थोडं माझ्या विषयी

Friday 20 February 2015

रियल इस्टेटही गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून पुढे !

सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता रुपया, शेअर्स, सोने, चांदी इत्यादींमधील अस्थिरता पाहून माणसाची गुंतवणूक करतानाची मानसिकता दोलायमान झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूक कुठे व कशी करावी हा मोठा यक्ष प्रश्न बनून सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत जमिनीतील गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असू शकतो. 


स्थावर मालमत्ताही (Real Estate) गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून पुढे !

सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता रुपया, शेअर्स, सोने, चांदी इत्यादींमधील अस्थिरता पाहून माणसाची गुंतवणूक करतानाची मानसिकता दोलायमान झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूक कुठे व कशी करावी हा मोठा यक्ष प्रश्न बनून सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत जमिनीतील गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असू शकतो.   

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील स्थावर मालमत्ताही गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून पुढे आली आहे. गुंतवणुकीतील प्राधान्यक्रम बघता सर्वसाधारणपणे स्थावर मालमत्तेला प्रथम प्राधान्यदिले जाते. गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये जमीन ही आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोत असणे गरजेचे आहे. तीन ते पाच वर्षांत गुंतवणूक दुप्पट झाल्यास उत्तम गुंतवणूक समजली जाते.

प्लॉट एवढा उत्तम, परतावा इतर कुठे ?

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक गुंतवणूकदार प्लॉट किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा विचार करतात. काळानुरूप जमिनीची किंमत वाढत जाते, तर घराची किंमत कमी होत जाते. इमारतीचे मूल्य ठरवताना बांधकामाचा दर्जा, देखभाल, बांधकाम योजना हे घटक महत्त्वाचे ठरतात. उत्पन्नाचा विचार करता रिकाम्या प्लॉटला जास्त किंमत येते. मागणी व पुरवठा यांचे योग्य गुणोत्तर साधल्यास प्लॉटवर उत्तम परतावा मिळू शकतो. घरांपेक्षा प्लॉटचा पुरवठा कमी असल्याने व मागणी अधिक असल्याने जमिनीतून जास्त फायदा मिळतो.

योग्य प्लॉटची निवड करताना :

1. विकासाचा वेग : हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून गुंतवणूकदाराने आपण गुंतवणूक करत असलेला परिसर व त्याच्या विकासाचा आढावा घेऊनच निर्णय घ्यावा. भविष्यात उत्पादन वा सेवा क्षेत्र विकसित होण्याची अपेक्षा असलेल्या ठिकाणी प्लॉट विकत घ्यावा. उदा. औरंगाबाद, नाशिक, धुळे या शहरातून डीएमआयसी (जपान शासन आणि भारत केंद्रीय शासन) हा एक भव्य प्रकल्प प्रस्थापित होत आहे. पुढील 5 वर्षात डीएमआयसी प्रकल्प जवळील जमिनींना उत्तम परतावा मिळू शकतो हे हेरून चाणाक्ष गुंतवणूकदाराने तेथे गुंतवणूक करावी.

2. कायदेशीर बाबी : जमीन खरेदी करत असताना डेव्हलपरकडे टायटल रजिस्टर्ड व लायसन्स असल्याची खात्री करून घ्यावी. जमीन लीजहोल्ड आहे की फ्रीहोल्ड तेही पाहून घ्यावे. जमीन एनए 44 आहे का? टाऊन प्लॅनिंगअंतर्गतलेऑऊट आहे का? या गोष्टींचा तपशील बघावा.

3. क्षेत्रीय आढावा : आपण जेथे जागा घेत आहोत तेथून हायवे किती अंतरावर आहे हे बघावे. एखादा मोठा रस्ता प्रस्तावित आहे का? एखादा संबंधित जमिनीवरून हायवे किंवा मुख्य रस्ता सुलभ व कमी वेळेचा असावा. मोठे शेत किंवा उद्यान अशा ठिकाणाला लागून प्लॉट असेल तर त्याला चांगली किंमत येण्याची शक्यता असते. प्लॉटच्या सीमा योग्य व स्पष्टपणे आखलेल्या असाव्यात आणि त्या आपल्याला माहीत असाव्यात. प्लॉट खरेदी केल्यावर त्याला कुंपण घालणे गरजेचे आहे. काही ठिकाणी विशिष्ट प्लॉटवर ठरावीक काळामध्ये घराचे बांधकाम करावे लागते. याविषयी तपशील जाणून घ्यावा.

जागा आहे पण परवाना नाही, नळ आहे पण पाणी नाही, स्ट्रीट लाइट आहे पण घरात लाइट नाही, नावावर जागा आहे पण जागेवर नाव नाही, कुंपण आहे पण संरक्षण नाही... अशा या सर्व गोष्टींना भेदणारी संकल्पना म्हणजे रेडी टू बिल्ड प्लॉट होय.

आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना सर्व गोष्टी या रेडिमेड हव्या असतात आणि नेमके हेच हेरून प्लॉट व्यवसायधारकांनी व्हॅल्यू अँडेड संकल्पनेच्या पुढे जाऊन रेडी टू बिल्ड ही संकल्पना अमलात आणली आहे.


रेडी टू बिल्ड प्लॉट म्हणजे घर बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक असणार्‍या गोष्टी तयार असणे, ज्यात खालील गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे.

1. रेडी टू बिल्ड प्लॉटमध्ये पुढील अनेक वर्षांचा विचार करून, सार्वजनिक रस्ते व इतर सार्वजनिक गरजांसाठी (जसे इलेक्ट्रिक सबस्टेशन, उद्यान, शाळा, दवाखाने इत्यादी) पुरेशी जागा आधीच ठेवलेली असते. त्यामुळे अशा लेआऊटमधील प्लॉटला भविष्यात चांगली किंमत मिळण्याची शक्यता वाढते.

2. रेडी टू बिल्ड प्लॉटमध्ये प्रत्येक प्लॉटपर्यंत प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरद्वारे वीज कनेक्शनची सुविधा तसेच नळ कनेक्शन, ड्रेनेज अथवा सेप्टिक टँक, स्ट्रीटलाइट, अंतर्गत सुसज्ज रस्ते, अशा मूळ गरजा पूर्ण केलेल्या असतात. त्यामुळे जर भविष्यात तुम्हाला तेथे काही बांधकाम करायचे असेल तर या मूळ गरजांसाठी पैसे मोजावे लागत नाहीत.

3. रेडी टू बिल्ड प्लॉटमध्ये एखाद्या घरकुल प्रकल्पाप्रमाणेसोसायटी स्थापन केली जाते, ज्याअतंर्गत सर्व सोयी-सुविधांची देखभाल व दुरुस्ती केली जाते.

4. स्टँडर्ड बिल्डिंग पर्मिशन सुविधा उपलब्ध केली जाते. त्यामुळे स्वत: करायची धावपळ वाचते.

5. प्रगत परिसर आणि रहिवाशांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याकारणामुळे परिसरात राहण्यास लोक लवकर येतात व तुम्हाला शेजार मिळते तसेच तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तर परतावाही उत्तम मिळतो.



6. त्यामुळे अशा रेडी टू बिल्ड प्लॉट स्कीम्समुळे अगदी कमी पैसे गुंतवूनदेखील भरपूर फायदा मिळू शकतो.


**********

No comments:

Post a Comment