थोडं माझ्या विषयी

Wednesday 11 February 2015

श्री गणेशा "ब्लॉग माझा" चा !

बऱ्याच वेळा बरंच काही ऐकत होतो, बघत होतो, सतत वाचत होतो त्यामुळे बरंच काही मनामध्ये येत होतं. आणि मनातलं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी "ब्लॉग माझा" चा संकल्प केला. या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.


[ आमच्या घरचा बाप्पा, सन २०१४ ]

श्री गणेशा ... एका ब्लॉगर चा आणि "ब्लॉग माझा" या ब्लॉग चा !

करेन म्हणता म्हणता राहुनचं जात होतं.. पण आज मुहूर्त निघालाच.. नव्हे काढलाच मी.. आणि एकदाची सुरुवात झाली !

गणपति बाप्पा च्या आशिर्वादाने सुरुवात तर झाली...

ब-याच वेळा बरेच काही ऐकत होतो, बघत होतो, सतत वाचत होतो त्यामुळे बरेच काही मनामध्ये येत होते. आणि मनातले प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझा स्मार्टफोन व लॅपटॉप उपयोगात आणायचे ठरवले. 

अशारितीने आज ह्या "ब्लॉग माझा" चा श्री गणेशा होतोय. ठराविक आशय नाही, ठराविक विषय नाही आणि कुठली दिशाही ठरलेली नाही. ब्लॉगच्या नावाप्रमाणेच माझ्या मनात येणारे मनातले थोडे मांडण्याचा प्रयत्न करायचं ठरवलंय. 

"ब्लॉग माझा" मध्ये कोणते विषय असायला हवेत हे तुम्ही मला नक्की कळवा. तुमच्या सूचनांचे स्वागतच राहील.

"पपा तुम्ही ब्लॉग सुरु करा" असे मला सतत विनवणी करून ते सुरु करण्यास प्रोत्साहन देणारे माझा मुलगा व सून चि. अनिकेत व सौ. ऐश्वर्या तसेच माझी प्रेमळ पत्नी सौ. अपर्णा यांस हा ब्लॉग अर्पण करीत आहे.

धन्यवाद !

श्री. रमाकांत भोसले

मुंबई, बुधवार, ११ फेब्रुवारी २०१५ 

No comments:

Post a Comment