारा आहे. मारूती नाक्यावरून थेट पश्चमेला किनार्‍याकडे जाणारा रस्ताही तितका स्वच्छ व हवेशीर. या रस्त्यावरून तुम्ही जेव्हा किनार्‍याकडे जाल तेव्हा वाटेत सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिस, जिल्हा रूग्णालय, शासकीय विश्रामगृह, जिल्हा परिषद पत्रकार भवन ही अलिबागमधील महत्वाची ठिकाणे येतील. उजव्या हाताला क्रिडाभुवनचे प्रशस्त मैदान लागेल. किनार्‍यावर पोहोचल्यावर ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याचे दर्शन होईल.

संपूर्ण किल्ल्याचे अवलोकन करीत मऊशार वाळूतून चालत असता किनार्‍यावरील सुरूची उंचच उंच झाडे त्यांना साथ देणारी नारळाच्या झाडांची शोभा आपले मन खचितच मोहून टाकेल यात शंका नाही. किनार्‍यावरील खाजगी व सरकारी बंगल्यामुळे हा किनारा अधिकच खुलून दिसतो. शिवाय किनार्‍यावर शहाळयाचे पाणी आईस्क्रम भेळपूरी पॅटीस इ. खादयपदार्थ विक्रेते क्षुधाशांतीसाठी आहेतच. सागरलाटांच्या खळाळत्या नादसौदर्याचा अनुभव येथेच घ्यावा. जसजसा सूर्य अस्तास लावू लागेल तेव्हा जरा क्षितीजाकडे नजर टाका व आकाशाच्या रंगपटावर उधळणार्‍या सप्तरंगाची आतिषबाजी पहा. अशावेळी अंधुक प्रकाशात समोरील किल्ल्याचा गगनभेदी दरारा आपणांस हळूच इतिहासात ओढू लागेल. वाळूतून लगबगीने फले टाकीत पाठीवर जाळे सांभाळीत ओल्या कपडयांची पर्वा न करता आपल्या मस्तीत गात गात घरी निघालेल्या मच्छमार बांधवांच्या कोळीगीताला साथ देण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही.
अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्दीस आल्यापासून अलिबाग बीचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. जरी वर्दळ असली तरी आवाजाचे प्रदूषण नाही. म्हणूनच ही बीच म्हणजे अलिबागचे एक वैशिष्टय आहे.

किहिम बीच -

अलिबागपासून १२ कि.मी. अंतरावर इतर किनार्‍याप्रमाणेच निसर्गाचे वरदान घेऊन किहीमचा रम्य किनारा निसर्गप्रेमिकांचे मन रिझवत आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावरील चढी किहीम फाटयावर उतरल्यावर पश्चमेकडे जाणारा रस्ता हा किहीम गावातून समुद्रकिनारी जातो. छायाचित्रणासाठी आपणांस अनेक नैसर्गक सौंदर्यस्थळे या किनार्‍यावर आढळतील. नारळीर्‍पोफळींची दाट वनश्री आणि आकाशाला गवसणी घालणारी सुरूची झाडे किनार्‍याची शोभागिुणीत करतात. त्यामुळेच या किनार्‍यावर पर्यटकांची खूप गर्दी असते. येथील सृष्टीसौंदर्यात आगळीच भर टाकणारा स्वच्छ नितळ अथांग सागर पर्यटकांना कुठल्याही ऋतुत आग्रहाचे निमंत्रण देत असतो.
या समुद्रकिनारी महाराष्ट पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी तंबुंची सोय करण्यात आलेली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात माडांच्या गर्द झाडीत समुद्राच्या कुशीत रहाण्याची मौज काही औरच मात्र ही मौज अनुभवयाची ती फक्त उन्हाळा किंवा हिवाळयातच. पावसाळयात तंबूत रहाण्याची मजा लुटता येत नाही. परुतु वर्षाचे बाराही महिने किहीम गावात अनेक ठिकाणी घरगुती रहाण्याची तसेच भोजनाची व्यवस्था होते.

आक्षी बीच -

अलिबाग-खेदंडा रोडवर अलिबाग स्थानकापासून सुमारे ५ किमी. अंतरावर आक्षीचा किनारा आहे. येथे जाण्यासाठी आक्षी स्थानकाजवळ असलेल्या स्तंभाजवळून आतमध्ये एक ते दीड किमी. जावे लागते. स्वतचे वाहन असल्यास थेट किनार्‍यापर्यंत आपण जाऊ शकता. किनारा स्वच्छ सुंदर प्रदुषणविरहित असून सुरूच्या बनांनी नटलेला आहे. या किनार्‍यावरून आपल्याला अलिबाग बीचचे तसेच तसेच कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते.

काशिद बीच -

मुरूडच्या उत्तरेस जवळपास १८ किमी. अंतरावर गोव्यामधील बीचची आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

काशिदच्या किनार्‍यावरील सुरूंच्या नयनमनोहरी बागांतून विश्रांतीस थांबलेल्या पर्यटकांची गर्दी पाहूनच या स्थानाचे महत्व लक्षात येते. विकएंडला शेकडो पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी जमतात. मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांचे शूटींग येथे सातत्याने होत असते.
समुद्रकिनारी छोटया स्टॉलपासून परिपूर्ण सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद बीच पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.

नागाव बीच -

येथे जाण्यासाठी अलिबाग एस.टी. स्थानाकापासून अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर ७ किमी. अंतरावर असणार्‍या नागांव ऑफीस येथे उतराव लागते. तेथील शिवछत्रपतीच्या पुतळयाजवळील रस्त्याने गेल्यावर दोन-अडीच किमी. अंतरावर हे बीच आहे. या बीचला साताड बंदर असेही म्हणतात. येथील वैशिष्टय म्हणजे किनार्‍यावरील एका रांगेत असणारी डौलदारपणे डुलणारी सुरूची झाडे व रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा त्यावर फेसाळणार्‍या अथांग समुद्राच्या पांढर्‍याशुभ्र लाटा पर्यटकांना फारच मोहीत करतात. येथे पर्यटकांसाठी नाष्टा जेवण तसेच निवासाच्या भरपूर सोयी आहेत. पर्यटक या किनार्‍यावर इतके खुश आहेत कि महाराष्ट शासनाने पर्यटकांच्या ष्टीकोनातून या किनार्‍याकडे विकासाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. पर्यटकांना मोहविणार्‍या या निसर्गसंपन्न किनार्‍याला जरूर भेट द्या.

रेंवदंडा बंदर -

अलिबाग स्थानकापासून १७ किमी. अंतरावर असणारे हे ऐतिहासिक बंदर आहे. याच ठिकाणी रोहयाहून येणार्‍या कुंडलिका नदीचा अरबी समुद्राशी संगम होऊन खाडी तयार झाली आहे. रेवदंडा बंदराच्या पलिकडे साळाव गावापासून मुरूड तालुक्याची हद्द सुरू हते. या खाडीवर बांधलेला मुरूड आणि अलिबाग तालुके जोडणारा वाहतुकीच्या संदर्भात उपयुक्त ठरणारा साळाव खाडी पूल १९८६ पासून वाहतुकीस खुला झाला आहे. या पुलावरून मुद्दामहून फेरफटका मारा. सभोवतालच्या नैसर्गिक परिसराची अजब किमया तुम्हाला गुंग करील. साळावकडील टोकावरून संपूर्ण रेवदंडाचा परिसर सागराचे विलोभनीय दर्शन खाडीतील गलबतांची वहातुक तसेच डाव्या बाजूला दूरवर दिसणारे विक्रम इस्पात कंपनी तर उजव्या बाजूस या पुलाजवळच विक्रम इस्पात कंपनीची जेटी दिसते.

रेवदंडा बंदराजवळच एस.टी. स्थानक तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचे स्थानक आहे. एस.टी. स्थानकाच्या मागील बाजूस खाडीत छोटासा धक्का पकटी आहे. या भागात मासेमारीचा व्यवसाय जोरात चालतो. मासे पकडून आणलेली गलबते होडया या धक्क्याजवळच थांबतात. या ठिकाणी ताज्या मासळीची खरेदी-विक्री होते.

रेवस बंदर -

अलिबाग एस्. टी. स्थानकापासून सुमारे २३ किमी. अंतरावरील हे बंदर मुंबई-रेवस वहातुकीमुळे एक महत्त्वाचे बंदर ठरले आहे. मुंबईहून लाचने येणारे प्रवासी तसेच उरणहून करंजामार्गे तरीने येणार्‍या प्रवाशांची वर्दळ नेहमीच या बंदरावर असते. बंदराभोवतालचा सारा भूप्रदेश नैसर्गक सौंदर्याने नटलेला आहे. धक्कयावर उभे राहिले असता समोर करंजार्‍उरणचा किनारा उंच भागातील छोटे-छोटे बंगले मच्छमार बांधवांची गलबते तसेच लाटांवर डुलणार्‍या होडयांची विलोभनीय दृष्ये नजरेस पडतात. हवामान स्वच्छ असल्यास मुंबईतील गगनचुंबी इमारतींचे दर्शनही खेस धक्कयावरून होते. या बंदराच्या परिसरात फिरताना एक वेगळाच आनंद मिळतो. धक्कयापासून जवळच एस्. टी. स्थानक आहे तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचीही उत्तम सोय आहे.

मांडवा बंदर -

अलिबाग एस्.टी. स्थानकापासून सुमारे १९ किमी. अंतरावर हे एक निसर्गसंपन्न बंदर आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावर मांडवा फाटयावर उतरून बंदराकडे जावे लागते. इतर बंदरांप्रमाणे नैसर्गक सृष्टीसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे हे आगळेवेगळे असे पिकनिक पॉईंट झाले आहे.

या बंदराच्या धक्कयाला मुंबईहून (गेट वे ऑफ इंडिया ) येणार्‍या पी.एन्.पी. सर्व्हसेस कॅटमरान अजंठा कॅटमरान यांच्या स्पीडबोट तसेच अजंठा सर्व्हीस अलसिद्दीक मोटार बोट लागतात. मांडव्याच्या समुद्रकिनारी अनेक धनिक लोकांचे बंगले तसेच फार्महाऊस आहेत.

शितळादेवी मंदिर -

अलिबाग स्थानकापासून सुमारे १७ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून अंदाजे तीन किमी. अंतरावर पुरातन असे शितलादेवी मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी अलिबाग स्थानकातून अलिबाग-रेवदंडा एसटीने चौलनाका येथे उतरावे लागते. तेथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षांची उत्तम सोय आहे. स्वतच वाहन असल्यास थेट मंदिरापर्यंत जाता येते.

पूर्वीची स्थती लक्षात घेता हे मंदिर चौलच्या दक्षिणेस खाडीजवळ होते. परंतु सद्यस्थतीतील जवळपासची खाडी भरून बरीच जमीन वाढली आहे. या ठिकाणी पूर्वी आंग्रेकालीन लाकडी व कौलारू मंदिर होते. त्याचा १९९० साली जिर्णोध्दार होऊन येथे सिमेंट काक्रेटचे मंदिर उभारण्यात आले. गाभार्‍यात देवीची मूर्ती मूळच्या ठिकाणीच स्थानापन्न आहे. पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशाराशिवाय उत्तर व दक्षिण बाजूसही प्रत्येकी एक प्रवेशार आहे.

येथील देवीचे स्थान हे जागृत समजले जाते. त्यामुळे या मंदिराला बरेच भाविक पर्यटक आवर्जुंन भेट देतात.

श्री विक्रम विनायक मंदिर -

अलिबागपासून सुमारे २० किमी. तर मुरूडपासून ३२ किमी. अंतरावर साळाव या निसर्गरम्य गावी उंच टेकडीवर श्री विक्रम विनायक मंदिर बांधले आहे. या ठिकाणी बिर्ला उद्योग समुहाच्या विक्रम इर्स्पात कंपनीचा भव्य प्रकल्प असून सदर मंदिर बिर्ला उद्योग समूहाने बांधले आहे. पांढर्‍याशुभ्र संगमरवरातून साकारण्यात आलेला मंदिराचा भव्य कळस अती दूरवरूनही नजरेस पडतो. टेकडीच्या पायथ्याशी प्रवेशार आहे. येथून मंदिराकडे जाणारा रस्ता पायर्‍यांचा आहे तसेच पायर्‍यांच्या जवळूनच नागमोडी वळणाचा वाहनांसाठी बनवलेला रस्ताही आहे. मंदिराच्या सभोवताली नयनरम्य बागबगिचा असून त्यातील फुलझाडे रंगीत कारंजी नेत्रसुखद आकर्षक असल्यामुळे मन प्रसन्न होते. मंदिराचा सभामंडप चारही बाजूंनी मोकळाच असून छत पारदर्शक पॉलिकॉप र्शिटचे असल्यामुळे सभामंडपात प्रकाश व मोकळया हवेचा संचार असतो. मंदिराच्या चौकोनी गाभार्‍यात श्री गणेशाची भव्य मूर्ती आहे. बाजूच्या लहान मंदिरातून राधा-कृष्ण शंकर-पार्वती देवी दुर्गामाता आणि सुर्यदेव यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या परिसरीतील बागेमध्ये स्व. आदित्य बिर्ला यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. बागेचा परिसर व मंदिर यांतील विद्युत रोषणाई नेत्रदिपक व आकर्षक आहे.

अल्पावधीतच या मंदिराची किर्ती महाराष्टाबाहेर पोहोचल्यामुळे या ठिकाणी भक्तगण तसेच पर्यटक सतत येत असतात. सकाळी ९.०० आणि संध्याकाळी ७.१५ वाजता मंदिरात आरती व पूजा होते. सकाळी ६.०० ते ११.३० व संध्याकाळी ४.३० ते ९.०० या वेळेतच मंदिरात प्रवेश दिला जातो. अलिबागपासून मंदिरापर्यंत तसेच रेवदंडयापासून मंदिरापर्यंत एस.टी. तसेच तीन सहा आसनी रिक्षांची उत्तम सोय आहे. भक्तांना मनशांती व सुख समाधान लाभणारे हे ठिकाण आहे.

श्री दत्त मंदिर (चौल-भोवाळे) -

अलिबागपासून १६ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून २ किमी. अंतरावर भोवाळे या निसर्गरम्य गावातील गोंगरवजा टेकडीवर हे दत्तमंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर पायर्‍या पायर्‍यांनी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत विलोभनिय वाटतो. साधारण पाचशे पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या हाताला एक लहानसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ आहे. पुढे साधारण पंचवीस तीस पायर्‍या चढून गेल्यावर श्री दत्त मंदिर विश्रारांती स्थान म्हणून सद्गुरू बुरांडे महाराज समाधी पहावयास मिळते. पुढे सुमारे दिडशे पायर्‍यानंतर सत्चित आनंद साधना कुटी आहे. त्यापुढे हरे राम विश्रामधाम त्यानंतर हरे राम बाबांचे धुनीमंदिर त्यापुढे औदुंबर मठ पहावयास मिळतो. इथपर्यंत आल्यानंतर आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या दत्तमंदिराच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदासबाबा मठ आहे.

दत्तमंदिरातील दत्तमुर्ती त्रिमुखी सहा हात असलेली पाषाणाची आहे. देवळाभोवती प्रदक्षिणेसाठी मोकळी जागा आहे. मुख्य गाभारा थोडासा उंचावर आहे. देवालयाच्या कमानीपासून गाभार्‍यापर्यंत छोटासा जिना आहे. दरवर्षी दत्तजयंतीपासुन पाच दिवस दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या पाच दिवसांत फार मोठी जत्रा भरते. सदर दत्तमंदिर आज महाराष्ट व इतरत्र एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.

चौलचे श्री रामेश्वर मंदिर -

अलिबाग रेवदंडा रोडवर अलिबागपासून सुमारे १४ किमी. अंतरावर प्राचीन असे हे रामेश्वर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून समोर पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमांडपथिय पध्दतीसारखे वाटते. परंतु ते केंव्हा व कुणी बांधले याचा उल्लेख मिळत नाही. सदर मंदिराचा जिणोध्दार अनेकदा झाल्याच्या आंग्रेकालीन नोंदी आहेत. 

रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १.५ मीटर लांब रूंद व जमिनिपासून थोडी उंच पितळी पत्र्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खयात स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे. गाभार्‍याच्या जमिनीपासून सुमारे ७. ६२ मीटीर उंच असलेल्या शिखराचे व संपूर्ण गाभार्‍याचे बांधकाम दगडी आहे. गाभार्‍याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभार्‍याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपात उभे राहिले असता उजव्या बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या बाजूस कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे तर मध्यभागी अग्नीकुंड आहे. 

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. महाशिवरात्रीच्या वेळी मोठा उत्सव साजरा केला जातो.

नांदगावचा श्री सिध्दीविनायक -

मुरूडच्या उत्तरेस जवळपास ९ किमी. अंतरावर हे नांदगावचे प्राचीन सिध्दीविनायक मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे समस्त श्रध्दाळूंचे श्रध्दास्थान सोळाव्या शतकातील प्रसिध्द जोतिर्वोद पंचांगकर्ते गणेश दैवज्ञ यांच्या घराण्यांचे सिध्दीविनायक हे आराध्य दैवत होय. अष्टविनायकाच्या दर्शनाची फलश्रुती या गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण होते. अशी गणेशभक्तांची श्रध्दा आहे.

माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येथे माघी गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा होतो. येथील एकदिवसीय यात्रेचे मोठे आकर्षण असते. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला असंख्य भक्त सिध्दीविनायकाच्या दर्शनास आवर्जुन येतात.

श्री कनकेश्वर -

अलिबाग पासून सुमारे १३ कि. मी. अंतरावर, शहराच्या इशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा ९०० फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण १२७५ फूट इतकी होईल. 

श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे. 

नगमोडी वळणाने पायर्‍यांवरुन चालताना जवळपास ५००० फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस 'मोहनगिरी' व 'बालगिरी' या दोन तपस्व्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर 'नागोबाचा टप्पा' आहे, येथुन ७५० फूटावर 'जांभळीचा टेप' लागतो, पुढे साधारण १०० फूटावर एक पायरी लागते त्यास ’’ देवाची पायरी ’’ असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे 'पालेश्वर' हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर 'ब्रम्हकुंड' लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे. 

या ठिकाणी भाविक पर्यटकांच्या रहाण्याची तसेच घरगुती भोजनाची उत्तम सोय आहे.

मुरुड- जंजिरा -

रायगड जिल्ह्यातील हा आणखी एक इतिहासप्रसिद्ध किल्ला होय. पण हा किल्ला भर समुद्रात बांधण्यात आला असून मराठी दौलतीच्या इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख अनेकवार केलेला दिसतो. कोकण किनाऱ्याला लागूनच अलिबागच्या दक्षिणेकडे, अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव असून ते इतिहास प्रसिद्ध आहे. या गावाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा आसमंत हिरवागार आहे. मुरूडच्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा `नबावाचा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते.

मुरूड पासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर भर समुद्रातील बेटावर जंजिरा किल्ला उभा आहे. मुळातच मुरूडचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. किनाऱ्यावरून दिसणारा हा भव्य किल्ला तर सौंदर्यात आणखीनच भर टाकतो.

मुरूडचा जंजिरा किल्ला चहू बांजूनी पाण्याने वेढला आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी नावेने प्रवास करावा लागतो. किल्ल्यातील अंतर्भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पीर पंचायतन, सुरूलखानाचा वाडा, किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि या तटबंदीवर उभारण्यात आलेले अनेक भक्कम बुरूज आजही काळाशी टक्कर देत आहेत. किल्ल्यातील या बुरूजावरून बसविलेल्या काही तोफा आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.

३५० वर्षापूर्वी अहमदनगरचा राजा मलिक अंबरने या अभेद्य जलदुर्गाची उभारणी केली, असा इतिहासाचा दाखला आहे. कोकण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्व जलदुर्गात हा किल्ला अतिशय भक्कम आणि अभेद्य असल्याने तो सदैव अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच त्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला सर करण्याचे अनेकदा प्रयत्न केले, पण ते असफल झाले. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही.

Thursday 26 March 2015

पाचगणी

पाचगणी हे नाव त्याच्या सभोवताली असलेल्या पाच डोंगरांवरून पडलं आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची महाबळेश्वरपेक्षा फक्त ३८ मीटर कमी म्हणजे १,३३४ मीटर आहे. परंतु हे ३८ मीटर खाली उतरण्याचा मार्ग वळणावळणाचा, एका बाजूला काळजाचा थरकाप करणारं कृष्णा नदीचं खोल पात्र, तर दुस-या बाजूला पठारी प्रदेश असा आहे.


पाचगणी

पाचगणी हे नाव त्याच्या सभोवताली असलेल्या पाच डोंगरांवरून पडलं आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची महाबळेश्वरपेक्षा फक्त ३८ मीटर कमी म्हणजे १,३३४ मीटर आहे. परंतु हे ३८ मीटर खाली उतरण्याचा मार्ग वळणावळणाचा, एका बाजूला काळजाचा थरकाप करणारं कृष्णा नदीचं खोल पात्र, तर दुस-या बाजूला पठारी प्रदेश असा आहे.

पाचगणी हे एक निवासी थंड हवेच्या ठिकाणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ब्रिटिश राजवटीचा शिक्का जणू इथं वज्रलेपासारखा उमटलेला आहे. जुन्या ब्रिटिश इमारती, पारशी घरं, एक शतक किंवा त्याहूनही अधिक काळ चालत आलेली येथील निवासी विद्यालयं यांच्या इमारतींच्या स्थापत्यातून ही छाप आपणाला जाणवते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या शतकाची ओझरती चुणूक बघायची असेल, तर म.प.वि.म. ला काही जुन्या ब्रिटिश वा पारशी घरांच्या भेटीची व्यवस्था करायला सांगा.

घनदाट हिरव्या वृक्षराजीचं छत्र लाभलेल्या छोटया रस्त्यांतून रमतगमत फिरलात, तर निसर्गसौंदर्याची मजा लुटायला मिळेल. छोटया छोटया वाड्या, दरीतून नागिणीप्रमाणे वळणं घेत जाणारी कृष्णा नदी शेकडो मीटर उंचीवरून जाताना दृष्टीस पडते. टेबल लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणा-या डोंगर माथ्यावरील पठारावर उभं राहून पश्चिमेकडे नजर टाकलीत, तर समुद्रसपाटी प्रदेशाचं मनोहारी दर्शन घडतं. जणू जलरंगात काढलेली लघुचित्रंच ! येथे असलेल्या अनेक तबेल्यांमधून एखादा घोडा ठरवा आणि नं मळलेल्या पायवाटांनी, प्रेमिकांच्या गुप्त चोरवाटांनी गुंफाकडे किंवा कमल गडाकडे कूच करा किंवा बाजारात भटका. अति गर्दी नसणारे आणि मनाला आल्हाद देणारे पाचगणी प्रत्येक पर्यटकाला खोलवर भावणारं एक दुर्लभ ठिकाण आहे.

टॅक्सी अगदी सहज मिळत असल्या, तरी लांब पल्ल्याच्या अंतरासाठी भाड्याच्या सायकली वा घोडे घेऊन रपेट करण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे.

तपमान थंडीत १६ अंश सें. ते उन्हाळ्यात ३५ अंश सें. पाऊस वार्षिक सरासरी २१६ सें.मी. सप्टेंबर ते मार्च हा येथे सहलीला येण्याचा उत्तम काळ.

कसं जायचं? : ९८ कि.मी. अंतरावरील पुणे हा सर्वांत जवळचा विमानतळ व सर्वांत सोयीचं रेल्वे स्टेशन. तेथून बसनं येता येतं. मुंबईपासून पाचगणी, महाड मार्गे २६६ कि.मी. आहे. पुण्या-मुंबईहून राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवाबरोबर म.प.वि.म. च्या आराम बससेवाही उपलब्ध आहेत. महाबळेश्वर ते पाचगणी अंतर फ़क्त १९ कि.मी. असल्यामुळे पर्यटक ही दोन्ही स्थळांना भेट दिल्याशिवाय रहात नाही.

निवास : म.प.वि.म.चं ‘फाईव्ह हिल्स’ हे शहरातील उत्कृष्ट हॉटेलांपैकी एक गणलं जातं.  

Wednesday 25 March 2015

तारकर्ली

निळेशार पाणी विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा त्याच्या जोडीला बांबूची बने, सुपारीच्या बागा आणि water sports ची असलेली उत्तम सोय पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अगदी आदर्श असे स्थळ जणू काही महाराष्ट्राचे मॉरिशस अशी ज्याची ओळख करून दिली जाते ते ठिकाण म्हणजे तारकर्ली.


तारकर्ली

निळेशार पाणी विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा त्याच्या जोडीला बांबूची बने, सुपारीच्या बागा आणि water sports ची असलेली उत्तम सोय पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अगदी आदर्श असे स्थळ जणू काही महाराष्ट्राचे मॉरिशस अशी ज्याची ओळख करून दिली जाते ते ठिकाण म्हणजे तारकर्ली.

सर्वत्र पसरलेले अत्यंत पारदर्शी असे पाणी, निमुळता होत गेलेला किनारा जिथे अरबी समुद्राचे कार्ली नदीत होणारे रुपांतर म्हणजे तारकर्ली. समुद्राचे अथांग पसरलेले निळेशार पाणी मनाला एकप्रकारचा तजेला देते आणि सुखावून जाते. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी , निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे.

तारकर्ली च्या जवळच असलेल्या देवबाग ह्या ठिकाणाहून सुटणाऱ्या बोटींमधून आपण तारकर्ली आणि आसपासच्या स्थळांना भेट देऊ शकतो. सकाळी ७ पासून ह्या बोटी सफरीवर जाण्यासाठी तयार असतात. जितके लवकर जाऊ तितके डॉल्फिन माशांचे दर्शन होण्याचा योग जास्त.

ह्या सफरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आवर्जून पाहावे असे संगम ठिकाण जिथे कार्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होतो. ह्या ठिकाणी sea gull पक्षांचे थवे हमखास दिसून येतात. संगम च्या थोडेसे पुढे गेले कि सोनेरी दगड दिसू लागतो दिवसा ह्या कातळावर सूर्यप्रकाश पडला कि हा दगड अगदी सोन्यासारखा दिसतो त्यामुळे ह्या दगडाचे नामकरण GOLDEN ROCK असे झाले आहे. नदीच्या शांत पाण्यातून वाटचाल करताना क्षणार्धात जेव्हा आपण समुद्राकडे झेपावतो तेव्हा लाटांचा एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो. त्याच जोडीला डॉल्फिन माशांचे होणारे दर्शन हे ह्या सफरीला चार चांद लावून जातात. जवळच असलेला अगदी निर्मनुष्य असा निवती किनारा बहुतकरून दगडांनी वेढलेला डोळ्यांचे पारणे फिटवतो.

सध्या म्हणजे २००६ साली आलेल्या सुनामी च्या भरतीमुळे इथे निर्माण झालेले साधारण ५०० मी च्या घेराचे नवीन बेट हे अजून एक आकर्षणाचे ठिकाण. भरतीच्या वेळी मात्र या बेटावर पाणी चढायला सुरूवात होते. या आयलंड वरून water sports ची मजा घेण्यासारखा दुसरा आनंद नाही.

सध्या तारकर्ली एकूणच पर्यटकंच्या सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण झाले आहे त्याचमुळे तशाच सुविधा देखील इथे निर्माण झाल्या आहेत. प्रामुख्याने घरगुती राहण्याच्या भरपूर सोयी उपलब्ध झाल्या आहेत. MTDC बीच रिसोर्ट तसेच हाउस बोटींची असलेली सुंदर व्यवस्था हे 
तारकर्लीचे खास वैशिष्ट्य. मांसाहारी लोकांसाठी तारकर्ली म्हणजे must visit place असे म्हटले जाते ह्याचे कारण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे मासे.

तारकर्लीला कसे जाल?

रस्त्याने : कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकावर उतरून खाजगी वाहनाने थेट तारकर्ली चा प्रवास करता येतो. बस चा पर्याय देखील उपलब्ध आहे परंतु तो तितकासा सुखावह नाही.
रेल्वेने : मालवण येथून अगदी ३० मिनिटांच्या अंतरावर तारकर्ली वसले आहे. मुंबईहून मालवण पर्यंतचा प्रवास हा ५७६ कि.मी. इतका आहे. खाजगी बसेस तसेच सरकारी बसेस ची अत्यंत चांगली सोय मालवण पर्यंत आहे.
विमानाने : जवळचे विमानतळ म्हणजे गोवा राज्यातील दम्बोलिन. येथून मालवण पर्यंत येण्यासाठी किंवा थेट तारकर्ली पर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहने उपलब्ध आहेत.

येवा, सिंधुदूर्गात स्वागत असा !

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची वास्तव अनुभूती आली तर? कोकणातील कुठल्याही किनाऱ्यावर हा अनुभव घेता येतो. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नितळ किनार्‍यांवरची त्याची अनुभूती काही वेगळीच.


येवा, सिंधुदूर्गात स्वागत असा !

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची वास्तव अनुभूती आली तर? कोकणातील कुठल्याही किनाऱ्यावर हा अनुभव घेता येतो. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नितळ किनार्‍यांवरची त्याची अनुभूती काही वेगळीच. एकिकडे हिरवाईने नटलेल्या भूतलास कवेत घेणारा विशाल सह्याद्री तर दुसरीकडे निळ्याशार सौदर्याचा अविष्कार करणारा अरबी समुद्र. यादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश पर्यटकांना सृष्टीसौंदर्याचे अनुपम दर्शन घडवतो.

कोकणातील वेंगुर्ला हा तर स्वप्ना‍तला गाव. मंगेश पाडगावकरांचे जन्मगाव असलेल्या गावातील स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितांत अवतरला नसता तरच नवल. वेगुर्ल्याला शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे.गावाभोवतालच्या टेकड्यांवर नारळ, काजू, आंब्याच्या बागा बहरल्या आहेत. एखाद्या चित्रात फिट्ट बसावे असे हे गाव. विलक्षण निसर्गसौंदर्याच्या कोंदणात वसले आहे. येथील रामेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच नारळाच्या झाडीत लपलेले सुंदर शहर म्हणजे मालवण. दगडी भूप्रदेशात सिंधुदुर्ग व पद्मगड हे दोन जलदुर्ग आहेत. त्यांना जोडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवणने मिठागरे, चिनी मातीची भांडी व मालवणी खानपानासाठी ख्याती प्राप्त केली आहे.

लांबच-लांब पसरलेले समुद्रकिनारे, आपल्या उंचीने ढगांच्या उरात धडकी भरवणारी नारळाची झाडे, स्वच्छ सुर्यप्रकाशात तब्बल वीस फुटापर्यंयत समुद्राचा तळ दिसेल एवढे नितळ समुद्र सिंधुदुर्गाशिवाय इतरत्र पहायला मिळणे दुरापास्तच.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला तालुक्यात तारकर्ली, शिरोडा, वेळागर, निवाटी हे प्रदुषण व मानवी हस्तक्षेपापासून मुक्त समुद्रकिनारे आहेत.धकाधकीच्या शहरी आयुष्यातून हद्दपार झालेला निसर्ग आपल्याला येथे भेटतो. येथील निवांतपणा कुठल्याशा पवित्र शांततेचीही अनुभूती देतो. मन स्वच्छ झाल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत हातात कॅनव्हास, ब्रश घेवून मुक्तपणे फिरून विधात्याने निर्माण केलेले मनोहारी चित्र आपल्या मनावर उतरवण्याचा प्रयत्न करून बघायचा, तोही येथेच.

येथील समुद्रकिनार्‍यावरील सुर्यास्तावेळचे रंगाची उधळण करणारे दृश्य आयुष्यभर आपणांस आनंद देत राहील. नैसर्गिक सौदर्यासोबतच साहसी पर्यटक व इतिहासप्रेमीनाही सिंधुदूर्ग आवर्जून बोलावतो. सतराव्या शतकात बांधण्यात आलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्गही मालवणपासून जवळच आहे. शत्रूच्या उरात धडकी भरवणारा हा जलदुर्ग आजही अरबी समुद्राच्या लाटांचा सामना करत निकराने उभा आहे. वेंगुर्ल्याहून जवळच शिरोडा हे गाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकरांचे हे गाव. येथील समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारताना खेड्याभोवती पसरलेले मिठागरांचे दृश्य म्हणजे जणू पांढरा समुद्र समोर पसरल्यासारखे वाटते.कोकणात पर्यटनास गेल्यास कोकणी पदार्थाची लज्जत अनुभवल्याशिवाय परतणार्‍याची गणना अरसिकातच होईल. तारकर्लीत खास कोकणी रेस्टॉरंट आहे. दोन-तीन दिवस भटकायचे झाल्यास महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने निवासाची व्यवस्थाही येथे केली आहे.

कसे पोहचाल? 

तारकर्लीचे मुंबईपासून अंतर आहे साडेपाचशे किलोमीटर. कोकण रेल्वेने येथे पोहचायचे झाल्यास कुडाळ स्टेशन येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. शिरोडा बीच वेंगुर्ल्याहून एकोणीस किलोमीटरवर आहे. कोल्हापूरमार्गेही जाता येते. कोल्हापूरहून तारकर्ली साधारणत: दीडशे किलोमीटरवर आहे. पुणे, कोल्हापूऱ, मुंबईहून मालवणसाठी बस आहेत. मालवणहून तार्कालीसाठी गाड्या आहेत. मालवण रत्नागिरीपासून दोनशे किलोमीटरवर आहे.

महाबळेश्वर

सातारा‍ जिल्ह्यात पश्चिम घाटातल्या सह्याद्रीच्या रांगांत वसलेलं महाबळेश्वर... नजर आकर्षित करणार्‍या हिरव्यागार पर्वतरांगा... श्वास रोखावयास लावणार्‍या दर्‍या...मन मोहून टाकणारी विविध रंगांची फुलं... यासोबतच थंडगार व आल्हाददायक हवेमुळे हे हिलस्टेशन पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं...


महाबळेश्वर

सातारा‍ जिल्ह्यात पश्चिम घाटातल्या सह्याद्रीच्या रांगांत वसलेलं महाबळेश्वर... नजर आकर्षित करणार्‍या हिरव्यागार पर्वतरांगा... श्वास रोखावयास लावणार्‍या दर्‍या...मन मोहून टाकणारी विविध रंगांची फुलं... यासोबतच थंडगार व आल्हाददायक हवेमुळे हे हिलस्टेशन पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं...

महाबळेश्वर या मंदिराच्या नावामुळेच या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडलं असावं. ब्रिटीश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी महाबळेश्वरला होती, त्यावरुन या हिलस्टेशनचं महत्त्व अधोरेखित होतं. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लैकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १ हजार ३७२ मीटर उंचीवर सहयाद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी घनदाट वनश्रीची मुक्त उधळण झाली आहे. महाबळेश्वर मंदिर त्याला लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.

महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो. येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा- लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंटस् पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. महाबळेश्वराच्या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. त्यामुळे हा परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

महाबळेश्वरचा वेण्णा तलाव म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असे सांगितले जाते. येथील स्ट्राबेरी, रासबेरी, जांभळं, लाल रंगाचे मुळे प्रसिध्द आहेत. महाबळेश्वरचे मध खूपच चविष्ट आणि प्रसिध्द आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सहवासाबरोबरच रानमेव्याचा देखील चांगलाच लाभ घेता येतो.

महाबळेश्वर दर्शन करताना निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी वेण्णा तलावाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे. बोटिंग, मासेमारीबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात राहून तिथल्या एन्टरटेनमेन्ट सेंटरमधले विविध प्रकारचे स्टॉल्स, खेळ पर्यटकांना वेगळाच आनंद देतात. यासोबत विविध पॉईंटस् महत्वाचे आहेत. त्यात माऊंट माल्कम (१८२९ मध्ये बांधलेली ही एक प्राचीन वास्तू आहे. गव्हर्नर माल्कम यांचं निवासस्थान असलेली ही वास्तू प्रेक्षणीय आहे) मोरारजी कॅसल (१९४५ मध्ये महात्मा गांधी इथं काही काळ राहिले होते), एलिफंट्स हेड (६ कि.मी), एलफिस्टन पॉईंट (१० कि.मी.), हेलन्स पॉईंट, हंटर पॉईंट (४ कि.मी.), केट्स पॉईंट (७ कि.मी.), लिंगमाला वॉटरफॉल्स् (६ कि.मी.),लॉडविक पॉईंट (५ कि.मी.), मारजोरी पॉईंट (१० कि.मी.), विल्सन पॉईंट, ओल्ड महाबळेश्वर (५ कि.मी) ,आर्थर सीट ( १२ किमी.), बॉबिंगटन पाँईंट ( ३ किमी.), बॉम्बे पाँईंट ( ३ किमी.) ,कॅनॉट पीक, चीनामानस वॉटर फॉल्स, धोबी वॉटर फॉल आदींचा समावेश आहे.

कसे जाल?

हवाई मार्गाने : जवळचे विमातळ-पुणे, १२०कि.मी.
रेल्वे मार्गाने : जवळचे रेल्वे स्टेशन-सातारा, ६५ कि.मी.
रस्ता मार्गाने : पुणे (१२०किमी) आणि मुंबई (२९०कि.मी.) पासून उत्तम रस्त्यांची सुविधा. सातारा (मेढा मार्गे, ५५ कि.मी. आणि पांचगणी मार्गे ६५ कि.मी.)

Tuesday 24 March 2015

Manual for Happy Family - समृध्द, सुखी कुटुंब !

एखाद्या घरात गेल्यावर नेहमी खूप प्रसन्न वाटतं. तेथील माणसे खूप आनंदी असतात ,फ्रेश असतात. सगळीकडे सकारात्मक उर्जा भरून राहिली आहे असं वाटतं . भले मग ते घर सांपत्तिक दृष्ट्या श्रीमंत असो वा नसो. तेथे रहाणाऱ्या व्यक्तींमध्ये आपसात खूप प्रेम, स्नेह, आदर असतो. वेगवेगळ्या वयोगटातील, नात्यातील, पिढीतील व्यक्तींमध्ये एक छान आपलेपणा असतो.



Manual for Happy Family
समृध्द, सुखी कुटुंब !
एखाद्या घरात गेल्यावर नेहमी खूप प्रसन्न वाटतं. तेथील माणसे खूप आनंदी असतात ,फ्रेश असतात. सगळीकडे सकारात्मक उर्जा भरून राहिली आहे असं वाटतं . भले मग ते घर सांपत्तिक दृष्ट्या श्रीमंत असो वा नसो. तेथे रहाणाऱ्या व्यक्तींमध्ये आपसात खूप प्रेम, स्नेह, आदर असतो. वेगवेगळ्या वयोगटातील, नात्यातील, पिढीतील व्यक्तींमध्ये एक छान आपलेपणा असतो. आपल्यालाही त्यांच्या वागण्या बोलण्यातून, वावरण्यातून एक प्रकारचा मोकळेपणा आणि सकारात्मक संवेदना जाणवतात. आपल्यालाही तेथे वारंवार जावसं वाटतं तसेच आपलंही घर, आपलंही कुटुंब तसं असावं, असं वाटतं. असं कुटुंब “समृध्द ” असतं .

ह्या समृद्धीचे सहा सोपान असतात. प्रत्येक व्यक्तीची सकारात्मक मानसिकता, प्रत्येकाचं उत्तम आरोग्य, एकमेकांमधील विश्वासावर, आदरावर, प्रेमावर आधारित नातेसंबंध, दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, सुख किंवा दुख: वाटून घेण्याची वृत्ती आणि अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत समाधानी रहाण्याची, एकोप्याने राहण्याची वृत्ती.

आता हे सगळं जमवून आणायचं असेल तर कुटुंबातील प्रत्येकासाठी काही टिप्स आहेत. प्रत्येकाला काही नियम समजून घ्यायला लागतील आणि आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. आपण तीन पिढयांचे कुटुंब गृहीत धरुया. उदा. घरातील जेष्ठ व्यक्ती म्हणजे आजी आजोबा , मधली पिढी म्हणजे नवरा बायको व तरुण पिढी म्हणजे मुले.

सर्वांसाठी टिप्स -

१. कुटुंब संस्थेवर विश्वास ठेवा. म्हणजेच इतरांबरोबर आनंदाने, स्नेह्बंधनाने आपण रहातो तेंव्हा सर्वांचंच व्यक्तिमत्व फुलू शकतं ह्यावर विश्वास ठेवा. . विपरीत परिस्थितून वर आलेल्या व्यक्ती, संपूर्ण कुटुंब आपण पहातो. त्यामागे व्यक्तीच्या कर्तृत्वा बरोबरच कुटुंबातील प्रेम , एकमेकांसाठी केलेला त्याग, धैयाने परिस्थितीशी दिलेली झुंज हे सगळं असतं.

२ . कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, भावनिक वीण ही वेगळी असू शकते. भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. भावनिक सहनशीलतेची पातळी वेगळी असू शकते. हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे लहान सहान कारणांवरून खटके उडणार नाहीत. मतभेद झाले तरी लवकर मिटतील. स्वस्थ कुटुंबासाठी हे समजून घेणे महत्वाचे आहे.

३.स्वत: भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या शांत, स्वस्थ आहोत का हे तपासा. कारण जेंव्हा व्यक्ती आतून स्वस्थ, शांत असते तेंव्हा आणि तेंव्हाच ती स्वत:ला आणि दुसऱ्याला आनंद देऊ शकते. तसं नसेल तर त्यासाठी उपाय करा. एकमेकांशी किंवा विश्वासातल्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या. स्वस्थतेसाठीचे व्यायाम करा. उदा. ध्यान, योगासने इत्यादी.

४. अहंकार आड येऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीलाही स्वतंत्र मतं असू शकतात हे मान्य करा. कुठल्याही प्रश्नावर टोकाची भूमिका टाळा. तुटेपर्यंत ताणू नका. सर्व कुटुंबासंदर्भातले काही निर्णय एकत्र चर्चा करून घ्या. ह्या प्रक्रियेमध्ये सर्वांची मते विचारात घ्या. एकमेकांशी बोलताना, वागताना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मला समोरच्याला आनंद द्यायचाय ही भावना महत्वाची.

५. जेष्ठ पिढीने तरुण पिढीला शक्यतो आवश्यक ते स्वातंत्र्य द्यावे. आमच्या वेळेला असं होतं असा धोशा लावू नये. काळ बदलत रहातो. आपल्यालाही बदलायलाच हवे हे लक्षात घ्यावे. त्याच बरोबर नवीन पिढीनेही जेष्ठांच्या सगळ्याच गोष्टी, विचार टाकावू आहेत असा विचार करू नये. त्यांना योग्य तो आदर द्यायला हवा. त्यांच्या सूचनांवर विचार करावा.

६. कुटुंबातील सदस्यांमध्ये मोकळा संवाद असावा. त्यासाठी दिवसातील किंवा शक्य नसेल तर आठवड्यातील काही काळ , काही तास सर्वांनी एकत्र येउन कौटुंबिक किंवा साहित्य, संगीत इत्यादी विषयांवर गप्पा माराव्यात. इतरांचं ऐकून घेण्याची क्षमता, मदत मागण्याचा मोकळेपणा, आपण कुटुंबातील महत्वपूर्ण सदस्य आहोत ह्या धारणा स्वास्थ्यपूर्ण आहेत.

७. काळ बदलतो आहे. Technology चा वापर दैनंदिन आयुष्यात अपरिहार्य आहे. घरातील तरुण पिढी तो करणारच. त्यांना त्या बाबतीत स्वातंत्र्य द्यायलाच हवं. पण त्याचा दुरुपयोग किंवा त्यातच वेळ काढत रहाणं ही भावनिक समस्या किंवा अस्वस्थतेला वाट मिळवून देणं असू शकतं. उदाहरणार्थ अती आणि अवेळी मोबाईल चा वापर, अति गेम्स इ. अशावेळी प्रेमाने समजावून सांगणं व त्यात यश येत नसेल तर तज्ञांची मदत घेणं अपरिहार्य आहे. सतत ओरडणं, दमदाटी करणं, आत्मसन्मान दुखावेल असे शब्द उच्चारणं ह्यातून फक्त वातावरण तणावपूर्ण राहिल. तरुण पिढीचीही जबाबदारी आहे की जेष्ठ जे सांगत आहेत त्यामागची भूमिका समजून घ्यायला हवी. जेष्ठांचा अनुभव व आपल्या बद्दल वाटणारा जिव्हाळा त्यामागे असू शकतो.

८. लग्न जमवणं हा एक महत्वाचा मतभेदाचा मुद्दा असतो. ह्या बाबतीत मुलगा किंवा मुलगी ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फक्त निवडीसाठीचे निकष काय असावेत ह्याबाबतीत मोकळेपणाने संवाद व्हावा उदा. निर्व्यसनीपणा, चारित्र्य, इत्यादी. परंतु कुठलंही दडपण आणू नये.

९ . सध्याच्या काळात मित्र मैत्रिणी असणं हे समाजव्यवस्थेचा भागच बनला आहे. त्याबाबतीत मुलां मुलींना टोकू नये. फक्त मर्यादांची व धोक्यांची जाणीव करून द्यावी. मुलामुलीनीही ही बाब समजून जबाबदारीने मैत्र जपावे. चांगला मित्र किंवा मैत्रीण हे बलस्थानही असू शकतं.

१०. सासू सून नातं हे नाजूक प्रकरण असू शकतं . पण ह्याही बाबतीत सासुबाईनी सुनेला जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं. आता काळ बदलला आहे. मुली सुशिक्षित असतात, त्यांची संसाराबाबत स्वतंत्र मतं असू शकतात हे लक्षात घ्यावं. त्याच बरोबर आपण निरुपयोगी झालो, आपला काळ संपला असं वाटून हताशही होऊ नये. सुनेनेही सासुला आवश्यक तो आदर द्यावा, सल्ला घ्यावा.
सासुसुनेच्या नात्यातील तणावांमुळे मुलावर विलक्षण ताण येऊ शकतो, हे दोघींनीही लक्षात घ्यावे. कारण तो एकाच वेळी मुलगाही असतो आणि पतीही.

११. घरात लहान मुलांसमोर कुणीच कुठलेही वादविवाद करू नयेत. अपशब्द उच्चारू नयेत. लहान मुलं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ, कणखर होणं ही काळाची गरज आहे.

जुनी पिढी आणि नवीन पिढी ह्यांच्या दृष्टीकोनांमध्ये फरक असणारच पण सुवर्णमध्य काढता येणं ही कला आहे. एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना , आदर, प्रेम निर्माण झालं, “मी पण ” सोडता आला की ते सहज शक्य आहे.
आनंद आणि मन:शांती ह्या दोन शब्दांसाठीच आपला जगण्याचा प्रवास आहे. कुटुंबाचं प्रेम हे त्या प्रवासासाठी एक बलस्थान आहे.

- डॉ. विद्याधर बापट, 
मानसोपचार तज्ञ

शेअर मार्केट - गुंतवणूक पर्याय

पैसा हा प्रत्येक मानवाच्या विकासातील एक महत्वाचा घटक आहे. पैसा मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने मेहनत करीत असतो. प्रत्येकाच्या मेहनतीचे स्वरू प वेगळे असले तरी त्यातून पैसा मिळवून भौतिक सुख सुविधा प्राप्त करणे हेच एकमात्र उद्दिष्ट आहे. आपण पैसे कमवितो. परंतू त्याची गुंतवणूक कशी करायची याबाबत मात्र कधी बारीक विचार करीत नाही.


शेअर मार्केट - गुंतवणूक पर्याय

पैसा हा प्रत्येक मानवाच्या विकासातील एक महत्वाचा घटक आहे. पैसा मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने मेहनत करीत असतो. प्रत्येकाच्या मेहनतीचे स्वरू प वेगळे असले तरी त्यातून पैसा मिळवून भौतिक सुख सुविधा प्राप्त करणे हेच एकमात्र उद्दिष्ट आहे. आपण पैसे कमवितो. परंतू त्याची गुंतवणूक कशी करायची याबाबत मात्र कधी बारीक विचार करीत नाही.

समाजात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. जादा पैशाची हाव बाळगण्यापेक्षा सुरक्षित पैसा महत्वाचा आहे. त्यामुळे आमच्याकडे पैसे गुंतवा आम्ही तुम्हाला चांगला परतावा अशा तोंडी हमी देणार्‍या अनेक गुंतवणूक कंपन्या बाजारात लाखाच्या घरात आहेत. परंतु  गुंतवणूकदारांनीही विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी गुंतवणूकीचे काही पर्याय खाली दिले आहेत.

कंपनीच्या शेअर (समभाग भांडवला) मध्ये गुंतवणूक करणे :

‘शेअर’ किंवा ‘शेअर्स’ हे शब्द शेतकर्‍यांना नवीन नाहीत. बहुतेक शेतकरी सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था-सोसायटीचे शेअर होल्डर म्हणजे सभासद असतात म्हणजेच आपण अशा संस्थेच्या भांडवलात भागीदार, म्हणजे त्या प्रमाणात मालक असतो. आपण एकदा असे सभासद-सहभागीदार झाल्यानंतर जोपर्यंत असा भाग विकत नाही किंवा दुसर्‍यांच्या नावावर वर्ग करीत नाही तोपर्यंत आपल्याकडे तो मालकी हक्क असतो. अशी संस्था नङ्गा मिळवत असेल, तर आपल्या भांडवलाचे व्याज म्हणून जो नफ्यातील भाग परतावा म्हणून मिळतो, त्याला डिव्हीडंड असे म्हणतो (प्रत्यक्षात ते व्याज नाही), पण अशी संस्था नुकसानीत असेल तर डिव्हीडंड मिळत नाहीच उलट आपले भांडवलसुद्धा परत मिळत नाही अशा परिस्थितीत भांडवल परत मागण्याचा आपल्याला अधिकारही नसतो, कारण आपण मालक असतो. संस्थेचे नुकसान झाले तर प्रथम बाहेरची देणी द्यावी लागतात, त्यातून काही उरलेच तर मालकाचा नंबर लागतो. अगदी हेच व्यावसायिक कंपन्यांच्या शेअरबाबत असते. आपण आपल्याकडे असणारा पैसा, अशा व्यावसायिक कंपन्यांचे शेअर घेऊन गुंतवणूक करू शकतो. अशी गुंतवणूक दोन प्रकारे करता येते-

१) प्रायमरी इश्यू / पब्लिक इश्यू :

एखादी कंपनी जेव्हा पहिल्यांदा (काही वेळा एका पेक्षा जास्त वेळा) समाजातील गुंतवणूकदारांकडून उदा. - नागरिक, संस्था इ. भांडवल म्हणून पैसा गोळा करते, त्याला प्रायमरी इश्यू/ पब्लिक इश्यू असे म्हणतात. कंपनीच्या प्रवर्तकांना नवीन कंपनी उभारून उत्पादन करायचे असते किंवा सध्याच्या कंपनीचे एक्सपैंशन (उत्पादनक्षमता वाढवणे) करण्यासाठी भांडवल उभे करायचे असते. त्यासाठी प्रवर्तक प्रथम भांडवल किती उभे करायचे ते ठरवतो. उदा., रु. शंभर कोटी. हे शंभर कोटी गुंतवणूकदारांकडून मिळवण्यासाठी शेअर निर्माण करतो. अशा शेअरची ङ्गेस व्हॅल्यू (दर्शनी किंमत) ठरवतो.

उदा. : प्रति शेअर रु. १०० नंतर काही शेअरचा एक लॉट (ठराविक शेअरचे एक प्रमाणपत्र) रु. १०० प्रति शेअर या दराने एकूण किंमत रु. १०,०००/- होते. गुंतवणूकदारास कमीत कमी १०० शेअर घेण्यासाठी रु. १०,००० गुंतवावे लागतात. बर्‍याच वेळा प्रवर्तक ङ्गैस व्हॅल्यू (दर्शनी किंमत) पेक्षा आपल्या शेअरची बाजारातील किंमत वाढवतो त्याला प्रीमियम (अधिमूल्य - वाढीव किंमत) असे म्हणतात. गुंतवणूकदाराला असा शेअर कंपनीने ठरवलेल्या वाढीव किंमतीत घ्यावा लागतो. वरील उदाहरणात समजा प्रवर्तकांनी अशी वाढीव किंमत रु. ५० ठेवली असेल, तर तो प्रत्येक शेअर गुंतवणूकदाराला रु. १५० ला म्हणजे १०० शेअरचा लॉट रु. १०,००० ऐवजी रु. १५,००० ला पडतो.

एक वेळ शेअरची किंमत निश्‍चित झाल्यावर, कंपनी अर्ज छापून समाजातील गुंतवणूकदारांना वाटते. सदर अर्ज भरून गुंतवणूकदारांनी त्या रकमेचा ड्राफ्ट अथवा कंपनीने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पैसे भरावे लागतात. पैसे भरल्यानंतर एक-दोन महिन्यात शेअर मिळतो. पण बर्‍याच वेळा, कंपनी चांगली असेल तर, कंपनीच्या मागणीपेक्षा जादा अर्ज व जादा रक्कम जमा होते. अशावेळी कंपनी काही विशिष्ट पद्धतीने (नियमाप्रमाणे) छाननी करून गुंतवणूकदारांना शेअर देते. बर्‍याच वेळा काही गुंतवणूकदारांना शेअर वाट्यास येत नाहीत. अशा वेळी भरलेले पैसे, काही दिवसांनी परत मिळतात. ज्यांना शेअर दिला आहे त्यांना शेअर प्रमाणपत्र मिळतात. काही वेळा शंभर शेअरसाठी अर्ज असेल, तर ५० शेअर देऊन (ठरवलेल्या प्रमाणात) बाकी पैसे परत मिळतात. अशा रीतीने प्रायमरी इश्यू/ पब्लिक इश्यू मधून गुंतवणूक करता येते.

२) सेकंडरी मार्केटमधून खरेदी :

  शेअर मार्केट हे कंपन्यांच्या शेअरची व इतर काही गुंतवणूक प्रकाराची, खरेदी-विक्री होणारे भारतातील प्रचंड मोठे मार्केट आहे. सदर मार्केटमध्ये रोज लाखो-करोडो रुपयांची खरेदी-विक्री होत असते. कंपनीच्या शेअरची किंमत दिवसातून अनेक वेळा कमी-जास्त होत असते. अशा मार्केटमधून आपण कोणत्याही कंपनीचे कितीही शेअर, (अगदी एक-दोन शेअरसुद्धा) खरेदी व विक्री करू शकतो. असे शेअर कमी किंमत असताना घेऊन किंमत वाढल्यानंतर कधीही विकू शकतो.

आज घेतलेल्या शेअरची किंमत उद्याही वाढू शकते, त्याचप्रमाणे कमीही होऊ शकते. उदा. : आज आपण रु. १०,००० चे शेअर घेतले तर त्याची किंमत उद्या ११,००० सुद्धा होऊ शकते व ९००० सुद्धा होऊ शकते.

जोखीम (रिस्क) -

शेअर मार्केटवर शासनाचे बर्‍याच अंशी नियंत्रण असते. सेबी (सिक्युनरिटी व एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) ही स्वतंत्र संस्था या मार्केटवर नियंत्रण ठेवत असते. असे असले तरी शेअरचे भाव, अनेक गोष्टींवर अवलंबून असतात, ते गुंतवणूकदारांच्या हातात ङ्गारच कमी असते. या व्यापारात माणूस लाखो रुपये कमावू शकतो, तसेच घालवू पण शकतो. या व्यवहारात सुदृढ आर्थिक क्षमतेबरोबर जोखीम घ्यायची तयारी हवी. घेतलेल्या शेअरची किंमत वाढणे किंवा कमी होणे हे त्या-त्या कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर, प्रवर्तकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असले तरी देशातील एकंदरित आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक स्थिती, आंतरराष्ट्रीय घडामोडीचाही परिणाम होत असतो. त्यामुळे या व्यवसायात व्यवहार करणारे एका रात्रीत लक्षाधीश पण होतात, तसेच कर्जबाजारी होऊन रसातळालाही जातात. काहींनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. या व्यवहारात शेअर मार्केटचे चांगले ज्ञान असेल, रोजच्या घडामोडींचा अभ्यास असेल, तर माणूस चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावू शकतो.

मर्यादा -

शेतकर्‍यांना रोजच्या कामातून अशा व्यवसायात लक्ष देणे व रोज बाजाराचा अभ्यास करणे कठीण आहे. शिवाय याचे सर्व व्यवहार इंग्रजीतून होतात. टीव्हीवर यासाठी सतत माहिती देणारे स्वतंत्र चॅनेल आहे. या चॅनेलवर सर्व प्रकारची माहिती मिळते. ती हिंदी किंवा इंग्रजीत असते. प्रत्येक प्रमुख कंपन्यांच्या शेअरच्या दरांचे चढ-उतार सदर चॅनेलवर खाली पट्टीच्या स्वरूपात (हिरव्या रंगात व लाल रंगात) दाखवले जातात. या व्यवहारासाठी स्वतंत्र डी-मॅट खाते उघडावे लागते. ही सोय प्रत्येक बँकेत नसते. पूर्वीप्रमाणे शेअरचे व्यवहार कागद स्वरूपात नसून, इलेक्ट्रॉॅनिक स्वरूपात आपल्या डी-मॅट खात्यावर परस्पर करता येतात. त्यासाठी आपल्या घरी कॉम्प्युटर व इंटरनेट असेल तर घरात बसून लाखो रुपयांचे खरेदी-विक्री व्यवहार करता येतात. यासाठी कोणत्याही बाजारात जायची गरज नाही. सदर डी-मॅट खाते आपल्या बचत खात्याशी जोडलेले असते. शेअर खरेदी केले तर आपल्या बचत खात्यातून पैसे आपोआप खरेदीसाठी वर्ग होतात, तसेच शेअरविक्रीचे पैसे पण आपोआप बचत खात्यात जमा होतात.

जर आपल्या घरी कॉम्प्युटर व इंटरनेटची सोय नसेल तर या धंद्यात असणार्‍या ब्रोकर मार्फत आपण हे व्यवहार करू शकतो, पण तो विश्‍वासू हवा. या व्यवसायातील गुंतवणुकीतून नफा कमवायचा असेल तर त्यात आपल्याला पुरेसे ज्ञान हवे. मार्केटचा रोजचा अभ्यास हवा. शेतकर्‍यांना हे अवघड आहे, पण देशात उपलब्ध असणारा गुंतवणुकीचा, नफा कमावण्याचा एक चांगला मार्ग असल्याने कमीत कमी जुजबी ज्ञान तरी आपल्याला व्हावे या उद्देशाने सदर माहिती दिली आहे.

-आर. व्ही. माळी
(लेखक देना बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून चेन्नई येथे कार्यरत आहेत.)

मुलांचा व्यक्तिमत्व विकास

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात मुलांचा “व्यक्तिमत्व विकास” ह्या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. 


मुलांचा व्यक्तिमत्व विकास

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात मुलांचा “व्यक्तिमत्व विकास” ह्या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. 

आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्वाचं. असं व्यक्तिमत्व विशिष्ठ प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी (Brain Gym) निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. ह्या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं ? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी (Outer Journey) तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी (Inner Journey). म्हणजेच आतलं विश्व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झाला असं म्हणता येईल.

सुरुवात महत्वाची – ह्या सगळ्याची सुरवात करावी लागते ती मुलांच्या व्यक्तिमत्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधली काल्पनिक भीती, स्वत:विषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडीओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टी. व्ही. वर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव ह्या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. त्याच बरोबर मुलांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.

व्यक्तिमत्व विकासातील काही महत्वाची साध्ये – मुलांमध्ये रुजवायला हवं की – 

१. माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश ह्या पेक्षा माझ्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला आनंद, प्रक्रियेतला आनंद महत्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुख:करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन. व निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्वं मी आयुष्यभर पाळेन. ते माझ्या विचारसरणीचा भाग बनून जाईल.
२. माझं “आतलं ” विश्व मी कायम शांत, स्वस्थ, आनंदी आणि कणखर ठेऊ शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्विकारीन. 
३. आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मला मिळवता येतील. 
४. मी स्वत: आनंदी रहाण्याचा प्रयत्न करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. मी समाजाचा भाग आहे आणि त्याच्याप्रती माझी काही कर्तव्ये आहेत. मी चांगली मूल्ये जोपासीन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. 
५. प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काही बलस्थाने दिली आहेत. माझ्यातील बलस्थाने मी ओळखीन व त्यांचा उपयोग माझ्या विकासासाठी करेन.
६. ह्या जगातील प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट महत्वाची आहे. मी आत्मसन्मान ठेवला पाहिजे तसाच इतरांचाही आदर राखला पाहिजे.
दोन्ही दिशांनी (Inner Journey व Outer Journey ) करावयाच्या प्रयत्नांमध्ये मध्ये काय येतं? – वरील साध्ये आत रुजवणे. स्वस्थतेची तंत्रे, साक्षीभाव ठेवण्याची तंत्रे, सकारात्मक विचारसरणी स्वभावाचा भाग बनवण्यासाठीचे मनाचे व्यायाम, भावनांचे सबलीकरण, बुद्धिमत्तेचा, कल्पनाशक्तीचा सृजनात्मक वापर, आत्मविश्वास, धैर्य, नेतृत्वगुण, संवादकौशल्यं, टाइम मॅनेजमेंट वगैरे गुणांबरोबरच दडपणा खाली काम करण्याची क्षमता विकसित करण्याची तंत्रे, मित्रमैत्रिणी सहकाऱ्यांबरोबर छान संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता विकसित करणे, , नकारात्मक वातावरणातही काम करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे वैयक्तिक आयुष्य व शैक्षणिक, व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याची कला (Compartmentalization), ह्यासाठीची तंत्रे शिकून घेणे.

विकसित व्यक्तिमत्वाची मुले आयुष्यात काय करू शकतात – 

१. आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकतात. 
२. ताणतणाव चांगल्या रीतीने हाताळू शकतात. 
३. कठीण प्रसंगात न डगमगता योग्य निर्णय घेऊ शकतात. 
४. यश डोक्यात जाऊ देत नाहीत वा अपयश आल्यास खचून जात नाहीत. 
५. नवीन कौशल्ये खूप लवकर आत्मसात करतात 
६. संवादकौशल्ये, आत्मविश्वास व सकारात्मकतेने छाप पाडू शकतात.
७. आपल्या क्षमता शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करणे व त्या प्रक्रियेचा आनंद घेणे त्यांना जमू शकते.
८. केवळ स्वत:पुरता विचार न करता इतर व्यक्तींच्या दृष्टीकोनातून विचार करू शकतात.
९. स्वत: च्या विकासाबरोबरच कुटुंब, समाज ह्यांच्या सृजनाचे भान त्यांना असते.

पालकांची जबाबदारी -

१. ह्या सगळ्या आवश्यक संकल्पना मनात रुजवण्यासाठी आईवडिलांनीही प्रयत्न करायला हवेत. आपलं मूल भावनात्मक दृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे स्वत:चे वर्तन आणि मुलांच्या विकासाला पाठींबा ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मुलं नैसर्गिकपणे आईवडिलांच्या वागण्यातील गुणावगुण टिपत असतात.

२. मुलांमधील कुठलाही दोष, वैगुण्य, कमतरता ह्याकडे दुर्लक्ष्य करू नये. मोठा झाला की आपोआप सगळं ठीक होईल ह्या गैरसमजात राहू नये.

३. करियर संबंधातील आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा, मुलांवर त्यांची इच्छा नसताना लादू नयेत. त्याने मुलांच्यावर दडपण येईल जे विकासाला मारक ठरेल. मुलांची नैसर्गिक क्षमता व इच्छा जे करण्याची असेल त्याला प्रोत्साहन द्यावे.

४. आपल्या पाल्याची इतर मुलामुलींबरोबर तुलना करीत राहणे टाळावे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या नैसर्गिक क्षमतेचे असते.
समृद्ध व्यक्तीमत्वाचे सहा सोपान नेहमी लक्षात ठेवायला हवेत. उत्तम शारीरिक तब्ब्येत, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींशी तसेच स्वत:शी छान नाते, निसर्गातील प्रत्येक सजीव, निर्जीव, पशु पक्षी वगैरे सर्वांशीच छान नाते, आवश्यक तितका पैसा व भौतिक सुखसोयी (लालसाविरहित), प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याची कला आणि कुठल्याही परिस्थितीत असलो तरी समाधानी मन:स्थिती ह्या गोष्टी जीच्याजवळ आहेत ती व्यक्ती समृद्ध मानायला हवी.

आजच्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा भौतिक यशाबरोबरच, मूल्य शिक्षण व आंतरिक स्वस्थता ह्या दोन्ही उद्दिष्टांच्या दिशेने हवा.

- डॉ. विद्याधर बापट
मानसोपचार तज्ञ