थोडं माझ्या विषयी

Wednesday 18 February 2015

श्री वेळणेश्वर मंदिर

सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर  वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्र किनारा, त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून  वेळणेश्वर.

श्री वळणेश्वर मंदिर व लोभस समुद्रकिनारा, गुहागर 

श्री वेळणेश्वर

वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळांमध्ये  वेळणेश्वर गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.  वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण २२ कि.मी. अंतरावर गाव आहे. सुमारे १२०० वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे. वेळणेश्वर  मंदिराचा इतिहास  म्हणजेच या गावाचा इतिहास आहे.  

सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर  वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्र किनारा, त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून  वेळणेश्वर. येथील गावकऱ्यांच्या मते १२ व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत. 

मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यामाधेय ९-१० मिटर उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फण्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात  अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख  घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव, श्री  गणपती, श्री लक्ष्मी नारायण अशी मंदिरे आहेत. स्थानिक  लोक या काळ भैरवाला कौल लावताना पहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी. 

वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल, स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला " मेरुमंडल " म्हणतात. 

इथे येणार्‍या पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे आहेत. तसेच वेळणेश्वर भक्त निवसातही उत्तम सोय होऊ शकते. अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच !  

No comments:

Post a Comment