थोडं माझ्या विषयी

Thursday 19 February 2015

माणसं खोटं का बोलतात?

माणसं धडधडीत खोटं का बोलतात ते मला अजुन कळलेले नाही. परत परत मला माझ्या शाळेची आठवण येते. शाळेने लहानपणापासून केलेले संस्कार इतक्या सहजासहजी विसरणे खरचं शक्य नाही. नितीमुल्यांना सोबत घेऊन जगात वावरतांना खोटं बोलल्याने पदोपदी अडखळायला होते.



माणसं खोटं का बोलतात?

माणसं धडधडीत खोटं का बोलतात ते मला अजुन कळलेले नाही. परत परत मला माझ्या शाळेची आठवण येते. शाळेने लहानपणापासून केलेले संस्कार इतक्या सहजासहजी विसरणे खरचं शक्य नाही. नितीमुल्यांना सोबत घेऊन जगात वावरतांना खोटं बोलल्याने पदोपदी अडखळायला होते. आपलं कुटुंबातील व समाजातील मान, आदर, विश्वासार्हताचे मूल्य हळूहळू कमी होत जातं. आपण आपल्या लहान मुलांसमोर खोटं बोलून त्यांना काय आदर्श घालून देतो? त्यांच्याकडून मात्र प्रामाणिकपणाची अपेक्षा करतो. आपल्याला माहित आहे का ती कळत नकळत पुढे मागे आपलंच अनुकरण करायला शिकत असतात. नेहमी खरे बोलणार्‍यावर पश्चातापाची वेळ कधीच येत नसते. अशा व्यक्तींना स्वतःच्या कुटुंबात व समाजात मोठा मान असतो. तुम्हाला वाटेल की सारं काही जर खरं बोललं तर स्वतः गोत्यात येऊ किंवा समोरची व्यक्ती दुःखी होईल. 

परंतु नकार, असमर्थता दाखविण्यासाठी  खोटं बोलण्याची काय गरज आहे? समोरच्याला खरी वस्तुस्थिती सांगून तर पहा. पण प्रत्येक वेळी उगाच असमर्थतेचा आव किंवा नकाराची घंटा वाजवू नका त्यामुळे समोरच्याची विश्वासार्हता गमावून बसाल. आपण दुसर्‍यांच्या उपयोगी पडाल तर ते पण तुमच्या मदतीला धावून येतील. नीतिशास्त्र सांगते की, ‘मौनं सर्वार्थ साधनम्.’ बुद्धिवान व्यक्तीची ती ओळख आहे. गरज नसताना योग्य विचार न करता, भूतकाळातील कटु अनुभव परत परत बोलून दाखविणारा व ज्या विषयीचे ज्ञान नाही अशा विषयावर बोलणारा बहुधा स्वत:ची आफत, फजिती व पंचाईत करून घेतो. जर आपण मौन राहायला शिकलो, तर आपण परनिंदा व आत्मस्तुतीच्या त्रासापासून दूर राहू शकतो. आपल्यावरचा ताण तणाव व दडपण दूर होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment