थोडं माझ्या विषयी

Friday 20 February 2015

एचडीएफसी इक्विटी फंड


जास्त पगारदार तरुण मंडळीनी या योजनेत गुंतवणूकी साठी जरुर विचार करावा. आपण निर्धास्त रहा, आता वैयक्तिक गुंतवणूकीला चालना देण्यारं सरकार केंद्रात आहे, आगामी बजेटमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईलच. शेयर बाजार सुद्धा सध्या तेजीत आहे!


एचडीएफसी इक्विटी फंड 

काही दिवसांपूर्वी एका म्युचुअल फंडच्या योजनेने २० वर्षाचा मोठा प्रवास यशस्वीरित्या पार केला. लाखो लोकांची स्वप्ने पुर्ण करण्यास मदत केली. आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न, घराचे स्वप्न, गाङी, पेन्शन अशा सर्व गरजा पूर्ण केल्या.
ती योजना आहे...

"एचडीएफसी इक्विटी फंङ" 

हा प्रवास लांबचा
यात अडथळे तर असतातच.
पण काय काय अडचणी आल्या ?
या २० वर्षाच्या प्रवासात  सर्व सकंटावर मात करुन म्युचुअल फंडाचे नाणे कस खणखणीत वाजलं? काय वैशिष्टे आहेत या योजनेची? किती परतावा दिला आहे असा ह्या योजनेने ?


नाहीतर हे म्युचुअल फंड वाले सारखे आपले "लाॅग टर्म" " लाॅग टर्म" करत असतात.
चला एकदा बघुया तरी हे "लाॅग टर्म"
पैसे ठेवले तर काय होतंय ते...

आलेले अडथळे :
१९९६ हर्षद मेहताचा घोटाळा
२००१ केतन पारेख घोटाळा
२००८ जगभरात मंदी
शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१००० वरुन ९००० वर
२००४ ते २०१४ अकार्यक्षम सरकार

या योजनेची सुरुवात १ जानेवारी १९९५

योजनेचे फंड मॅनेजर - श्री. प्रशांत जैन

त्यावेळेस योजनेचा प्रती युनिट दर १० रुपये

एकुण गुंतवणुकदार ६.३ लाख

फंङात असलेली एकुण रक्कम 

१८३९९.२८ करोङ रुपये 

परतावा :
गेल्या १   वर्षात ५३.७७%
गेल्या ३   वर्षात २८.८७%
गेल्या ५   वर्षात १५.१८%
गेल्या १० वर्षात २१.७१%
गेल्या २० वर्षात २१.२१%

आजचा दर प्रती युनिट ४६९.८९ रु. 

गेल्या २० वर्षात रक्कम ४७ पट वाढली. म्हणजेच ज्यांनी योजनेच्या सुरुवातीलाच १००००० रु. गुंतवले
त्याचे आज ४६९८९०० रु झाले.

अरे बापरे तेव्हा एवढ्या रकमेची एफङी करण्याऐवजी थोङी रक्कम इकङे टाकले असते तर...

पण मी दरमहा काही रक्कम टाकू शकत होतो, साधारण १०००० रु महिना...किती मिळाले असते मला?

२० वर्ष म्हणजे २४० महिने
एकुण गुंतवणुक २४००००० रु.

त्याची आजचे मुल्य
५०६०२६३४.७१ रु.

आणि एवढा सगळा नफा करमुक्त बरं का...

बापरे खरच हा "लाॅग टर्म" लई भारी बरं का
एकदम नसतील तर महिन्याची "SIP" काय ते काढायला पाहिजे.

जास्त पगारदार तरुण मंडळीनी या योजनेत गुंतवणूकी साठी जरुर विचार करावा. आपण निर्धास्त रहा, आता वैयक्तिक गुंतवणूकीला चालना देण्यारं सरकार केंद्रात आहे, आगामी बजेटमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईलच. शेयर बाजार सुद्धा सध्या तेजीत आहे!

○●○●○●○●○●○



No comments:

Post a Comment