पूर्वीच्या काळी निवृत्तीनंतर फार काळजी नसायची, त्याचं कारण म्हणजे पेन्शन. पण आज खाजगी क्षेत्रातच काय, सरकारी नोकरीत देखील पेन्शन मिळत नाही. शिवाय आपल्या उतारवयात आपल्या मुलांवर भार बनणे कुणालाच आवडणार नाही. मुलंही आपला भार उचलतील याची शाश्वती तर नाहीच. त्यामुळे आता प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठीची तरतूद स्वत:ला करावी लागणार आहे.
सुखी संसाराचा आर्थिक पैलू..
लग्नाचे रोमँटिक दिवस संपले की वास्तवाचं भान येतं आणि यात मुख्य गोष्ट असते आर्थिक घटकाची. दोघांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आर्थिक घटक फार महत्त्वाचा असतो. म्हणूनच त्यासाठी आर्थिक नियोजनाचीही गरज असते. हे आर्थिक नियोजन कसं करावं, खर्च कसे मॅनेज करावेत, गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी यासंबंधी नवविवाहितांसाठी काही टिप्स:
नवविवाहितांचं जीवन इतकं सुमधुर असताना आर्थिक नियोजन यासारखं क्लिष्ट आणि unromantic विषय अगदीच नकोसा वाटणार. पण जर या मधुचंद्राच्या पर्वातच दोघांनी मिळून काही शिस्त लावून घेतल्यास पुढील आयुष्यात आर्थिक चंद्रकोर उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाईल.
प्रत्येकाच्या आयुष्यात साधारणत: दोन प्रकारची ध्येयं/ स्वप्नं असतात किंवा आपण त्यांची विभागणी दोन प्रकारांत करू शकतो-
१. कमी/मध्यम पल्ल्याची
२. लांब पल्ल्याची
२. लांब पल्ल्याची
मध्यम पल्ल्याची ध्येयं (Medium Term Goals) म्हणजे चारचाकी घेणं/ विदेश सहल/ मोठी सहल.. तर घर घेणं/ मुलांचे शिक्षण/ लग्न आणि आजच्या जीवनामधील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे निवृत्तीचे नियोजन ही लांब पल्ल्याची ध्येयं (Long Term Goals).
आता प्रत्येकाची ध्येयं वेगवेगळी असतात आणि तसेच त्यांची प्राप्त होण्याची मर्यादादेखील स्वतंत्र. त्यामुळे काही जणांची मध्यम पल्ल्याची ध्येयं ही दुसऱ्यांसाठी लांब पल्ल्याची असू शकतात.
आता प्रत्येकाची ध्येयं वेगवेगळी असतात आणि तसेच त्यांची प्राप्त होण्याची मर्यादादेखील स्वतंत्र. त्यामुळे काही जणांची मध्यम पल्ल्याची ध्येयं ही दुसऱ्यांसाठी लांब पल्ल्याची असू शकतात.
कमी व मध्यम पल्ल्यांच्या ध्येयांसाठी व कमी-अधिक प्रमाणात आपल्याजवळ असण्यासाठीच्या आपत्कालीन निधीचे नियोजन करताना कमीत कमी जोखीम पत्करायला हवी.
आपल्याला महिनाभरासाठी लागणारा निधी गृहीत धरून असा दोन ते तीन महिन्यांचा निधी साठा एकतर बचत खात्यामध्ये (Saving Account) असावा किंवा मुदत ठेव (fixed Deposit) करावी. म्हणजे पाहिजे तेव्हा पैसे मिळू शकतील.
बचत खात्यामध्ये किंवा मुदत ठेवीमध्ये जोखीम काही नसते व पैसे लगेच मिळू शकतात. म्हणून इमर्जन्सीसाठी करावयाची बचत इथेच करावी.
यानंतर, मध्यम पल्ल्याच्या ध्येयांसाठीसुद्धा मुदत ठेवींचा मार्ग स्वीकारावा अथवा काही प्रमाणात म्युच्युअल फंडच्या मंथली इन्कम प्लॅन किंवा लिक्विड प्लस योजनेत गुंतवणूक करावी. म्हणजेच साधारणत: दोन-तीन महिन्यांपासून ते २-३ वर्षांपर्यंत लागणाऱ्या पैशाकरिता मुदत ठेवी/ मासिक ठेव योजना/ लिक्विड प्लस फंडस् उपयोगात आणता येतील.
यानंतर नवविवाहितांनी आपल्या लांब पल्ल्याच्या ध्येयाविषयी व्यवस्थित आखणी करायला हवी. यामध्ये सर्वात महत्त्वाचे असणार ते निवृत्ती नियोजन (Retirement Planning) आणि दुसरे म्हणजे स्वत:च्या घरासाठीचे आर्थिक नियोजन.
पूर्वीच्या काळी निवृत्तीनंतर फार काळजी नसायची, त्याचं कारण म्हणजे पेन्शन. पण आज खाजगी क्षेत्रातच काय, सरकारी नोकरीत देखील पेन्शन मिळत नाही. शिवाय आपल्या उतारवयात आपल्या मुलांवर भार बनणे कुणालाच आवडणार नाही. मुलंही आपला भार उचलतील याची शाश्वती तर नाहीच. त्यामुळे आता प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठीची तरतूद स्वत:ला करावी लागणार आहे.
पण हे फार अवघड नाही. कारण निवृत्तीसाठी, नवविवाहितांकडे बराच अवकाश असणार आहे. खूप जास्त नाही, पण नियमित केलेल्या २५-३० वर्षे केलेल्या गुंतवणुकीमुळे भरपूर असा निधी सहज जमा होऊ शकतो.
थोडय़ा रकमेची पण शिस्तीने केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आपल्याला निवृत्तीनंतर पुरेल एवढा निधी देऊ शकते व त्यायोगे निवृत्तीनंतरचं जीवन आरामात जगू शकतो. पण यासाठी पाहिजे ती म्हणजे बचत व गुंतवणुकीची शिस्त.
निवृत्तीनंतरच्या निधीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत :
१. पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) : नोकरदार मंडळींसाठी, ज्यात स्वत:चं शिवाय कंपनीनं केलेलं योगदान दरमहिना जमा होत राहतं व केवळ नोकरी सोडल्यावर पैसे मिळतात.
२. पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड): हे खातं १५ वर्षांचं असतं व त्यानंतरसुद्धा ते वाढवता येतं. नवीन बदलांनुसार आता दरवर्षी कमाल रु. १ लाख बचत करता येते. सध्याचा व्याजदर ८.६० टक्के आहे. कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत पीपीएफचे खातं उघडता येतं.
३. एनपीएस (न्यू पेन्शन स्कीम) : हा नवीन पर्यायदेखील आता सुरू आहे, पण अजून तरी त्यास प्रतिसाद अल्प आहे. पुढे पुढे एनपीएस लोकप्रिय होण्याची शक्यता नक्कीच आहे.
४. जीवन विमा (मुदतपूर्तीचा किंवा आयुर्विम्याची पेन्शन योजना) : यात मुदतपूर्तीनंतर विमा रक्कम अधिक जमा झालेला बोनस मिळतो. हा निधी निवृत्तीनंतरच्या निर्वाहासाठी उपयोगात आणता येतो. यात आणखी एक फायदा म्हणजे मुदतीमध्ये जीवन विमासुद्धा अंतर्भूत असतो.
५. म्युच्युअल फंड : म्युच्युअल फंड म्हणजे अनेक सामान्य गुंतवणूकदार एकत्र येणे व त्यांची गुंतवणूक एखाद्या तज्ज्ञाच्या देखरेखीखाली मुख्यत: शेअर बाजारात करणे.
या गुंतवणुकीमध्ये जोखीम नक्कीच आहे, पण यातील परतावादेखील त्यामुळे भरपूर अधिक असतो. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही फार काळाची असली तर भरपूर फायदा मिळवता येतो.
पीएफ, पीपीएफ, जीवन विमा यापेक्षा साधारण दुप्पट असा परतावा १५-२० वर्षांवरच्या कालावधीत अपेक्षित धरला जातो.
या पाचही पर्यायांमध्ये अजून एक विचार करावयास हवा, तो म्हणजे त्यावरील करांचा. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनवर कर द्यावा लागतो. पीपीएफवरचं व्याज व म्युच्युअल फंडामधील एका वर्षांवरील गुंतवणुकीवरचा फायदा करमुक्त आहे.
याशिवाय थोडी गुंतवणूक सोन्यामध्येदेखील असायला हवी. मात्र ती दागिन्यांच्या स्वरूपात नसावी. कारण दागिन्यांमध्ये सोनं कमी व मजुरी जास्त असं होऊ शकतं. शिवाय मोडदेखील द्यावी लागते. गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड फंड जास्त चांगले व किफायती पर्याय आहेत.
याबरोबरच थोडा वेळ काढून, अभ्यास करून काही प्रमाणात गुंतवणूक, उत्तम कंपन्यांचे शेअर्स घेण्यासाठी केली तर त्यातही चांगला फायदा होऊ शकतो.
याबरोबरच थोडा वेळ काढून, अभ्यास करून काही प्रमाणात गुंतवणूक, उत्तम कंपन्यांचे शेअर्स घेण्यासाठी केली तर त्यातही चांगला फायदा होऊ शकतो.
नवीन किसान विकास पत्र हा देखिल मोठय़ा गुंतवणूकी साठी चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम ८ वर्ष ४ महिन्यात दुप्पट होते.
निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी स्थावर मालमत्तादेखील उत्तम मार्ग आहे. यायोगे अशी स्थावर मालमत्ता भाडय़ाने देऊन दरमहा निश्चित अर्थप्राप्ती होऊ शकते.
निवृत्तीनंतरचे नियोजन हा एक स्वतंत्र विषय आहे, पण नुसता अभ्यास करण्यात वेळ घालवू नये. प्रत्यक्ष कृती जास्त महत्त्वाची. बचत/ गुंतवणुकीची सुरुवात व शिस्तीत त्याचे नियमित प्रयोजन म्हणजेच निवृत्ती नियोजन.
सोन्यामधली गुंतवणूक दागिन्यांच्या स्वरूपात नसावी. दागिन्यांमध्ये सोनं कमी व मजुरी जास्त असं होऊ शकतं. शिवाय मोडदेखील द्यावी लागते. गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड फंड जास्त चांगले व किफायती पर्याय आहेत.
हा लेख खास नवविवाहितांसाठी असल्याकारणाने अन्य लांब पल्ल्याची ध्येयं व त्यांचं नियोजन विचारात घेतलेलं नाहीये. जसे.. मुलांचं शिक्षण/ मुलांचं लग्न..
आयुष्याचे आर्थिक नियोजन करताना आयुष्यातील महत्त्वपूर्ण जोखमींकरिता तयारीसुद्धा हवी.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापुढील जोखमीची तयारी म्हणजे त्यावरील विमा. यात प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे ते :
१. जीवन विमा - Life Insurance.
२. आरोग्य विमा - Health Insurance.
३. अपघात विमा - Personal Accident Insurance.
२. आरोग्य विमा - Health Insurance.
३. अपघात विमा - Personal Accident Insurance.
जर नोकरदार असाल तर साधारणत: कंपनीकडून आरोग्य व अपघात विमा उतरवला जातो, पण त्याची नीट माहिती घ्यावी व व्याप्ती समजावून घ्यावी. अटीसुद्धा बघून घ्याव्यात म्हणजे जेव्हा खरंच गरज पडेल तेव्हा तारांबळ उडणार नाही.
जीवन विमा हा अनेक वर्षांपूर्वीपासून घेतला जात आहे; परंतु त्याची रक्कम शास्त्रीयदृष्टय़ा काढली गेलेली नसायची. केवळ ओळखीच्या एजंटमुळे विमा घेतला जायचा/ जातो.
मग जीवन विम्याची रक्कम किती असावी?
१. आपण जर आयुष्यातून नाहीसे झालो तर आपण नसतानासुद्धा आपल्या कुटुंबास आर्थिक त्रास होऊ नये.
२. कुटुंबाचं राहणीमान आहे त्या परिस्थितीत राहावं.
३. आयुष्यातील महत्त्वाच्या ध्येयांसाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा.
४. आपल्यावरील सर्व कर्जे फिटतील इतकी रक्कम यावी.
अशा १ ते ४ यांची बेरीज म्हणजे आयुर्विम्याची रक्कम.
नेहमीचा जीवन विमा घेण्यापेक्षा सध्या सर्व विमा कंपन्यांकडे उपलब्ध असलेला टर्म इंश्युरन्स हा पर्याय सर्वोत्तम आहे. कारण या विमा प्रकारामध्ये विमा रक्कम भरपूर असते, मात्र त्या मानाने विमा हप्ता मात्र अल्प असतो. यात मुदतपूर्तीनंतर काहीच मिळत नाही, पण हा विमा ‘शुद्ध विमा’ (Pure Insurance) असल्यामुळे मुदतपूर्तीनंतर काही मिळावे ही अपेक्षा ठेवू नये. यासाठीच ह्य़ा विम्याचा हप्ता अत्यल्प असतो.
आयुर्विम्यानंतर आरोग्य विमादेखील आता काळाची गरज बनली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रुग्णालयातील औषधोपचार आता खूपच महाग झाले आहेत. त्यामुळे आपला आरोग्य विमा निदान ३-५ लाखांचा असावा. नवविवाहितांसाठी महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्या आता प्रसूती लाभ (Maternity Benefit) सुद्धा देतात. याचा लाभ घेता येऊ शकतो.
सर्व आर्थिक नियोजन करताना खालील बाबी/ प्रश्न यांचा विचार करावा व त्यांच्या उत्तरांच्या अनुषंगाने पुढील मार्गक्रमण करावे :
१. नोकरी आहे की व्यवसाय?
२. दोघे कमवते आहात का?
३. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावा, पण खर्चाआधी बचत/ गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे.
४. अल्प मुदती (Short Term) गुंतवणूक नेहमी कमीत कमी जोखमीच्या पर्यायात असावी.
५. दीर्घ मुदती (Long Term) गुंतवणूक थोडय़ा जास्त जोखमीच्या पर्यायात असावी, ज्यायोगे गुंतवणुकीवरील परतावा वाढण्यास मदत होईल.
६. शिस्त लागावी म्हणून शक्यतो बँक खात्यातून थेट बचत/ गुंतवणूक होईल असे पाहावे. (Direct Debit) म्हणजे पैसे हातात येऊन खर्च होणार नाहीत (अनाठायी).
७. जर नोकरदार असाल तर कंपनीने दिलेले पगाराव्यतिरिक्त फायदे नीट तपासून बघावेत आणि विम्याच्या बाबतीत विम्याची रक्कम, व्याप्ती, अटी समजून घ्याव्यात. काही कमतरता असल्यास स्वत: तरतूद करावी. कंपनीच्या भरवशावर राहू नये.
८. क्रेडिट कार्डाचा उपयोग करावा, पण त्यात शिस्त फार महत्त्वाची.
ही सर्व आर्थिक नियोजनाची तोंडओळख म्हणावी. प्रत्येकासाठी ध्येय/ स्वप्नं स्वतंत्र असल्यामुळे त्याचं नियोजनही स्वतंत्र असणार. त्यामुळे प्रत्येकाने एखादा चांगले ज्ञान व अनुभव असलेला आर्थिक सल्लागार निवडावा जो तुम्हाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेईल.
○●○●○●○●○●○
No comments:
Post a Comment