योग्य गुंतवणूक ही सुयोग बचत असते. या दिशेने विचार करता कौटुंबिक व व्यवसाय, व्यापार-उद्योग असे दोन भाग होतात. कौटुंबिक बाबीचा विचार करता आपल्या जीवनसाथी पत्नीचा विचार येतो. अप्रिय घटनेनंतर तिच्या सुरक्षेसाठी बचतीची ढाल संरक्षक ठरते. घर खरेदी, नूतनीकरण, मुलांचे शिक्षण, विवाह, आजारपण अशा अनेक बाबींची पूर्तता बचतीमधून करता येते. आता तर मुलांच्या शिक्षणासाठी, पर्यटनासाठी कर्ज दिले जाते, पण यासाठी बचतीचे नियोजन व नियमित कृती अत्यंत महत्त्वाची ठरते.
बचतीचा मंत्र जपा
लहानमोठे सगळेच कमीजास्त प्रमाणात पैशांची कमाई करतात, पण खर्चातून एखाद्या ध्येयाप्रमाणे ठोस बचत करणारे फार कमी लोक असतात. पण बचत करणाऱ्यांना जीवन कळले होऽ असेही म्हणता येईल! म्हणून की काय थोरो यांनी म्हटले असावे- ‘सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला सर्वश्रेष्ठ होय.’ संगीत, नाटक, सिनेमा, साहित्य, शिल्प अशा कलाक्षेत्रांतील बऱ्याच कलाकारांची जीवनसंध्या मलीन होते, मृतप्राय ठरते. याचे एक कारण आयुष्याच्या उतारावर बचतीचा ब्रेक असावा लागतो हे ते विसरून जातात किंवा त्यांना हे माहीतही नसावे, कोणी सांगणारे नसावेत. या वेळी मला हेन्री फोर्ड यांच्या एका मुलाखतीतील एक वाक्य आठवते. अर्थपूर्ण सल्ला देताना ते म्हणतात, 'Money is like an arm or a leg - use it our lose it.' असा हा बचतीचा महिमा उलगडत गेला सतीश नामदेव परब यांच्या भेटीतून.
सतीश परब यांचे आयुष्यच मुळी कमी कमाईत अधिक कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून बचतीमधून काही कर्तव्ये पार पाडीत आज ते जीवन विमा क्षेत्रात स्थिर असून COT आणि MDRT (USA) चा बहुमान मिळविणारे ते एजंट आहेत. यासाठी व बचतीच्या कामासाठी त्यांच्याकडे दहा लोकांना रोजगार मिळालेला आहे. साधारण व्यक्तीपासून ते उद्योजकांनी आपल्या कौटुंबिक व व्यवसाय, व्यापार-उद्योगाच्या सुरक्षेसाठी एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून पैशाची बचत केव्हापासून आणि कुठे, कशी करावी, याविषयी सल्लागार म्हणून सतीश परब अधिक ओळखले जातात. आतापर्यंत त्यांनी असंख्य विमा पॉलिसी उतरविल्या. तसेच तीनशेएक लोकांना आर्थिक बचतीचे धडे देऊन त्यांच्या आयुष्याला सुरक्षिततेचा एक आधार मिळवून दिला. म्हणून तर ते नेहमी म्हणतात, ‘इन्शुरन्स ही काही गुंतवणूक नाही, तर ती एक प्रकारे बचत आहे.
गुंतवणुकीच्या अनेक वाटा आहेत. एफ.डी., युनिट ट्रस्ट, म्युच्युअल फंड, पोस्टातून बचत करता येते. काही लोक भरमसाट, आकर्षक व्याजाला बळी पडून होत्याचे नव्हते होतात. अशी अनेक प्रकरणे दिसत असतात. यातून विश्वासार्हता, आर्थिक सुरक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न सतीश परब करतात. कारण सतीश परबांना पैशाचे मोल माहीत आहे. घरातल्या कर्त्यां पुरुषाबाबत काही अप्रिय घटना घडली किंवा अशी घटना उद्योजकाविषयी घडली तर ठोस बचतीमुळे त्यांचा संसार वा उद्योग रस्त्यावर येणार नाही, अशा तजविजीचा सल्लाही सतीश परब देतात. महिला बचत गटाचीही ते माहिती देतात. ‘बचतीचा मंत्र’ याविषयी बोलताना सतीश परब थेट आपल्या स्वयंपाकघराचे उदाहरण देतात.
विशेषत: महिला जात्याच बचत मनाच्या असतात. ज्यांची मने बचतीची त्यांच्या आयुष्यवेलीला फुले, फळे येतातच. स्वयंपाक करताना बऱ्याच महिला विशेषत: ग्रामीण भागात आजही मूठभर धान्य बाजूला काढून साठवीत जातात. जसे काही थेंबे थेंबे तळे साचे! सुखी जीवनासाठी सुयोग्य बचतीचा नियोजन मंत्र देण्यात सतीश परबना अधिक समाधान लाभते. कारण संकटसमयी, अडचणीच्या वेळा पैसा मिळतोच असा नाही. अशा वेळी बचतीची पिगी बँक हमखास कामास येते. सतीश परब यांनी कमवा आणि शिका अशा कष्टप्रद मार्गाने आपले आयुष्य वेचले, उभे केले. ही वाटचाल बचतीने सुकर झाली असे त्यांचे म्हणणे असते. या संदर्भात ते आरोग्य व मानवी सेवा संघाचा एका अहवालाविषयी माहिती देतात. साधारण शंभरएक तरुण वयाच्या २५ व्या वर्षी करियरला सुरुवात करतात. त्यांचे वय ६५ वर्षांचे असताना त्यात साधारण ६० व्यक्ती परावलंबी किंवा आपल्या मुलांवर अवलंबून असतात. तीसएक मृत्यू पावलेले असतात. काही अद्याप कामात, तर तीन-दोन लोक स्थिरस्थावर व सुखात, कारण ते नियमित बचत करीत होते. बाकींनी बचत केली नाही किंवा त्यातले महत्त्व त्यांना कळले नाही. म्हणून त्यांचे आयुष्य संध्यासमयीसुद्धा दु:खीकष्टी ठरले.
योग्य गुंतवणूक ही सुयोग बचत असते. या दिशेने विचार करता कौटुंबिक व व्यवसाय, व्यापार-उद्योग असे दोन भाग होतात. कौटुंबिक बाबीचा विचार करता आपल्या जीवनसाथी पत्नीचा विचार येतो. अप्रिय घटनेनंतर तिच्या सुरक्षेसाठी बचतीची ढाल संरक्षक ठरते. घर खरेदी, नूतनीकरण, मुलांचे शिक्षण, विवाह, आजारपण अशा अनेक बाबींची पूर्तता बचतीमधून करता येते. आता तर मुलांच्या शिक्षणासाठी, पर्यटनासाठी कर्ज दिले जाते, पण यासाठी बचतीचे नियोजन व नियमित कृती अत्यंत महत्त्वाची ठरते. या वेळी मला लातूरच्या एका किरकोळ विक्रेत्यांची आठवण येते. त्याने रोज एक रुपया बचत करून आयुष्याच्या संध्यासमयी सिंगापूर पाहण्याचे स्वप्न पूर्ण केले, पण यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या दृष्टीने उद्योजकांची अडचण अधिक व्यापक असते. त्यांचाही संसार असतो. शिवाय उद्योग सुरू ठेवणे, आपले कामगारही सुरक्षित राहिले पाहिजे याचीही काळजी घेणे आवश्यक ठरते. डॉक्टर्स, इंजिनीयर्स, आर्किटेक्ट अशा प्रोफेशनल मंडळींनाही जीवन विमातर्फे कर्ज मिळू शकते, पण ही बाब बऱ्याच लोकांना माहीत नसावी असे वाटते. विमा पॉलिसी म्हणजे जीवन विमा अशी काहींची धारणा आहे. आता गृहकर्जामुळे त्याची व्याप्ती वाढली, पण व्यापार-उद्योग सुरू करण्यासाठी, नूतनीकरणासाठी कर्ज दिले जाते.
आर्थिक संस्थांकडून कर्ज मिळविताना बऱ्याच लोकांना ‘वरातीमागून घोडे’ असा विलंबाचा अनुभव येतो. शिवाय शेअर खरेदी, फंड, सेवा शुल्क, मॉर्गेज, गॅरन्टर असे नानाविध सोपस्कार असतात. जीवन विम्याच्या अटी इतक्या गुंतागुंतीच्या नसतात. कर्जाच्या रकमेइतके ‘मॉर्गेज’ महत्त्वाचे ठरते. त्यामुळे संपूर्ण कर्ज एका आठवडय़ातही मिळू शकते. घर संसार असो की उद्योग व त्यांचे उत्पादन असो, ते संकटसमयीसुद्धा सुरू असावे, पुढच्या पिढीला रस्त्यावर आणू नये अशी सुयोग्य गुंतवणूक- बचत करणे हे सुखी, समाधानी जीवनाचे मंत्र ठरावे अशी दिशा मार्गदर्शन सतीश परब करतात. तेव्हा मंडळी, बचतीचा मंत्र जपण्यास विसरू नका.
○●○●○●○●○●○
No comments:
Post a Comment