थोडं माझ्या विषयी

Thursday 26 February 2015

किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...

किती छान असतं ना ? 
आपण कुणालातरी आवडणं... 
कुणी तरी तासनतास आपलाच 
विचार करणं.... 



किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...

किती छान असतं ना ? 
आपण कुणालातरी आवडणं... 

कुणीतरी तासनतास आपलाच 
विचार करणं.... 
खरच ! किती छान असतं ना 
आपण कुणालातरी आवडणं... 

कुणाच्यातरी पर्सनल डायरीत  
आपलं नाव असणं , 
चार-चौघात कुणीतरी सतत 
आपलाच उल्लेख करणं, 
किती छान असतं ना ? 
आपण कुणालातरी आवडणं... 

कुणीतरी आपलं हसणं 
काळजात साठवनं , 
कुणालातरी आपला अश्रू 
मोत्यासमान वाटणं... 
किती छान असतं ना, 
आपण कुणालातरी आवडणं.... 

कुणीतरी आपल्या फोनची 
तासनतास वाट पाहणं, 
आपल्याला एकदा ओझारत 
पाहण्यासाठी, 

तासनतास बसस्टॉपवर उभं राहणं, 
देवसमोरही स्वतःआधी 
आपलं सुख मागणं, 
खरच ! किती छान असतं ना 
आपण कुणालातरी आवडणं... 

कुणीतरी डोळ्यात जीव आणून 
आपली वाट पाहणं, 
आपल्या उपवासा दिवशी 
त्यानं ही हटकून उपाशी राहणं, 
खरच ! किती छान असतं ना 
आपण कुणालातरी आवडणं... 

कुणीतरी आपला विचार करत 
पापणीवर पापणी अलगत टेकवनं.. 
झोपल्यावर मात्र 
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं.... 
खरंच ! खूप छान असतं ना 
आपण कुणालातरी आवडणं...

अनामिक

सापुतारा

सापुतारा हे गुजरातमधील एक थंड हवेचे ठिकाण. निसर्ग सौदर्यांने संपन्न असलेल्या या पर्यटनस्थळाला दिवसेंदिवस पर्यट्कांच्या ओघ वाढतॊ आहे. सापुतारा हे ठिकाण गुजरात मधल्या डांग जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र आणि गुजरात सिमेवर असणारे हे ठिकाण नाशिक पासून अवघ्या ८० किलो अंतरावर मीटर वर आहे. 


सापुतारा

सापुतारा हे गुजरातमधील एक थंड हवेचे ठिकाण. निसर्ग सौदर्यांने संपन्न असलेल्या या पर्यटनस्थळाला दिवसेंदिवस पर्यट्कांच्या ओघ वाढतॊ आहे. सापुतारा हे ठिकाण गुजरात मधल्या डांग जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र आणि गुजरात सिमेवर असणारे हे ठिकाण नाशिक पासून अवघ्या ८० किलो अंतरावर मीटर वर आहे. 

गुजरात मधल्या डांग जिल्ह्यातलं आदिवासी वस्ती असलेलं सापुतारा हे गाव होतं. परंतू सापुतार्‍यातील पर्यटनाच्या विकासाठी इथली आदिवासी वस्ती नजीकच्याच जागेत विस्थापीत करण्याता आली. कुणबी, भिल्ल, वारली जमातीचे आदिवासी इथं वास्तव्य करून आहेत. या लोकांची स्थानिक भाषा डांग आहे. इथं अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. त्यापैकी सापुतारा तलाव हा तर सापुताऱ्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. याशिवाय स्टेप गार्डन, रोज गार्डन, सनसेट पोईटं, पुष्कर रोप वे अशी इथं असलेली अनेक ठिकाणं पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत.

या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी विशेष उपक्रम गुजरात टुरिझम कडून राबवले जातात.सापुतारा मान्सून फेस्टिवल हा त्याचाच एक भाग, हिरवाई, सहयाद्रीच्या पर्वत रांगा, वनसंपदा, आदिवासी संस्कृती याबरोबरच सापुतारा मान्सून फेस्टिवल म्हणजे प्रेक्षकंसाठी मोठी पर्वणीच असते. दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत फेस्टिवल आयोजित केला जातो. या महोत्सवात आदिवासी संस्कॄती, संगीत, नृत्य, कलाकूसर, खाद्य संस्कृती तसेच साहसी पर्यटनाचा आंनद घेता येतो. मान्सून फेस्टिवल मुळे सापुताराच्या संस्कृतीशी एकरुप होण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. याबरोबरच वन पर्यटनाचा आनंद ही लुटता येतो. मनसोक्त फिरल्यानंतर पोटपुजा ही हवी त्यासाठीच इथे फुड कोर्ट तयार करण्यात आला आहे. इथं गुजराती पक्वान्ना बरोबरच आदिवासी खाद्य पदार्थावर ही ताव मारता येतो.

क्राफ्ट व्हिलेज म्हणजे कलाकारांचं खेडं. इथं पर्यटक स्थानिक कलाकुसर बघू शकतात आणि खरेदीचा आनंद ही लुटू शकतात. बांबू पासुन बनवल्या जाणार्‍या विविध कलाकूसरीच्या वस्तू या बाजारात विक्री साठी ठेवण्यात येतात. इथं फोटो गॅलरी ही आहे यात गुजरात मधल्या अनेक पर्यटन स्थळांचे फोटोज बघयाला मिळतात. सापुताराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेले साहसी खेळ. थ्रिल अनुभवयाला आवडणाऱ्या पर्यटकांसाठी Rock climbing, Paraselling, Zorbing, Water sport, Quad biking, High rope हे क्रिडा प्रकार पर्वणीच आहे. रोप वे ने सापुताराच्या एका कडयावरुन दुस-या कडयावरचा प्रवास चित्तथरारक वाटतो. याशिवाय बोट कल्बला बोटिंग ही करता येते. सापुतारा मधल्या आदिवासी संस्कृतीला कुठेही धक्क न लावता गुजरात टुरिझमने सापुताराचा केलेला विकास उल्लेखनीय आहे. आउटिंग साठी सापुतारा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.

कसे जाल?

नाशिक पासून सापुतारा ८० किलो मीटर आहे.
नाशिकहून दिंडोरी – वणी- बोरगाव मार्गे २ तासात पोहचता येते.
नाशिक पासून बससेवा तसेच खाजगी वाहानांची सोय उपलब्ध आहे.

तापमान?

उन्हाळ्यात येथे २०° ते ३०° सेल्सियस
हिवाळ्यात ते ९° ते २०° सेल्सियस

केव्हा जाल?

अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि उत्तम पॅनोरॅमिक व्हू साइट्‍स असल्याने वर्षभरात पर्यटक ‍‍तिथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात. उन्हाळा असो, थंडीचे दिवस असो किंवा अगदी पावसाळा, प्रत्येक सीझनमध्ये पर्यटकांसाठी पर्वणीच असते.

काय पहाल?

सापुतारा लेक नागेश्वर मंदिर, व्हॅली पॉइंट, जैन मंदिर, रोज गार्डन, स्टेप गार्डन, पुष्कर रोप वे, आर्टिस्ट व्हिलेज, सनसेट पॉइंट, म्युझियम इ.

राहण्याची सोय?

पर्यटनाला जाताना बजेट हा मुद्दा असतोच. सापुतार्‍यात उच्च तसेच मध्यम दर्जाची हॉटेल्स आहेत. याशिवाय गुजरात टुरिझमचे विश्रामगृह हा सुध्दा एक रास्त पर्याय आहे. शिवाय हे विश्रामगृह सापुतारा बस स्थानकाच्या बाजूलाच आहे.

नवरा - बायकोचे भांडण – चिंतन

नवरा - बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका.अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या.



नवरा - बायकोचे भांडण – चिंतन

मला कल्पना आहे कि ह्या विषयाशी प्रत्येक जोडपे connect करेल. नवरा – बायकोत भांडण नाही असे साधारणपणे शक्य नाही. प्रश्न हा आहे कि हे भांडण लग्नानंतर किती काळाने सुरु होते आणि त्याची तीव्रता किती असते. भांडण किती दिवस चालते?

लेख वाचण्यापूर्वी,  स्त्रियांनी खालील वाक्याचा मनापासून विचार करावा असे मला वाटते.

A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth….

ज्या वेळी महिलांना बरोबरीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल, त्या वेळी जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही .
स्त्री हि खरेतर पुरुषा पेक्षा जास्त काटक  असते. स्त्री हि व्यवस्थापन गुरु असते. पण हि वस्तुस्थिती पुरुष मान्य करत नाहीत,  हे दुर्भाग्य आहे.

दिसणे आणि असणे ह्यातील नेमका फरक जेव्हा माणसाला आणि जोडप्याला कळेल तो सुदिन.

घर लहान असले तरी मोठे मन हि उणीव भरून काढू शकते.

खरे तर नवरा -बायकोनी  माप ओलांडून गृह प्रवेश केला पाहिजे, कारण कुटुंबाचे सुख , शांती आणि मर्यादा सांभाळण्याची  जबाबदारी दोघांची असते.

शितावरून भाताची परीक्षा करता येते. नाते संबंधात अशी परीक्षा घेतली तरी आपले मन सहजा सहजी अप्रिय निर्णय असला तर मानायला तयार होत  नाही हा खरा प्रश्न आहे.

यशाचे मोजमाप हे माणूस  कोठे पोचला ह्या वरून ठरविले जाते. पण त्याच बरोबर हा प्रवास कोठून सुरु झाला हेही महत्वाचे असते. हि वस्तुस्थिती  कळल्यानंतर माणसाला ओळखणे सोपे जाते.

समस्त स्त्री वर्गासाठी  माझा प्रश्न आहे कि तुम्ही स्वत:ला सामान्य स्त्री का समजता? मी साधी गृहिणी आहे असे तुम्ही का म्हणता? खरेतर साधी गृहिणी होणे हे खूप कठीण असते. कोणतीही स्त्री हि आद्य  management गुरु असते.

नवरा – बायकोचे भांडणह्या विषयावर अधिक बोलण्याआधी , मुळात नवरा – बायकोच्या नात्यासंदर्भात काही मुलभूत गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.

नातेसंबंध हा खूप गहन विषय आहे. नातेसंबंध का जुळतात, कसे जुळतात, कधी तुटतात, का तुटतात ह्या विषयाचा कितीही अभ्यास केला, तरी नेमके उत्तर मिळेल ह्याची खात्री देता  येत नाही. त्यामुळे आपण नातेसंबंध तोंडापुरते का होईना म्हणून टिकविण्याचा प्रयत्न करतो. 

नाती तुटायला कोणते कारण लागतेच असे नाही.

प्रत्येक सुखात एक दु:ख असते आणि प्रत्येक दु:खात एक सुख. बघा विचार करून.

काही नाती एखाद्या कारणासाठी निर्माण होतात. काही नाती काही काळापुरती साथ देतात. तर काही नाती जन्म भरासाठी निर्माण होतात. सर्वच नाती संपताना मनाला चटका लावून जातात. आयुष्य असेच चालू राहते म्हणून तर जगण्यात गंमत  आहे.

There are three stages of Marriage namely
MAD for each other /
MADE for each other /
MAD because of each other.

ह्या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, अपवाद फक्त जन्माबरोबर मिळणाऱ्या नात्यांचा आणि फेसबुकवरील मित्रांचा. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते, कधी पैशात किवा इतर रीतीने.

फसवणुकीचे दु:ख नेहमी जास्त असते. फसवणूक कितीची झाली आणि कोणी केली यावर ते अवलंबून असतेच असे नाही.

प्रत्येकाला आयुष्यात एखादे प्रेरणा स्थान असावे असे वाटते. प्रेरणा स्थानाशिवाय हि  यश मिळू शकते. पण आपली साथ देणारे कोणी असेल तर त्या यशाला सोनेरी किनार लाभते. पण सगळ्यात मुख्य म्हणजे दुसऱ्याला क्रेडीट देणे. 

खऱ्या प्रेमात त्याग करायची तयारी असावी लागते. हिंमती शिवाय प्रेम सफल होत नाही.

सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का ? असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा.

जोडीदाराला गुण आणि दोषांसकट स्वीकारले तरच वैवाहिक आयुष्य सुखाचे जाते. अर्थात काही दोष स्वीकारण्याच्या पलीकडचे असतात हे मान्य करावेच लागेल.

अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अभिमान आणि अहंकार ह्यातील सीमारेषा खूप धुसर आहे. माणसाला अहंकार वाटू लागला कि समोरची व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू यांचे आकलन करण्याची शक्ती धुसर होते. निर्णय चुकतात, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

ह्या सगळ्याची सुरवात मिळालेले यश न पचवता आल्यामुळे होते. प्रथम ह्या यशाचा अभिमान वाटू लागतो. कालांतराने अभिमानाची जागा अहंकार घेतो. त्यामुळे यश पचवायला शिका म्हणजे अहंकाराचा प्रश्नच निर्माण होणार नाही.

बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक बालपण सर्वांचेच संपते. पण मनातील बालपण आणि निरागसता हरवणार नाही हि काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

भांडण नेमके का होते ?

नवरा – बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण  करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या.

एका मर्यादे पर्यंत पुरुषांना बायकांची भावनिक गुंतवणूक आवडते. पण त्याचा अतिरेक होता कामा नये. कुठे – कधी – कसे थांबावे (व्यापक अर्थ अपेक्षित) हे जर स्त्रीला कळले, तर वैवाहिक जीवनात प्रश्नच निर्माण होणार नाहीत.

नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम - खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. बघा विचार करून.

दुसर्‍याला गृहीत धरण्याची सवय अनेक लोकांना असते, कारण त्यांना मी आणि माझे ह्यात जास्त रस असतो. इतर सर्व लोक हे केवळ आपल्याला सेवा देण्यासाठी आहेत असा त्यांचा ग्रह असतो. मी गृहीत धरतो म्हणजे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा युक्तिवादही केला जातो. जेव्हा आपल्याला दुसर्‍याकडून गृहीत धरले जाते, तेव्हा आपण नेमके कसे वागतो ? असा विचार केला पाहिजे. असे झाले तर परिस्थितीत नक्की सुधारणा होईल.

नाते आणि पैसा दोन्हीही आपापल्या जागी योग्यच. पण नात्यात पैसा आला किवा पैशात नाते लुडबुड करायला लागले कि प्रश्न निर्माण होतो.

संवाद करायला माणूस २ वर्षांचा असताना शिकतो. पण काय बोलावे, कसे बोलावे, काय बोलू नये वगैरे शिकायला कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो.

आपण जेव्हडे दुसर्‍यावर अवलंबून राहतो (प्रेमाचा बुरखा पांघरून) तेव्हडे आपण स्वत:चे नुकसान करत असतो. मी माझ्या संपर्कात येणाया लोकांना ‘ मानसिक दृष्ट्या ‘ स्वावलंबी’ होण्यास प्रवृत करतो. मी स्वत: कोणाच्यात गुंतत नाही आणि कोणाला माझ्यात गुंतू देत नाही.

We are very good Lawyers for our mistakes & Very good Judges for other’s mistakes……….!!

Generally there are fights between two rights, rather than right & wrong. The only precaution one has to take is that your Right should not be at the cost of my RIGHT. With this basic understanding, the dispute can always be resolved.

It is also necessary to understand as to why conflict takes place between the persons. Friends may read my article. Link:http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/68-conflict.pdf

भांडणाचे शास्त्र :

भांडणामुळे नवरा – बायकोचे नाते ताजे राहते. भांडणाचे सुद्धा एक शास्त्र आहे.

आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. काही वेळेला वादविवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन.

“Argument is bad but Discussion is good,
Because Argument is to find out WHO is right.. &
Discussion is to find out WHAT is right..”

दुसर्‍याच्या चुका सांगताना, आपणही चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे आपणाकडे असतात, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. 

जेव्हा नम्रता हि तुमची कमजोरी आहे, असा चुकीचा पवित्रा समोरच्या कडून घेतला जातो आणि तुम्ही गप्प बसता, तेव्हा नम्रता हा दोष ठरतो असे मला वाटते.

दुसर्‍याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे.

भांडण न होण्यासाठी – किंवा टाळण्यासाठी खालील गोष्टींचा विचार व्हावा, असे मला वाटते.

काही प्रसंगात उलटा – दुसर्‍या बाजूने विचार करून प्रश्न सुटू शकतात. उलट्या बाजूने विचार सुरु केला तर कदाचित समोरच्या माणसाची बाजूपण समजून घ्यायला मदत होते…..

बायकांनी सुद्धा नोकरी करत नसल्यास, स्वत:चे विश्व निर्माण केले पाहिजे. छंद निर्माण केले पाहिजेत. वाचनासारखा चांगला मित्र नाही. वाचाल तर वाचाल!! दोघांनी एकमेकाना space देणे आवश्यक आहे.

दुसर्‍याला प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात. पण मला वाटते कि दुसर्‍याला डोक्याने सुद्धा जिंकता येते, कारण डोक्याच्या वापरात हृदयाचा विचार घेतला जातोच असे माझे मत आहे.

वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर ते प्रश्न विसरून जायचे असतात म्हणजे मनाला त्रास होत नाही. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.

आपल्या समोरील समस्येच्या बाजूला दुसर्‍या माणसाच्या मोठ्या समस्येची रेषा आखली कि आपली समस्या हि समस्याच नसून देवाने आपल्याला परीक्षा देण्यासाठी संधी दिली आहे असा भास होतो. बघा विचार करून …

चूक कबूल करायला धैर्य लागते. चूक कबूल करताना आपल्या मनाला ज्या वेदना होतात, तीच आपली कालांतराने शक्ती बनते आणि आपण नवीन चुका करण्यापासून परावृत्त होतो.

मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात.

मन मारून काहीही करू नये. जे करायचे ते मनापासून आणि मनाचा कौल जाणून. जे आपल्या मनाला पटते तेच करावे, पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि मनाच्या शांती साठी जिभेवर नियंत्रण हवे.

एकटेपणा हा काही वेळा माणसाचा भोग असतो. कधी तो परिस्थितीने लादला जातो. तर काही वेळा मनुष्याच्या स्वभावामुळे तो एकटा पडतो. एकटेपणा काही वेळा थोड्या काळापुरता असतो तर काही वेळा अधिक काळासाठी. मनाशी संवाद साधून ह्या एकटेपणातून मार्ग काढता येतो.

कित्येक वेळा परिस्थिती माणसाला मासिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते. पण कोणीही हे करू शकतो. ह्याची सुरवात लहान लहान सुखे नाकारून करता येते. मनाची शक्ती आपोआप वाढते. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करणे हा दुसरा उपाय. जेव्हा तुम्ही फार कमी गोष्टींसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहता, तेव्हा तुमची बरीच tension साहजिकपणे कमी होतात.

सुखी होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले कोणावाचून अडता कामा नये. हा नियम मी माझ्या ४० वर्षांच्या  career मध्ये पाळला आणि घरात सुद्धा पाळतो. आपण दुसर्‍यांची मदत जरूर घ्यावी पण अवलंबून राहू नये. हि विचार धारा एकदा समोरच्याला कळली की तुम्हाला कोणीच त्रास देत नाही.

नात्यांचे गणित सोडविणे हे बरेच वेळा  अवघड असते.

काही  वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा  कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.

चांगुलपणा बरोबर unpredictable पणा  जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात .

संसाराच्या चक्रात अडकले तरी संसारात गुंतता कामा नये. कारण शेवटी संसार हा असार आहे.

आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण त्याची वेळ माहित नसते, काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ (Reaction ) देत असतो . त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. अर्थात ह्या साठी त्या घटनेवर आधी विचार करावा लागतो.

माझ्या मते, कोणी विचारल्यानंतरच आपले मत द्यावे . अश्यावेळी आपण जर ‘ श्रेयस्कर मत ‘ (समोरच्यासाठी श्रेयस्कर – पण त्याला ऐकायला कदाचित आवडणार नाही ) देणार असो तर फारसा प्रश्न पडत नाही . पण लोकांना ‘ प्रिय मत’ आवडते . प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा Your Right is at the cost of My Right‘ अशी परिस्थिती येते  तेव्हा संघर्ष अटळ असतो.

माझ्या मते चांगले वागणे आणि वाईट वागणे हे समोरचा  माणूस कसा आहे हे बघूनच ठरवावे लागते.  जास्त चांगुलपणा हा तुमची कमजोरी असे समजले जाते. आपण वाईट वागू शकतो हा आभास समोरच्याला मनात  असणे आवश्यक असत.

समोरच्यासाठी श्रेयस्कर वागणे आणि समोरच्यासाठी प्रिय वागणे ह्याची सीमा रेषा ठरवावी लागतेच.

आपण  काय बोलतो हे आपल्याला कळणे  जास्त महत्वाचे असते.  इतरांचा विचार करू नये. 

जर आपल्या वागणुकीचा त्रास दुसर्‍यांना होत नसेल, तर आपल्या मनाप्रमाणे वागायला हरकत नाही . लोगोका काम है कहेना !!!
आपले अस्तित्वच ह्या जगात शाश्‍वत नाही, तेथे शाश्‍वत आधार मिळणे दुरापास्तच आहे.

एखादा माणूस आपल्याला का आवडतो ह्याचे विश्लेषण करता आले पाहिजे. खरेतर असे मत एका ठराविक काळानंतरच देता  येते कारण आपली समोरच्या माणसाबद्दलची मते काळानुसार, अनुभवावरून बदलत असतात. आपले पहिले मत हे बऱ्याच वेळा ‘व्यक्तीचे दिसणे' यापुरते मर्यादित असते. जसा सहवास वाढतो तेव्हा आपण मत बनवू लागतो. आपण स्वत:च नकळतपणे आपली एक प्रतिमा बनवत असतो. समोरच्या  व्यक्तीने जर त्या प्रतिमेला धक्का दिला नाही तर ती व्यक्ती आपल्याला आवडू लागते. पण जर आपल्या प्रतिमेला धक्का लागला आणि विचारांती त्याचे वागणे बरोबर आहे असे आपण मनोमन कबुल केले, तर ती व्यक्ती आपल्याला आणखीन जवळची वाटू लागते.

इथे शाश्वत असे काहीच नाही….!! हे जितक्या लवकर मनात रुजेल तो तुमच्या भाग्याचा दिवस असे समजावे. सुखाचा रस्ता ह्याच दिशेला जातो.

एखाद्या गोष्टीबाबत सगळ अगदी जमून आलंय असं कधी होतंच नाही…..काहीतरी राहूनच जात, नकळत……!! कदाचित ह्यामुळेच आपल्या जगण्याला संजीवनी मिळत असेल.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे. बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.

आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे .

समस्येवर उपाय शोधत असाल तर प्रथम त्या समस्येचा मनापासून स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही समस्येचा स्वीकार कराल, त्या क्षणी त्या समस्येचा तुमच्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी तुम्ही यशस्वी प्रयत्न करू शकाल.
आपले आयुष्य म्हणजे जन्मापासून – मृत्यू पर्यंत येणाऱ्या अनेक क्षणांचे एक जाळे असते. हे क्षण आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे, समाधानाचे, यशाचे, अपयशाचे, इच्छापूर्तीचे, अपेक्षापूर्तीचे, समस्येचे, काळजीचे, हुरहुरीचे, प्रेमाचे, रागाचे, अहंकाराचे, वेदनेचे असतात. (ही यादी कितीही लांबू शकेल…)

काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण वेळ माहित नसते. आपण ह्या क्षणाना – घटनांना कसे सामोरे जातो ह्या गोष्टीवर आपल्या आयुष्याचा डोलारा उभारलेला असतो प्रत्येकघटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘प्रतिक्रिया‘ (Reaction) देत असतो. त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. मित्रानो, बघा विचार करून.

- सुधीर वैद्य

Wednesday 25 February 2015

बी फ्रेंड्स .. Be Friends !!

तो तुम्हाला फक्त मैत्रीण मानत असेल तर त्याचाही स्वीकार करा. प्रत्येक लव्हस्टोरीचा शेवट सुखद झालाच पाहिजे, असं काही नाही. त्यानेही आपल्या विचारावर ठाम न राहता लग्नानंतरही ती आपली चांगली मैत्रीण कशी राहील, याचा विचार करावा.



बी फ्रेंड्स .. Be Friends !!

तानियाच्या बर्थ डे पार्टीला करणने तिला टायटनचं घड्याळ प्रेझेण्ट केलं आणि हे माझ्या स्वत:च्या पगारातून तुला पहिलंच गिफ्ट आहे, असंही सांगितलं. दोघंही एका नामांकित कंपनीत कामाला. तशी त्यांची कॉलेजपासूनच घनिष्ट मैत्री. दोघांची घरही जवळजवळ असल्याने करण रोज तिला आपल्या बाईकवरून कॉलेजमध्ये घेऊन जाई. कॉलेजमधील सर्व मित्र-मैत्रिणी त्यांना एकमेकांवरून चिडवत. पण, त्यावर करण 'आमची केवळ मैत्री आहे', असं ठामपणे तर तानिया लाजत सांगत असे. पण, हे नातं मैत्रीपेक्षा जास्त असल्याचं तानियाला जाणवलं. करणने आपण मित्र आहोत, तुझ्याबद्दल आपलेपणा वाटतो,

जवळीकता वाटते पण, लग्नाच्या बंधनात मला अडकायचं नाही, असं पटकन सांगून टाकलं. 

त्यानंतर, करणशी जास्त बोलायचं नाही असा तानियाने निश्चय केला.

पण, करण नेहमीसारखाच तिला दररोज बाईकवरून ऑफिसला घेऊन जाण्यास येत होता आणि त्याला 'नाही' कसं म्हणणार या विचाराने तीही त्याच्याबरोबर जात होती. कधीतरी करणलाही आपल्याबद्दल प्रेम वाटेल, अशी आशा ती मनाशी बाळगून होती. आज करणच्या गिफ्टमुळे तर ती अधिकच सुखावली होती पण, करण आपल्या विचारांशी ठाम होता.

सर्वच मुली या कथेचा अंत 'लव आज कल'च्या शेवटासार (म्हणजेच आपलं ज्याच्यावर प्रेम आहे हे त्याने अखेरीस कबूल करावं) सुखद व्हावा अशी अपेक्षा करतात. खरं बघायला गेलं तर, पुन्हा जाणवतं ते म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांत असलेला सायकॉलॉजिकल फरक.

मुलांना लग्न म्हणजे एक बंधन वाटतं. सर्वात जवळच्या मैत्रिणीबद्दल त्यांना काळजी वाटते, तिचा सहवासही आवडतो. पण ती मैत्रीण न राहता जेव्हा पत्नी होणार तेव्हा तिच्या अपेक्षाही बदलणार. म्हणजे आता एखाद्या मुलीशी जर मी बोलत असेल तर कदाचित ती चेहरा वेडावाकडा करेल पण, लग्नानंतर मी मुलींशी बोललेलं तिला आवडणारच नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागणार, मित्रांबरोबर कधीही फिरण्यावर बंधन येणार, जबाबदारी घ्यावी लागणार, सवयी बदलाव्या लागणार. यामुळे कटकट वाढणार. म्हणजे एकंदरीतच मैत्रीण बायको झाल्यावर मला पूर्ण बदलणार. लग्नामुळे आपलं स्वातंत्र्य हिरावलं जाणार... या विचारांनी लाँग-टर्म नात्याची लगेचच कबूली द्यायला मुलं टाळतात.

याउलट, मुली जन्मताच भावूक असतात. एखादा मुलगा आपली काळजी घेतोय, त्याच्याविषयी आपल्याला जवळीक वाटतेय म्हणजे हाच आपल्या जीवनाचा जोडीदार असायला हवा असा तिचा अट्टाहास असतो. म्हणून अधिकाधिक ती त्या मुलात गुंतत जाते. मैत्रीच्या नात्यात बंधन नाहीत, पण लग्नानंतर ती येतील याची मुलाला भीती वाटते, म्हणून ते कमीटमेण्ट करत नाहीत. तर मैत्रीत काही बंधनं नसल्यामुळे हा आपल्याला कधीही सोडून जाईल ही भीती मुलींना असते, म्हणून त्या कमीटमेण्टचा आग्रह धरतात. मुलींच्या मते, लग्नासाठी प्रेम हेच महत्त्वाचं, तर मुलांच्या मते लग्नानंतर प्रेम संपतं आणि सांभाळावे लागतात ते खर्च आणि कुटुंबाच्या मागण्या.
अर्थात दोघंही आपल्या बाजूने बरोबर आहेत. कारण लग्नात प्रेम तर आहेच पण त्यागही आहे आणि जबाबदारीही. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा दोघांचा निर्णय आहे. म्हणून आपल्या जोडीदाराला विचार करायला वेळ द्या. त्याचबरोबर त्याच्या मताचाही आदर करायला हवा. तो मुलगा तुम्हाला फक्त मैत्रीण मानत असेल तर त्याचाही स्वीकार करा. त्यात अडकून स्वत:ला कमी लेखून नैराश्य ओढावून घेऊ नका. मुलांनीही आपलेच विचार योग्य आहेत यावरच ठाम न राहता लग्नानंतरही ती आपली चांगली मैत्रीण कशी राहील, याचा विचार केला पाहिजे. तसंच योग्य बंधनामुळे दोघांवरही मर्यादा येऊन जीवनाला एक चौकट मिळेल. म्हणूनच हा विषय न टाळता परस्परांशी चर्चा करा.

- गौरी कोठारी
(सायकॉलॉजिस्ट अॅण्ड सायकोथेरपिस्ट)

रिस्पेक्ट इच अदर - Respect each other

मुलीला तिच्या भावना महत्त्वाच्या तर, मुलाला त्याचा इगो. नात्यात जर तिच्या भावनांचा आणि त्याच्या इगोचा आदर केला गेला तर, दोघानांही आपल्याला महत्त्व असल्याचं जाणवतं. यामुळे एकमेकांशी जवळीक अधिक वाढते.



रिस्पेक्ट इच अदर - Respect each other 

मुलीला तिच्या भावना महत्त्वाच्या तर, मुलाला त्याचा इगो. नात्यात जर तिच्या भावनांचा आणि त्याच्या इगोचा आदर केला गेला तर, दोघानांही आपल्याला महत्त्व असल्याचं जाणवतं. यामुळे एकमेकांशी जवळीक अधिक वाढते.

इयत्ता चौथीमध्ये स्कॉलरशिप मिळवलेल्या तनयच्या अभ्यासाचा आलेख वरवर जाण्यापेक्षा इयत्ता सातवीपर्यंत तो अधिकच घसरला. त्याचबरोबर प्रशांत आणि रेणुका खडबडून जागे झाले आणि त्यांनी थेट धाव घेतली ती मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी! तनयच्या पुढच्या भवितव्यासाठी त्याची बौद्धिक चाचणी घेतली असता, तो खूप हुषार आहे पण एकाग्र नसल्यामुळे निदान दहावीपर्यंत तरी त्याचा सतत पाठपुरावा करावा लागेल, असा रिपोर्ट आल्यामुळे रेणुका आणि प्रशांत दोघंही काळजीत पडले. कारण त्यांच्या त्रिकोणी कुटुंबातील दोन कोन नोकरी धंद्याच्या व्यापात गुंतलेले. दोघंही चांगल्या पोस्टवर. त्यामुळे रजा मिळण्याचाही प्रॉब्लेम.

प्रशांत विचार करून म्हणाला, 'रेणू, मला वाटतं, तनयच्या अभ्यासाची जबाबदारी तूच सक्षमपणे पेलशील. त्यामुळे तुला निर्णय घ्यावा लागेल.' रेणुका मनात खूप अस्वस्थ झाली. एवढं मोठं करिअर, चांगली पोस्ट आणि पगारही मनासारखा हे सर्व एका क्षणात सोडून द्यायचं! त्यातून तनय हा सतत शाळा, क्लास नाहीतर खेळात गुंतलेला! मी घरात एकटी राहून नक्कीच बोअर होणार, असा विचार येऊन ती बेचैन झाली. पण क्षणभरच. कारण, प्रशांतनेही मुलाच्या भवितव्याचा विचार करूनच प्रस्ताव मांडला असेल म्हणून त्याच्या मताचा आदर ठेवला. नोकरी सोडून तिने जास्तीत जास्त वेळ तनयचा अभ्यास, खाणपिणं आणि मानसिकता याला वेळ द्यायला सुरुवात केली. मात्र, तो शाळेत किंवा क्लासला गेल्यावर ती एकटी पडू लागली. 

प्रशांतही ऑफिसच्या कामामुळे उशीरा घरी येत असे. रेणुकाची अवस्था प्रशांतने ओळखली. मुलाच्या शिक्षणासाठी करिअर सोडल्याने तोही तिला रिस्पेक्ट देत होता. म्हणून त्याने तिला सुचवलं की, फावल्या वेळेत तू संगीताचा क्लास जॉइन कर, ज्यामुळे तुझा छंदही जोपासला जाईल आणि मनही प्रफुल्लीत राहील. म्हणून तनयच्या अभ्यासाच्या वेळा सांभाळून तिने संगीताची आवड जतन केली. संसारासाठी कराव्या लागणाऱ्यारेणुकाच्या त्यागामुळे प्रशांत प्रभावित झाला तर, माझ्या आवडीनिवडी हा जपतो या आपुलकीच्या भावनेने रेणुकाही आनंदित झाली आणि त्यामुळेच दोघांमध्ये जवळिकता निर्माण झाली. नात्यांमध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. रेणुकाने प्रशांतला 'मीच का?' हा प्रश्न केला असता किंवा प्रशांतने तिच्या निर्णयाचा आदर न करता 'तीच ते कामच आहे', असं मानून वागला असता तर, कदाचित त्यांच्यात दुरावा होण्याची शक्यता होती. पण मतांच्या आदरामुळे वेळ निभावली.

'हम-तुम'च्या गरजा एकमेकांपेक्षा बऱ्याच प्रमाणात वेगळ्या आहेत. मुलीला तिच्या भावना महत्त्वाच्या तर, मुलाला त्याचा इगो. नात्यात जर तिच्या भावनांचा आणि त्याच्या इगोचा आदर केला गेला तर, दोघानांही आपल्याला महत्त्व आहे, असं जाणवतं आणि यामुळे एकमेकांशी जवळीक अधिक वाढते. आपल्या जोडीदाराच्या निकटच्या व्यक्तींचा आदर करणंही तेवढंच महत्त्वाचं. त्याचे आई-वडील, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जर आपण कुरकुर केली तर, निश्चितच त्यातून तक्रारी उद्भवतात. त्याचबरोबर एकमेकांच्या घराण्याचा, शिक्षणाचा आणि ज्या वातावरणात ते वाढले आहेत त्याचा वारंवार उद्धार केला तर, साहजिकच मनं कलुषित होतील आणि भावनांचा अनादर होईल.

पती-पत्नी त्याचे आचार-विचार आणि स्वभाव या बाबतीत भिन्न असतात. त्यामुळे कधीही चर्चा करताना 'माझचं बरोबर आहे', हा हेका न ठेवता 'तुझंही मला पटलंय पण, दोघांचा निर्णय घेऊया ही भूमिका ठेवली तर, वाद न होता नक्कीच सुसंवाद निर्माण होईल.

आदर ही अशी एक भावना आहे, ज्यातून सुसंस्कृतपणा तर दिसतोच पण, समोरील व्यक्तीचं मनही जिंकता येतं आणि जोडीदाराचं मन जिंकणं हे जग जिंकण्यासारखंच आहे.

- गौरी कोठारी
(सायकॉलॉजिस्ट अॅण्ड सायकोथेरपिस्ट)

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं..!

कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता...
आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं..!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!
शेवटचं पान मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!



आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....!

रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!
शेवटचं पान मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!चूक झाली तरी
फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं

- मंगेश पाडगांवकर


एकमेकांचं मन जपून नातं सुंदर करा

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं,



एकमेकांचं मन जपून नातं सुंदर करा

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.

ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल. तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील, तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं. तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!

तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल. पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल. नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.

सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल, तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल. तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल. नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील. तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.

तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते. कदाचित तिलाही लेट नाईट पार्टीत जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत... एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..

आई, तू आहेस म्हणूनचं...

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या 
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे 
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी 
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे 


आई, तू आहेस म्हणूनचं...

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या 
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे 
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी 
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे 

आई, तुझ्या रागवण्यातही 
अनूभवलाय वेगळाच गोडवा 
तुझ्या मायेच्या नित्य 
नव्या सणात फिका पडतो 
दसरा अन् पाडवा 

आठवतं तापाने फणफणायचो 
तेव्हां तू रात्रभर कपाळावर 
घड्या घालायचीस 
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, 
तरी तुझ्या डोळ्यातली 
ज्योत एकटीच लढायची 

एकदा जरासं कुठे खरचटलो 
आई, किती तू कळवळली होतीस 
एक धपाटा घालून पाठीत 
जख्मेवर फुंकर घातली होतीस 

जख्मं ती पुर्ण बुजली आता 
हरवून गेली त्यावरची खपली 
तो धपाटा, ती फुंकर, ती माया 
ती हरेक आठवण मनात जपली 

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम 
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी 
कितींदा नव्या हृदयाचा संदेश 
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी 

आई, हजार जन्म घेतले तरी 
एका जन्माचे ऋण फिटणार नाही 
आई, लाख चुका होतील मज कडून 
तुझं समजावनं मिटणार नाही 

आई, करोडों मध्ये जरी हरवलो 
तरी तू मला शोधून काढशील 
आई, तुला एकदाच हाक दिली 
तरी अब्जांनी धावून येशील

- अनामिक

दु:खानंतर सुख आल्यावर

दु:खानंतर सुख आल्यावर
माणूस जरा गोंधळतो
"असं अचानक सुख का?"
असं देवाला विचारतो


दु:खानंतर सुख आल्यावर

दु:खानंतर सुख आल्यावर
माणूस जरा गोंधळतो
"असं अचानक सुख का?"
असं देवाला विचारतो

आधीतर दु:खी माणसाला
सुख ओळखताच येत नाही
नशिब इतकं दयावान का?
याचं कारण कळत नाही

दु:खाची सवय झाली की
सुख विचित्र, नकोसं वाटतं
नशिबाने दाखवलेली दया
स्वाभिमानाला सुख नकोसं वाटतं

"आपण आपल्या दु:खात बरे, या
उशीरा येणाऱ्या सुखाची गरज काय?
कदाचित आपण सुखाच्या लायक नाही
अशा हावरटपणाची गरज काय?"

खरंतर देवाने दिलेलं हे बक्षिस
आपण प्रेमाने स्विकारायचं असतं
पुढे परत हवंतेवढं दु:ख
दोन क्षण सुखात जगायचं असतं

- अनामिक 



Tuesday 24 February 2015

देवींची साडेतीन शक्‍तिपीठे

प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्‍तिपीठांचा महाराष्ट्रापुरता विचार केल्यास देवीची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.



देवींची साडेतीन शक्‍तिपीठे

प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. आदिशक्‍तिपीठांचा महाराष्ट्रापुरता विचार केल्यास देवीची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.


तुळजाभवानी माता :

तुळजापूरची तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते. नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा २१ दिवसांचा असतो.

तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर
पासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते व रात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते.

तुळजाभवानी मातेचे स्थान बालाघाट म्हणजेच यमुनाचलावर वसलेले आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर तसेच पूर्णतः खोलगट भागात असून, सुरक्षेच्या भौगोलिकदृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी उताराच्या दृष्टीने जावे लागते.


मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणजेच पूर्वीचे अंधारकुंड असे नाव प्रचलित होते. उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येते. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापाठीमागे दत्तपादुका आहेत. त्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरवात करताना गणेशदर्शन करणे हे पुराणातून सांगितले आहे.

त्यामुळे गणेशदर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे.

तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब - रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवाय देवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णतः दगडी बांधकाम केलेले आहे.

साधारण बारा फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्‍चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्या मध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो.

तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या मर्यादित नव्हते, हे आजही स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे.

पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रूप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केली आहे.

तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना पुरातन ओवरीचे स्थान आहे. मंदिराप्रमाणेच खोल परिसर असून, तेथेही तीर्थकुंड आहे. या ठिकाणी आजही रहिवासी आहेत. पूर्वी तुळजाभवानीचे स्थान अनेक कडव्या धर्मविरोधकांचे लक्ष असणारे स्थान असल्याने, या ठिकाणी मंदिराप्रमाणे व तत्सम स्थान राहावे यासाठी हे स्थान निर्माण केले असून, अनेक आक्रमणांच्या वेळी देवी त्या ठिकाणी वास्तव्यास होती, असे सांगण्यात येते.

मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कुटुंबीय मूलतः मुरूम ता. उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर - पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घराची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरूपी असतात.

नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळी आजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.

नगरचे भगत (तेली) कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे 45 पिढ्यांपासून ही प्रथा चालू आहे, असे सांगण्यात येते. भिगारच्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते. त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते.

आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानचे कार्य कोल्हापूरच्या राजे छत्रपतीचे देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक नावे आहेत. आता शहरात नवीन विकास योजनेचे पर्व पुढे येऊ घातले आहे.

तीनशे १५ कोटी रुपयांचा दमदार आराखडा मंजूर केला आहे. आता ही विकासाची कामे कोणत्या प्रकारे गतीने होतात, त्याकडे लक्ष लागले आहे. आराखड्यापूर्वी सरकारने प्राधिकरण केले असून, त्यासाठी सध्या सरकारी पातळीवर नियोजन चालू आहे. राज्यात तुळजाभवानी माता हे पहिले पूर्णपीठ आहे. याशिवाय माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ आहे. देवी ही सौदर्यवाहिनी आहे. भाळी गंध त्यावर सुवर्णअलंकाराने घातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागदागिने यामुळे तुळजाभवानीचे रूप भाविकांना मोहून टाकते.



महिषासुरमर्दिनी, माता सप्तशृंगीदेवी :

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.

आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.

त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे
.
देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे.


येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.

शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.

मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
सुमारे ४७२ पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते.

चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते.

त्यानंतर नेवैद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहे; मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.

गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी १०८ कुंडे होती; मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.

गडाची व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामपंचायत आहे. याशिवाय देवीचे विश्‍वस्त मंडळही आहे. त्यांच्यातर्फे येथे बऱ्याच सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था गडावरच आहे. याशिवाय जेवणाच्या रूपातील प्रसादही भाविकांना दिला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे गडावरच आता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत.

गडावर जाणे आता सर्वांना सहजशक्‍य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्रोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. या काळात खासगी गाड्यांना गडाखालीच उभे करावे लागते. त्यापुढे फक्त एसटी बस जाऊ शकतात. त्यामुळे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता आहे.



माहूरगडची माता रेणुकादेवी :

माहूरगडची रेणुकादेवी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. श्री क्षेत्र माहूरगड एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ते ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिशय सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. शके १६९७ मध्ये लिहिल्या गेलेल्या 'श्री रेणुका महात्म्यम्‌' या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य आणि महत्त्व श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते.

श्री क्षेत्र माहूरगड हे यज्ञकुंडातून प्रगटलेल्या एकविरा देवमाता अदिती साक्षात लज्जागौरी श्री रेणुकेचे पावन क्षेत्र आहे.

सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे हे स्थान म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गदेवतेने प्रगट होऊन आपल्या मुक्त हाताने शुचिर्भूत सौंदर्य आणि मांगल्याने निर्माण केलेला हा कोऱ्या भूमीचा प्रदेश आहे.

देव, सिद्ध, ऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होती. त्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रांत प्रवीण असलेला इश्‍वाकू नावाचा राजा होता व इश्‍वाकू राजाच्या सद्‌गुणी मुलाचे नाव होते रेणू. रेणू राजाने कन्या प्राप्तीसाठी शंकराची आराधना केली. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रबिंबाप्रमाणे कन्या प्रगटली. तीच एकविरा. अदिती म्हणजेच श्री रेणुका. दुष्टांचे निर्दालन करण्याकरिता आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता रेणुका यज्ञकुंडातून प्रगटली असा ग्रंथात उल्लेख आहे. यथावकाश रेणुकेचे स्वयंवर झाले तितकाच तेजस्वी आणि तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. जमदग्नीची कथा अशी आहे, की ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू व भृगू आणि पौलोमी यांच्यापासून च्यवन भार्गव झाला.

ब्रह्मदेवाच्या कृपेने च्यवन भार्गवाला ब्रह्मदेवाचा अवतार असलेला रुचिक नावाचा पुत्र झाला. रुचिक आणि सत्यवतीचा पुत्र म्हणजेच भृगुकुलोत्पन्न जमदग्नी होय. भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले. जमदग्नी आणि रेणुका दोघेही पती- पत्नी म्हणून भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले.

सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू, कल्पतरू; तसेच दिव्य चिंतामणी, परीस व सिद्धपादुका सोबत होत्या. जमदग्नीला रेणुकेपासून वसू, विश्‍वासू, बृहद्‌भानू, बृहत्कन्न आणि विष्णुस्वरूप महापराक्रमी परशुराम ही पुत्रे झाली. परशुरामाचा जन्म निशा उजळली असताना, अदिती नक्षत्रावर वैशाख महिन्याच्या तृतीयेला प्रथम प्रहरी सहा ग्रह उंचीचे असताना चंद्र, राहू, संगत मिथुनेचा असताना राम नाव धारण करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूने रेणुकेच्या उदरातून जन्म घेतला. परशुधारी हा महापराक्रमी पुत्र पुढे परशुराम म्हणून प्रसिद्ध झाला.

रेणुकेचे आणखीन एक रूप प्रगट होते आणि ते म्हणजे "लज्जागौरी'चे. जेव्हा रेणुकामाता रजस्वाला झाली असताना, चौथ्या दिवशी स्नानाला नदीवर गेली असता स्त्रियांसह नदीवर स्नान करणाऱ्या गंधर्वाला पाहून रेणुकेच्या मनात कामविकारण निर्माण होतो व जेव्हा ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व ही शिक्षा आपल्या पुत्रांनी आपल्यासमोर द्यावी, असा आग्रह धरतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.

पाचवा पुत्र परशुरामास कैलासातून बोलावितात व त्यास आज्ञा करतात, तुझी आई रेणुका भागीरथी नदीवर स्नानास गेली असता तिने मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला कामूक भावनेने पाहिले. तेव्हा हे परशुरामा तू या दुराचारिणी व दुष्ट रेणुकेला तत्काळ ठार कर. पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात.
पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. जमदग्नीलाही आपल्या क्रोधाचा पश्‍चाताप होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागून रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात.

या ठिकाणी रेणुकेचे "लज्जागौरी' हे रूप प्रगट होते. दुर्गा सप्तशती या ग्रंथात अनुष्ठुप छंदामध्ये एक श्‍लोक आहे, तो असा- "या देवी सर्व भुतेषू लज्जारूपेन संस्थीतः नमस्तस्यै नमस्तसै नमस्तस्यै नमो नमः' या ठिकाणी तिची पती भक्तिपरायणता लक्षात येते. रेणुकेस पती असूनसुद्धा तिच्या मनात परपुरुषाला पाहून कामविकार निर्माण होतो. तिला लज्जेचे महत्त्व असल्याने रेणुका तितक्‍याच धीराने आपल्या पतीने दिलेली मृत्युदंडाची शिक्षा स्वीकारते.


आज समाजामध्ये झालेले नैतिक अधःपतन पाहता सामाजिक व्यभिचार व संस्कृतीच्या नावाखाली विकृती जोपासणाऱ्या स्त्रीत्वाच्या तेजाचा व शक्तीचा विसर पडलेल्या त्या निर्लज्ज स्त्री, पुरुषांच्या डोळ्यांत घालण्यासाठी लज्जागौरी रेणुकेचे हे उदाहरण म्हणजे झणझणीत अंजन नव्हे काय?

वरील घटनेने जमदग्नीच्या मनात क्रोधाबद्दल उद्वेग उत्पन्न होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागतात. दुसऱ्या वेळेस जेव्हा महिस्मावतीनगरीचा राजा सहस्त्रार्जुन शिकार खेळत सैन्यासह जमदग्नी आश्रमासमीप येतो. पूर्वी त्याने नारदाकडून या आश्रमाची ख्याती ऐकलेली असते तेव्हा रेणुका व जमदग्नी सहस्त्रार्जुनास आश्रमात भोजनास बोलावितात.

आपल्या सैन्यासह सहस्त्रार्जुन ते निमंत्रण स्वीकारतो; पण आश्रमात जमदग्नी व रेणुका हे दोघेच असताना, आपले व सैन्याचे आदरातिथ्य कसे करतील याची माहिती जेव्हा तो आपल्या गुप्तचरामार्फत घेतो तेव्हा त्याला कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; पण जेव्हा रेणुका व जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात तेव्हा जो जमदग्नीवर तलवारीने वार करतो.

रेणुका पतीच्या संरक्षणासाठी धावून जाते. क्रोधाचा त्याग केल्यामुळे जमदग्नी आपले, रेणुकेचे व कामधेनूचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतात. यामध्ये जमदग्नी ठार होतात. वरील जमदग्नीचे क्रोधसहित व क्रोधविरहित रूप पाहता फार मोठा संदेश श्री रेणुकेच्या महात्म्यामुळे समाजजीवनाला मिळतो आणि तो म्हणजे पहिल्या वेळेस क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे व दुसऱ्या वेळेस क्रोधाचा मुळीच उपयोग न केल्यामुळे जमदग्नीवर मोठी आपत्ती कोसळते.

जमदग्नी पत्नी रेणुका व पुत्रांना गमावून बसतात. क्रोधावर नियंत्रण करणे व योग्य वेळी क्रोधाचा उपयोग करणे या दोहोंचाही जीवनयात्रा सफल करणे व आत्म्याचा विकास करणे यांसाठी उपयोग होतो. त्यात ज्याला संतुलन राखता येईल, सुवर्ण मध्य साधता येईल त्याचे जीवन दोन्ही दृष्टींने यशस्वी होते. एवढे होऊनसुद्धा रेणुका आपल्या पतीबद्दल व पुत्रांबद्दल तक्रार करीत नाही. या ठिकाणी रेणुकेची क्षमाशीलता हेसुद्धा लक्षात येते.

जेव्हा कैलासात परशुरामास कळते, की आई रेणुकेवर सहस्त्रार्जुनाने गंभीर एकवीस वार केल्यामुळे ती जखमी झालेली आहे आणि पिता जमदग्नीचा त्याने वध केला आहे. तेव्हा आईची हाक ऐकून परशुराम आश्रमात येतो व तिथे प्रतिज्ञा करतो, की आई सहस्त्रार्जुनाचा वध करून त्याच्या रक्ताने तुला स्नान घालील व एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय करीन. तेव्हा रेणुका पुत्रांस यशस्वितेचा आशीर्वाद देते व म्हणते, प्रथम आम्हा उभयतांची व्यवस्था कर.

जमदग्नीच्या अग्निक्रियेसाठी जिथे कोरी भूमी आहे तिथे घेऊन चल. जमदग्नीची अग्रिक्रिया श्री दत्तात्रेयाच्या पौरोहित्याखाली रेणुकेच्या सांगण्यावरून परशुरामाने मातृतीर्थास केली तेव्हापासून जगन्माता रेणुकेचा जिथे वास आहे, तेच श्री क्षेत्र माहूरगड.

अखिल भारतात शक्तीची जी ५१ मूळ पिठे आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी रेणुकामातेचे हे मूळ पीठ अतिशय शुचिर्भूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी होय.

जगन्माता रेणुका हे असेच जन्मातेचे एकरूप आहे. वरील विश्‍लेषणावरून लिंगपूजा व देवीची उपासना आर्यांच्या आधीही सिंधू संस्कृतीत चालत आल्यामुळे देवीची शक्तिपीठे व रेणुका ही अनार्य देवता आहे, हे लक्षात येते.

रेणुकेलाच मातंगी हे सुद्धा नाव आहे. विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहे. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे. अशा तऱ्हेने समाजास आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे.



कोल्हापुरची आदिमाया श्री महालक्ष्मी :

साडेतीन पीठापैकी एक करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अथवा अंबाबाई म्हणजे लाखो भाविकांचे अढळ श्रद्धा स्थान होय.

श्री महालक्ष्मी मंदिर व मंदिरातील श्री महालक्ष्मीची मुर्तीविषयीचा उल्लेख १९ पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवी भागवत, हरिवंशपुराण व स्कंदपुराणातील सह्याद्री खंडाच्या उत्तरार्धात सापडतो.इ.स. पूर्व ४ ते ५ शतकातील, म्हणजेच इ.स. दिड ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या परशुरामाच्या कारकीर्दीत श्री महालक्ष्मी मूर्तीची स्थापना झाली असावी.

मूर्ती साळुंकीच्या आकाराप्रमाणे असून ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. मूर्तीच्या मागे सिंह उभा आहे. मूर्तीच्या भूमध्यावर पद्मरागिणी असून ती नैसर्गिक आहे. मूर्ती चतुर्भज असून उजव्या हातात म्हाळूंग आणि डाव्या हातात पानपात्र आहे. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेषाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे.


उपलब्ध पुराव्यानुसार इ.स. १०९ मध्ये राजा कर्णदेव कोकणातून कोल्हापूरात आला. त्यावेळी ही मूर्ती एका छोट्या मंदिरात होती. मंदिराचा आसपासचा सर्व भाग अरण्याने व्यापलेला होता. कर्णदेवाने हे जंगल तोडून मंदिर परिसर स्वच्छ केला. 

सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतकात असल्याचे दाखले मिळतात, परंतु ९८० या शिलाहाराने दिलेला ताम्रशासन आणि राष्ट्रकुल राजा पहिला अमोघवर्मा याने इ. स. ७९३ मध्ये ठाणे जिल्ह्यात संजान गावी मिळालेला ताम्रपट हे दोन प्राचीन पुरावे. राजा महामांडलिक रामसिंहदेव स्वतःला देवीचा उपासक म्हणवितो. रामसिंहाच्या पूर्वीच्या कोल्हापूरच्या शिलाहाराच्या पाच पिढ्या होऊन गेल्या. त्यातील पहिला पुरूष 'जतीग' हा होय. त्यामुळे ८६० ते ८८० या काळात शिलाहार लक्ष्मीचे उपासक बनले.

आठव्या शतकात भूकंपामुळे हे मंदिर खचले. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा विस्तार केला. त्याने महाकालीचे मंदिर बांधले असून ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्‍वर मंदिर बांधून गेले. १२१८ मध्ये यादव तौलम याने महाद्वार बांधले. या राजाने देवीला जडजवाहीर अर्पण करून द्रव्य दिल्याचा उल्लेख मंदिरातील गारेचा गणपती श्री सिद्धिविनायक मंदिरातील खांबावर आढळतो.

श्री महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मूळ मंदिराला जोडून गरूड मंडप उभा आहे.
बाराच्या शतकात शिलाहार राजाने महासरस्वती मंदिर, महालक्ष्मीचा प्रदक्षिणामार्ग बांधल्याचेही दाखले सांगतात.

चालुक्‍याच्या काळात मंदिरासमोरील गणपतीची स्थापना झाली. १३ व्या शतकात शंकराचार्य पीठातर्फे नगारखाना व कचेरीचे बांधकाम तसेच मंदिराच्या आवारात दिपमाळा बांधण्यात आल्या. मंदिराच्या आवारात सध्या सात दिपमाळा अस्तित्वात आहेत.

मोगल साम्राज्यात मंदिरावरील हल्ल्यातून श्री महालक्ष्मीची मूर्ती पूजक मंडळीनी लपवून जवळच असलेल्या कपिलतीर्थ मंडईतील एका पुजाऱ्याच्या घरी ठेवली होती. त्यानंतर इ.स. १७१९ मध्ये २६ सप्टेंबर (अश्‍विन महिन्यात सोमवारी विजयादशमी मन्मथ संवत्सर) या दिवशी पुन्हा महालक्ष्मी मंदिरात स्थापन करण्यात आली.

१७ व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या. त्यानंतर दिवसेंदिवस महालक्ष्मीचे भक्त वाढतच गेले आणि ही देवी अवघ्या महाराष्ट्राची आद्यदेवता बनली.


🙏 इति समाप्त !